Yogi Adityanath
Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ मध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानच्या भविष्याबाबत मोठं विधान केले आहे. “एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचा नष्ट होईल”, असं म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 1947 मधील महर्षि अरविंद यांच्या एका विधानाचा उल्लेख करत मोठं विधान केलं. या संदर्भातील भाषणाचा एक व्हिडिओही योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या या विधानाचा व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असून देशभक्तीच्या वातावरणात प्रत्येकजण जुन्या आठवणी जागवताना दिसून येत आहेत. यंदा 78 व स्वातंत्र्य दिन साजरा होत असून राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जाणार आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी लखनऊ मधील एका कार्यक्रमात पाकिस्तान वर जोरदार हल्लाबोल केला आहे. फाळणी विरोधी स्मूति दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे. मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ति देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती.
जेव्हा आध्यात्मिक जगतात एखाद्याचं वास्तविक स्वरूप नसतं, तेव्हा त्यास नष्ट व्हावेच लागेल. त्याच्या नस्वरतेकडे आपण संशयाच्या नजरेतून पहिलं नाही पाहिजे. आम्ही हेच मानलं पाहिजे की ते होईल. मात्र, त्यासाठी आम्हालाही तयार असावेच लागेल. आपल्याला त्या चुकांवर विचार करावा लागेल, ज्यामुळे विदेशातील दृष्ट शक्तींना भारतात घुसणे आणि आपल्या देशातील पवित्र स्थळांवर हल्ला करण्याची संधी मिळेल. भारताची अखंडता आणि संस्कृति अबाधित ठेवण्यासाठी आपणास ते करावेच लागेल. विभाजनचा विचार सोडून राष्ट्र म्हणून आपण एकच विचार केला पाहिजे. जातीय, प्रादेशिक आणि भाषिक विभाजनाच्या पुढे जाऊन आपण राष्ट्र प्रथम हा मंत्री आंगीकरून काम केलं पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ मधील कार्यक्रमातून बोलताना म्हंटले.
बांग्लादेशमध्ये आज दीड कोटींपेक्षा जास्त हिंदू ओरडून ओरडून आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, जगाचं तोंड बंद आहे. देशातील धर्मनिरपेक्षवाद्यांची तोंड बंद आहेत. व्होट बँकेसाठी मानविय संवेदन मारून टाकल्या आहेत. मानवतेच्या रक्षणासाठी त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही. कारण, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी त्याच प्रकारच्या राजकारणाला प्रोत्साहन दिलं आहे. फोडा आणि राज्य करा याच पद्धतीचं राजकारण ही मंडळी करत आहेत, असे म्हणत देशातील इंडिया आघाडीच्या नेत्यांवर नाव न् घेता हल्ला बोला केलाआहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी पाकिस्तान इतिहासातून नष्ट होईल, असे योगीच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
तसेच योगी आदित्यनाथ यांनी असंही म्हटलं की, जर 1947 मध्ये भारतामधील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ति असली टर कोणतीही शक्ति देशाची फाळणी करू शकली नसती. 1947 मध्ये जे चित्र पहायला मिळालं होतं. टेक चित्र आज बांग्लादेशात पहायला मिळत आहे. बांग्लादेश मधील लोक आज स्वत:ला वाचवण्यासाठी कशा पध्दतीने धडपडत आहेत. मात्र, आपला संकल्प आहे की, महर्षि अरविंद यांनी 1947 आधी एक घोषणा केली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, आध्यात्मिक जगात पाकिस्तानचे काहीच वास्तव नाही. एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचा नष्ट होईल. कारण आध्यात्मिक जगात ज्यांचं काहीच वास्तव नाही. ते नष्टच होणार आहे.
त्यामुळे आपणही त्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आपणही म्हटलं पाहिजे की ते होईल. त्यासाठी आपणही तयार झालं पाहिजे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. बांग्लादेशातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, आज सव्वा कोटी हिंदू बांग्लादेश मध्ये आपला जीव वाचवण्यासाठी विनवणी करत आहेत. मात्र जगाचं तोंड बंद आहे. एवढंच नाही तर फुटीरतावाद्याचंही तोंड बंद आहे. याचं कारण ते कमकुवत आहेत. त्यांना वाटतं की त्यांची व्होट बँक आहे. त्यांना फक्त त्यांच्या व्होटबँकेची चिंता आहे. असं असलं तरी त्यांची संवेदनशीलता संपलेली आहे. सध्या मानवतेचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या तोंडामधून एक शब्द देखील निघत नाही. यांच कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारचा राजकारणाला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं असंही ते म्हणाले.
Yogi Adityanath: जेव्हा-जेव्हा काँग्रेसला संधी मिळाली…
मुख्यमंत्री म्हणाले, फाळणीच्या शोकांतिकेसाठी कॉँग्रेस कधीही माफी मागणार नाही. जेव्हा- जेव्हा कॉँग्रेसला संधी मिळाली, तेव्हा जेव्हात्यांनी देशाचा गळा घोटला आहे. त्यांना कधीही क्षमा केली जाऊ शकत नाही. बांग्लादेशात 1947 मध्ये 22% हिंदू होते. आज 7% उरले आहेत. त्या सर्व हिंदुसोबत आमची सहानभूती असायला हवी. अखंड भारताचे स्वप्नच अशा प्रकारच्या घटनांचे समाधान असेल.
Yogi Adityanath: कॉँग्रेसच्या सत्तेच्या लालसेने भारताला बर्बाद केले
मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ति देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसली. मात्र कॉँग्रेसच्या सत्तेच्या लालसेने भारताला बर्बाद केले. यांच्याकडे जेव्हा जेव्हा सत्ता गेली, तेव्हा तेव्हा त्यांनी देशाचे मोल लावून राजकारण केले.
Yogi Adityanath: आज जगात कुठेही संकट आले तरी..
1947 ला पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्ष तिरंगा फडकावत आनंदोत्सव साजरा करत होते, तेव्हा असंख्य लोकांना मातृभूमि सोडावी लागली होती. गेल्या 10 वर्षात भारताची प्रगती जगाला चकित करणारी आहे. यामुळेच आज जगात कुठेही संकट आले, तर जग भारताकडे मोठ्या आशेने बघते, असेही योगी म्हणाले.
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे फाळणीच्या स्मूति दिना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानच्या भविष्या संदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. भविष्यात पाकिस्तान भारतात विलीन होईल. असे त्यांनी संकेतीकपणे म्हंटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाकिस्तान संदर्भात दावा करताना म्हणाले की, एक तर पाकिस्तानचे विलीनीकरण होईल अथवा तो नष्ट होईल. जातीय, प्रादेशिक आणि भाषिक विभाजनाच्या पुढे जाऊन आपण राष्ट्र प्रथम हा मंत्री आंगीकरून काम केलं पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ मधील कार्यक्रमातून बोलताना म्हंटले.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!