पुण्यानंतर आता मुंबईमधील वरळीत सुद्धा हिट अँड रन प्रकार, शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाने उडवले कोळी दाम्पत्याला

Worli Hit and Run case

Worli Hit and Run case: पुण्यामधील हे प्रकरण शांत होत असताना आता मुंबई मधील वरळी या भागात अॅट्रीया मॉलजवळ भीषण अपघात घडला. एका BMW कार ने दुचाकीवर मासळी घेऊन चाललेल्या वरळी कोळीवाड्यातील नाखवा दाम्पत्याला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला 100 मिटरपर्यंत फरफटत गेल्या. ज्यामुळे त्यांचा दुर्दवी मृत्यू झाला. सदर बीएमडब्ल्यू कार ही शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांच्या मालकीचे असल्यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. यानंतर विरोधकांनी पीडितांना न्याय देण्याची मागणी करत शिवसेना शिंदे गटावर टीका केली.

अपघात झाला त्यावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा गाडी चालवत होता. राजेश शहा हे पालघर मधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेट. तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकटवर्तीय देखील मानले जातात. पोलिसांनी आरोपी मिहिर शहा याला देखील अटक केली आहे. महिर शहा आणि चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील वरळी येथे भरधाव करणे कोळी दाम्पत्याला उडवल्याची घटना Worli Hit and Run case रविवारी पहाटे घडली होती. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला आहे. अपघातानंतर मिहिर शहा हा फरार झाला होता.

Worli Hit and Run case
Worli Hit and Run case

मिळालेल्या माहितीनुसार, कोळी दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी सासून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे 5.30 च्या सुमारास कारने या दाम्पत्याला धडक दिली. वरळीच्या अटरिया मॉल परिसरात ही घटना घडली. अनियंत्रत कार आपल्या दिशेने येत आहे हे दिसताच सतर्क झालेल्या पटीने कारच्या बोनेटवर उडी घेतली. मात्र महिलेला तसं शक्य झालं नाही. भरधाव करणे दोघांना धडक डेट काही अंतरावर फरफटत नेलं. मात्र पती कारच्या बोनेटवर असल्याने फार दुखापत झाली नाही.

अपघातानंतर मिहिर शहाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर परिसरातील नागरिक या दाम्पत्याच्या मदतीला धावले. महिलेला तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांना महिलेला मृत घोषित केलं. वरळी पोलिसांनी याप्रकरणी मिहिर शहा आणि अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Worli Hit and Run case: अपघात कसा घडला?

वरळीतील अॅट्रीया मॉलजवळ पहाटे 5.30 वाजता घडला. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात नाखवा दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससुन डॉक येथे मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना त्यांच्या दुचकीला मागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू वाहनाने धडक दिली. दुचाकीवर नियंत्रण सुटले. त्यामुळे पती पत्नी वाहनाच्या बोनेटवर धडकले. वाहनाने ब्रेक मारल्यानंतर नाखवा बाजूला पडले. मात्र त्यांच्या पत्नीला वेळीच बाजूला होता आले नाही. त्यातच बीएमडब्ल्यूच्या चालकाने वाहन पळविल्या मुळे त्या वाहनाबरोबर 100 मिटरपर्यंत फरफटत गेल्या. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Worli Hit and Run case: काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Worli Hit and Run case

माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, या अपघातानंतर माझी पोलिसांशी चर्चा झाली. कायद्यासमोर सर्वच समान असतात. सरकार सर्वच घटनांना एकसमान पाहते. ही घटना काही वेगळी नाही. आम्ही कुणालाही वाचविण्याचे काम करणार नाही. घडलेली घटना अतिशय दु:खद आहे. असे अपघात पुन्हा घडू नये, असा सरकारचा प्रयत्न असेल. कायद्यानुसार आरोपीवर कारवाई केली जाईल. आपघातांची माहीत मिळाल्यानंतर वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलिस ठाणे गाठून पोलिसांकडून माहिती घेतली. तसेच पीडित नाखवा कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यात आश्वासन दिले. यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विरोधकांचे कामच विरोध करणे आहे. पण आमचे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. तो आमचा पदाधिकारी असला तरी सर्वांना समान न्याय लागू करण्याचे काम आम्ही करू.

आदित्य ठाकरे यांनी घेतली घटनेची माहिती

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतल्यानंतर मध्यमांशी संवाध साधला. ते म्हणाले, आज सकाळी वरळीत हिट अँड रनची घटना घडली. या घेतनेतील आरोप चालक फरार आहे. वारिष्ट पोलिस अधिकारी तपास करत आहेट. सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले आहे. या घटनेतील जो तरुण आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी. अशी मागणी आम्ही केली आहे. या घटनेतील आरोपी कोणत्याही पक्षाचा असला, तरी मी या घटनेचे राजकारण करणार नाही. मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही.

Worli Hit and Run case

माझी मागणी आहे की, जो गाडी चालवत होता. त्या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. या घटनेत कुठलाही राजकीय हस्तक्षेप व्हायला नको. अशी अपेक्षा ही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

महिलेला 100 मीटर पर्यंत फरफटत नेलं

वरलीत अॅट्रीया मॉलजवळ अपघात घडला आहे. मॉलजवळ असलेल्या वरळी कोळीवाड्यात सदर दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससुन डॉकला मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना त्यांच्या दुचकीला मागून येणाऱ्या येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारनं धडक दिली. दुचाकीवर मासळी, असल्यामुळे दुचाकी चालवत असलेल्या पतीनं दुचाकीवर नियंत्रण सुटलं. त्यामुळे दोघेही वाहनाच्या बोनेटवर धडकले. पतीने बोनेटवरून बाजूला उडी घेतली. मात्र महिलेला वेळीच बाजूला होता आले नाही. त्यातच बीएमडब्ल्यू चालकाने वाहन पळविल्यामुळे महिलाही वाहनाबरोबर 100 मिटरपर्यंत फरफटत गेली.

Worli Hit and Run case: चालक पोलिसांच्या तब्यात

अपघाता नंतर दाम्पत्याला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुर्दैवाने महिलेचा यात मृत्यू झाला. तर तिच्या पाटीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बीएमडब्ल्यू वाहन ताब्यात घेतलं असून अपघातानंतर चालकाने पळ काढला होता. तीलाही आता ताब्यात घेण्यात आले आहे. वरळी पोलिस ठाण्यात सदर अपघाताची सखोल चौकशी केली जात असून वारिष्ट पोलिस अधिकारीही वरळीत पोहोचले आहेत.

अपघात झाल्यानंतर मिहिरने काढला पळ

या प्रकरणात मिहिर शहा सोबत राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत हा त्याचा चालक होता. वरळीतील नेहरू तारांगण येथील बसस्टॉपच्या विरुद्ध दिशेला सकाळी 5.15 वाजता हा अपघात झाला. अपघातावेळी गाडीत मिहिर शहा आणि चालक राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत हे दोघेही होते. सध्या मिहिरचा फोन बंद येत असून त्याचा शोध सुरू आहे. हा अपघात झाल्यानंतर मिहिर शहानं अपघाताच्या स्थळावरून पळ काढला. त्यानंतर त्याने आपला मोबाइल बंद करून ठेवला. मिहीर सध्या फरार आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!