Zakir Hussain Passes Away
Zakir Hussain Passes Away: जगप्रसिद्ध आणि सर्वोत्तम तबला वादकांपैकी एक असणाऱ्या झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला हुसैन हे 73 वर्षाचे होते. झाकीर हुसैन यांच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. सॅन फ्रान्सिस्कोयेथील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून हृदयाशी संबंधित आजारांनी ते त्रस्त होते आणि त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली गेल्या अनेक वर्षापासून झाकीर हुसैन यांचं वास्तव्य अमेरिकेतच होत.
झाकीर हुसैन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योत कशी असते. अगदी तसंच होतं. वडील अल्लाह राखा खान यांच्याकडून त्यांनी तबला वादनाचे धडे गिरवले होते. मात्र याच अत्यंत विनम्र कलावंताचं निधन झालं आहे. अमेरिकेतील पब्लिक ब्रॉडकास्ट नॅशनल पब्लिक रेडिओने (एनपीआर) झाकीर हुसैन यांच्या कुटुंबियांचं वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. त्यात असं लिहिलंय की, शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याने असंख्य संगीतकारांवर त्यांची अमित छाप सोडली आहे. त्यांनी पुढच्या पिढीला नवनवीन कामं करत पुढे जाण्याची प्रेरणा दिली. झाकीर हुसैन यांनी एक महान संगीतकार आणि सांस्कृतिक राजदूत म्हणून मोठा वारसा निर्माण केला आहे.
उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाबद्दल शास्त्रीय संगीतकार उस्ताद वासिफुद्दीन डागर यांनी पीटिआयला सांगितले, झाकीरभाई हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान होते. देवाने त्यांना खूप चांगले जात दिले होते. हे कधीही भरून निगणारे नुकसान आहे. त्यांनी प्रतिभेच्या जोरावर करोडो लोकांची माने जिंकली. केवळ भारतातील नाही जगभरातल्या संगीत विश्वास झाकीर हुसैन यांचं नाव आदराने घेतलं जायचं. केवळ भरतातीलच नाही जगभरातल्या संगीत विश्वास झाकीर हुसैन (Zakir Hussain Passes Away) यांचं नाव आदराने घेतलं जायचं. संगीत विश्वास क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांपैकी झाकीर यांना सातवेळा नामांकन मिळालं होतं. यापैकी चार वेळा त्यांना हा पुरस्कार मिळालं होतं. यापैकी चार वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला होता. त्यावेळी त्यांना ग्लोबल ड्र्म प्रोजेक्ट साठी हा पुरस्कार देण्यात आला होता.
हुसेन यांनी यासाठी मिकी हार्ट आणि जिओव्हानी हिडालगो यांच्यासोबत एकत्र काम केलं होतं. हा पुरस्कार त्यांना कंटेम्पररी वर्ल्ड म्युझिक अल्बम श्रेणीत देण्यात आला. यानंतर 2024 मध्ये झालेल्या 66 व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये त्यांना तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते. बेस्ट कंटेम्पररी अल्बम कॅटेगरी ॲज वि स्पीक साठी, बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटेगरीत दिस मोमेंट आणि बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स कॅटेगरीत पश्तो साठी त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर नेण्याचे महत्वाचे काम केले होते. त्यांनी लहान वयातच संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांनी वयाच्या 12 वर्षी आपले पहिले व्यावसायिक सादरीकरण केले होते. त्यांनी पं. रवीशंकर, अल्ला रक्खा, हरिप्रसाद चौरसिया यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलं होतं.
फ्यूजन म्युझिक मध्येही मोठे योगदान दिले होते. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. त्या पद्मश्री (1999) आणि पद्मभूषण (2002) साली भारत सरकारकडून देण्यात आला होता. शिवाय ग्रॅमी पुरस्कार 1992 ला मिळाला होता. शिवाय राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांसाठी संगीत दिल्याबद्दल देण्यात आला होता. कालिदास सन्मान आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार ही त्यांना मिळाला होता. भारतीय संगीताच्या पलीकडे जाऊन त्यांनी विविध संगीत प्रकारांना जोडले होते. स्मृतींना संगीतप्रेमी कायम लक्षात ठेवतील यात वाद नाही. त्यांनी संगीत क्षेत्रासाठी मोठेयोगदान दिलं आहे कधीही विसरता येणारं नाही त्यांच्या जाण्याचे संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. नव्या पिढीला त्यांच्या सारखा गुरु मिळणार नाही.
Zakir Hussain Passes Away: झाकीर हुसैन यांच्याबद्दल ही माहिती आहे का?
झाकीर हुसैन यांचं खरं आडनाव कुरेशी असं होत. मात्र त्यांना हुसैन असं आडनाव देण्यात आलं झाकीर हुसैन यांनी 1989 या वर्षी हिट अँड डस्ट या सिनेमातून त्यांनी अभिनय केला होता. 2016 मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबाबा यांनी झाकीर हुसैन यांना व्हाईट हाउसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाउसमध्ये कला सदर करणारे झाकीर हुसैन हे पहिले संगीतकार ठरले. झाकीर हुसैन यांनी 1978 मध्ये इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनिया मीनेकोला यांच्याशी लग्न केलं या जोडप्याला दोन मुली आहेत. आता झाकीर हुसैन यांच्यानंतर त्याच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे.
Zakir Hussain Passes Away: अनेक पुरस्काराने गौरव
1988 मध्ये झाकीर हुसैन यांना पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तसंच 1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता. 2009 मध्ये झाकीर हुसैन 51 व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात अल्लण होतं. उल्लेखनिय बाब ही आहे की झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं त्यांपैकी चारवेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तबला नसानसामध्ये भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. यानंतर 2024 मध्ये झालेल्या 66 व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये त्यांना तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते.
बेस्ट कंटेम्पररी अल्बम कॅटेगरी ॲज वि स्पीक साठी, बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटेगरीत दिस मोमेंट आणि बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स कॅटेगरीत पश्तो साठी त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर नेण्याचे महत्वाचे काम केले होते
Zakir Hussain Passes Away: शक्ति नावाचा फ्यूजन ग्रुपही चर्चेत
झाकीर हुसैन यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर नेण्याची महत्वाची भूमिका बजावली पंडित रवी शंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉज हॅरिसन, जॉन मॅक्लॉफ्लिप आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफूल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. 1990 मध्ये, त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिप सोबत शक्ति नावाच्या फ्यूजन ग्रुपची स्थपणा केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!