विवो ने केली सुंदर डिझाइनसह नवीन सिरिज लॉन्च

Vivo V30 5G

Vivo V30 5G: नवीन vivo V30 रेग्युलर,टॉप-एंड V30 प्रो या दोन व्हेरीयंटमध्ये येतो ज्याची किंमत भारतात 33,999 रुपयांपासून सुरू होते. विवो ने गुरुवारी (7 मार्च) भारतात नवीन Vivo V30 5G सिरिज लॉन्च केली.

Vivo V30 5G
Vivo V30 5G

Vivo V30 5G: Design, build quality and display

या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फूल HD+ डिस्प्ले आहे,ज्याचा रिफ्रेश दर 120Hzआहे. तर Vivo V30 proमध्ये 6.78 इंच लांबीचा फूल HD+AMOLED डिस्प्ले आहे,ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. Vivo V30 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gan 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. तर,Vivo V30 pro मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gan 3 प्रोसेसर मिळत आहे.

Vivo V30 च्या मागील बाजूस 50MP VCS OIS मुख्य आणि 2MP पोट्रेट लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आहे. यात सेल्फीसाठी 50MP कॅमेरा देखील आहे तर, Vivo V30 pro मध्ये OIS Sony IMX920 मुख्य कॅमेरा, 50MP AF Sony IMX81 पोट्रेट लेन्स आणि वाईड अँगल सेन्सर आहे, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP Zeiss AF कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. Vivo V30 डिव्हाइस 5000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. हे 80W फ्लेश् चार्जर सपोर्ट करते. तर Vivo V30 Pro मध्ये देखील 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. वेब सर्फिंगसारख्या बेसिक कार्यासह ही बॅटरी दोन दिवसापर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.

या मध्ये क्रव्ह स्क्रीनसह सिल्क डिझाइन लँग्वेज देण्यात आली आहे,जी डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंनी फ्रेमच्या जवळजवळ मध्यभागपर्यंत पसरते. मागील बाजूला, Vivo V30 मध्ये आयतकृती कॅमेरा मॉडयूल आहे, जो एक अदूतीय चौकोनी आकाराचा आहे. डिव्हाइस सुपर स्लिम आहे. एगोंनॉमिक डिझाइन हे डिव्हाइस पकडण्यासाठी चांगली पकड प्रदान करते. त्याची जाडी फक्त 7.45 मिमी असून वजन 186 ग्रॅम आहे.

Vivo V30 5G: ची भारतीय किंमत

Vivo V30 5G स्मार्टफोनच्या बेस म्हणजे 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 33,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह फोनचा व्हेरीएंट 35,999 रुपयांना आणला गेला आहे. त्याबरोबर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह टॉप व्हेरीएंट 37,999 रुपये आहे. हा फोन अंदमान ब्लु, क्लासिक ब्लॅक आणि पिकॉक ग्रीन या तीन कलर ऑप्शन्ससह येतो. त्याबरोबरच, प्रो मॉडेलचा 8GB+256GB स्टोरेज व्हेरीएंट 41,999 रुपयांना लॉन्च करण्यात आले आहे, तर 12GB+512GB स्टोरेज व्हेरीएंट 46,999 रुपयांना येतो. हा स्मार्ट फोन अंदमान ब्लु, क्लासिक ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये येतो. या दोन्ही फोनची विक्री 14 मार्च 2024 पासून सुरू होईल

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास सेलमध्ये ICICI आणि HDFC बँक कार्डवर 10% मिळेल, याव्यतिरिक्त एक्सचेंज बोनसही दिल जाईल. हा स्मार्टफोन आधिकृत वेबसाइट आणि लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart द्वारे विकला जाईल.

Vivo V30 5G: पहा सिरिज कशी आहे!

या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फूल HD+डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश दर 120 Hz आहे तर, Vivo V30 pro मध्ये 6.78 इंच लांबीचा फूल HD+AMOLED डिस्प्ले आहे,ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. समोरच्या बाजूला, स्क्रीन स्कॅचपासून शॉट झेनेशन (अल्फा) ग्लास शील्डद्वारे सुरक्षित राहते. तसेच कंपनीने स्क्रीनभोवतीच्या फ्रेमसाठी कस्टम अॅल्युमिनियम अलॉयकचा वापर केला आहे.

एअर-रेड शेलटर कव्हर्सपासून प्रेरित होऊन कंपनीचे म्हणणे आहेकी फोन खाली पडला तरी त्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या परिणामापासून वाचण्यासाठी मऊ आणि मजबूत रचना असलेले संरक्षण कवच तयार केले आहे. हे डिझाइन ड्रॉप्स बायपासमधून प्रभाव शक्ति सुनिश्चित करते, की ड्रॉप्स प्रभाव शक्ति इलेक्ट्रॉनिक घटकांना बायपास करतात, बल विसर्जित करण्यासाठी मजबूत फ्रेममध्ये हस्तांतरित करतात आणि आतील आणि बाहेरील नुकसान देखील कमी करतात.

याव्यतिरिक्त, डिव्हाईस IP54 रेटिंगसह येते,याचा अर्थ ते पाण्याच्या प्रवहामध्ये टिकू शकते. आणि विवो किरकोळ बॉक्ससह विनामूल्य सॉफ्ट पारदर्शक सिलिकॉन कव्हर केस ऑफर करते. सी-थ्रु डिझाइन फोनचे सुंदर बॅक पॅनल हे आकर्षित करते. पिकॉक ग्रीन व्यतिरिक्त, कंपनी दोन इतर रंगमध्ये देखील डिव्हाइस ऑफर करते- अंदमान ब्लु आणि क्लासिक ब्लॅक. Vivo V30 ची एक अडचण अशी की बेसवरील सिम स्लॉट मायक्रोफोनच्या अगदी बाजूला ठेवलेला आहे. ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Vivo V30 5G: Performance

Vivo V30 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gan 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. तर,Vivo V30 pro मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gan 3 प्रोसेसर मिळत आहे. 8GB/12GB LPDDR4X RAM and 128GB/256GB UFS 2.2 स्टोरेज आहे. Vivo V30 ने तक्रार करण्यासाठी कोणतीही समस्या ठेवली नाही, तर सर्व सुरळीतपणे काम हाताळल आहे. अप्स स्विच करणे, कॅमेरा ऑपरेट करणे, ओटीटी अप्सवरुन व्हिडिओ स्ट्रीमिंग करणे आणि गेम्स खेळणे यांसारख्या दैनंदिन कामामध्येच नव्हे तर हे सर्व काही हाताळू शकतात,आणि फोन तसा गरम होत नाही. 4K व्हिडिओ रेकॉर्ड करतांना ते थोडे उबदार होऊ शकतो,परंतु तक्रार करण्याइतका जबरदस्त नाही.

डिव्हाइस हे गेम्स किंवा व्हिडिओ बगताना गरम न होण्यासाठी, व ते रोखण्यासाठी कंपनीने 11 सेन्सर सह एक मोठे व्हेपर कुल चेंबर (3002 मिमी2) समाविष्ट केले आहे तसेच ‘एक्स्टेंडेड रॅम’ फीचरमुळे यूजर फिजिकल मेमरी दुप्पट करू शकतो. हे डिव्हाइसवर दिफॉल्टद्वारे चालू केले जाते. 12GB+12GB रॅमसह, डिव्हाइस वेगवान प्रतिसाद देते अप्स(apps)सामान्यत; पेक्षा वेगाने लोड होतात.

Vivo V30 5G

हा अँन्ड्रॉइड 14-besed Fun touch OS 14 वर चालतो. यात Amazon, Netflix, Snapchat आणि Google थर्ड पार्टी apps आहेत. कंपनी 128GB सह बेस स्टोरेज मॉडेल आणि 256GB सह टॉप-एंड व्हेरीएंट ऑफर करत आहे. हे नियमित स्मार्टफोन वापरकर्त्यासाठी पुरेस आहे. शेकडो apps स्थापित करण्यासाठी आणि फोटो आणि व्हिडिओ संग्रहित करण्यासाठी भरपूर असे स्टोरेज देण्यात आले आहे. यात 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सामान्य वापराअंतर्गत, हे सातत्याने एका दिवसापेक्षा जास्त बॅटरी लाइफ प्रदान करते. तीन तासांचा व्हिडिओ प्लेबॅक (ऑफलाइन) गेमिंग आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर काही स्क्रोल करणे,तरी डिव्हाइसमध्ये 25 टक्क्यापेक्षा जास्त असते.

तसेच, कंपनी रिटेल बॉक्ससह 80 वॉट फास्ट चार्जर मोफत देण्यात आला आहे. हे डिव्हाइस 50 मिनिटाच्या आत शून्य ते 100 टक्के पूर्ण चार्ज होऊ शकते. Vivo V30 मध्ये फक्त दोन नॅनो सिम स्लॉट आहेत आणि, हे डिव्हाइस जास्तीत जास्त व्हॅल्युम लाऊनही कमी विकृतीसह चांगले ऑडियो आऊटपुट देण्याचे चांगले कार्य करते. यात डयूअल ब्रॅंड वाय-फाय (2.5Ghz+5Ghz) आणि ब्लुटुथ 5.3 वायरलेस कनेक्टिव्हिटी सपोर्ट आहे, परंतु यात नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC)फीचर्स आहे.

या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला Vivo V30 5G या स्मार्टफोन बद्दल माहिती दिली गेली आहे. या संकेतस्थळावर वर दिलेली सर्व माहिती ही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे मधील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!