Vinesh Phogat: विनेश फोगटचा 6,015 मतांनी दणदणीत विजय! भाजपच्या उमेदवाराला केलं चितपट

Vinesh Phogat Win Haryana Election 2024

Vinesh Phogat Win Haryana Election 2024: महिला मल्ल आणि कॉँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हीने हरियाणातील जुलाना विधानसभेतून बाजी मारली आहे. विनेश फोगाटने भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. 6015 मतांनी विनेश फोगाटने भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे. कुस्तीच्या मैदानातून राजकीय आखाड्यात उतरलेली विनेश फोगाट आता विधानसभेचं मैदान गाजवणार हेच तिने तिच्या विजयानंतर दाखवून दिलं आहे. कुस्तीपट्टू आणि विनेशचा सहकारी बजरंग पुनियाने तिच्या विजयाची पोस्ट केली आहे.

कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांनी मध्यमानशी बोलताना सांगितले की, कॉँग्रेस पक्षाने आम्हाला वाईट काळात साथ दिली होती दिपेंद्रभाई साहेब प्रत्येक पावलांवर त्यांच्या पाठीशी उभे राहिले. जेव्हा पोलिस आमच्यासही झटापट करत होती. दिपेंद्रभाई रात्री एकटेच घररी आले होते. त्यांना ताब्यातही घेण्यात आलं होत.

Vinesh Phogat Win Haryana Election 2024
Vinesh Phogat Win Haryana Election 2024

विनेश सांगते, माझ्या वडिलांचे निधन झालं, तेव्हा मी पाहिलीत होते. मी एक चॅम्पियन कुस्तीपट्टू बनावं असं त्यांना नेहमीच वाटायचं. गीतानं जेव्हा एशियन कॅडेट चॅम्पियनशिप जिंकली तेव्हा गावात तिचं जल्लोषात स्वागत झालं होतं. तेव्हापासून माझं देखील असंच कौतुक व्हावं, सन्मान व्हावा असं माझ्या वडिलांना वाटायचं जेव्हा प्रियंका आणि रितूबरोबर मी 2009 च्या एशियन कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं, तेव्हा आमच्या गावात आमचं जोरदार स्वागत झालं होतं. त्यावेळी मला माझ्या वडिलांच्या इच्छेची आठवण झाली होती. ते जिथे कुठे आहेत इथून मला नेहमीच शुभेच्छा डेट असतात. माझ्या प्रत्येक विजयानंतर मला त्यांच्या इच्छेची आठवण झाली.

महावीर फोगाट आणि त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या कुस्तीपटूंवरील आखाडा या पुस्तकासाठी घेतलेल्या मुलाखतीत विनेश या भावना व्यक्त केल्या होत्या.

Vinesh Phogat Win Haryana Election 2024: विनेश फोगाटचा आतापर्यंतचा प्रवेश

मे 2003 मध्ये फोगाट भगिनींमधील गीतानं कॅडेट एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं. महावीर फोगाट यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर तिनं मिळवलेलं हे पहिलंच यश होतं. संपूर्ण बलाली गावानं गीताच्या यश साजरं केलं होतं. त्यावेळेस महावीर फोगाट यांचे लहान भाऊ राजपाल यांनी देखील आपल्या मुलीसाठी अशाच यशाचं कौतुकाचं स्वप्न पहिलं होतं. राजपाल फोगाट यांची मुलगी म्हणजेच आजची प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट. विनेश त्यावेळेस फक्त आठ वर्षाची होती आणि तिनं नुकतंच कुस्ती खेळण्यात सुरुवात केली होती.

20 वर्षानंतर आज विनेश भारतीय महिला शक्तींचे प्रतीक बनली आहे. शनिवारी (17 ऑगस्ट) पॅरिसहून परतल्यावर तिचं एखाद्या विजेत्याच्या थाटात स्वागत करण्यात आलं. तिला सन्मान देण्यासाठी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते बलाली या तिच्या गावापर्यंतच्या 120 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर हजारो चाहत्यांची गर्दी केली होती. हरियाणाच्या कोणत्याच खेळाडूच्या वाट्याला चाहत्यांनी केलेलं असं स्वागत नाही. अगदी ऑलिम्पिक पदक खेळाडूंच्या सुद्धा नाही.

Vinesh Phogat Win Haryana Election 2024

प्रत्येक वेळेस वीनेशच्या कामगिरीमुळे देशाला जेव्हा अभिमान वाटतो, तेव्हा तिच्या कुटुंबातील काही जणांची दखल घेतली पाहिजे. ते म्हणाले वीनेशचे वडील, ज्यांनी आपल्या मुलींसाठी एक वेगळ्या आयुष्याचं स्वप्न पहिलं. वीनेशची आई प्रेमलता, वीनेशचे काका आणि नंतर प्रशिक्षण झालेले महावीर फोगाट यांनी कुटुंबाचा दबाव आणि आजारपण असतानाही या स्वप्नपूर्तीसाठी संघर्ष केला. यया सर्वांच्या एकत्रित परिश्रम आणि संघर्षामुळेच एक चॅम्पियन घडली. जी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर समोर येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आहे. 25 ऑक्टोबर 2003 च्या रात्री राजपाल यांचा मृत्यू झाला. टीवहापासून बलाली गावानं अनेकदा फोगाट भगिनींचं स्वागत, सत्कार केला आहे. यात विनेशचाही समावेश होता. मात्र यावेळेस संपूर्ण देशानं विनेशची कामगिरी साजरी केली, तिचं कौतुक केलं.

बजरंग पुनियाची केली पोस्ट

देशाची कन्या विनेश फोगाटला विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन.. ही लढत केवळ एका जुलाना जागेसाठी नव्हती, केवळ पक्षांमधील लढत नव्हती, हा लढा देशातील सर्वात बलाढ्य जुलमी शक्तिविरुद्ध होता. यामध्ये विनेश फोगाट जिंकली, असं कुस्तीपट्टू बजरंग पुनिया म्हणाला

Vinesh Phogat Win Haryana Election 2024

जनतेला उद्देशून काय म्हणाली?

उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मिरवणूक काढून कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. या मिरवणुकीत भाषण करत असताना विनेश फोगाट म्हणाली होती, “खेळाच्या मैदानात तुम्ही सर्वांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. आता मी एका नव्या क्षेत्रात पप्रवेश करत आहे. मी विधानसभेत मी जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेन. महिला, वृद्ध, मातांना मी आश्वासन देऊ इच्छिते की तुम्ही आता चिंता करू नका. तुमची मुलगी येत आहे. तिने हे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे ती जिंकली आहे.

विनेश फोगाटला किती मते मिळाली?

विनेश फोगाटला जुलाना (Vinesh Phogat Win Haryana Election 2024) येथील जनतेने पाठिंबा दिल असून तिला एकुन 65,080 मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी कॅप्टन सिंग वैराणी यांना 59,065 मतांवर समाधान मानावे लागले आणि ते दुसऱ्या स्थानावर राहिले. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या उमेदवार कविता राणी केवळ 1280 मते मिळाली. विनेश फोगाटने भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. 6015 मतांनी विनेश फोगाटने भाजपच्या योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे. कुस्तीच्या मैदानातून राजकीय आखाड्यात उतरलेली विनेश फोगाट आता विधानसभेचं मैदान गाजवणार हेच तिने तिच्या विजयानंतर दाखवून दिलं आहे.

Vinesh Phogat Win Haryana Election 2024
Vinesh Phogat Win Haryana Election 2024: विनेश फोगाट यांचा कुस्तीला रामराम

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाटने उपांत्य फेरीपर्यंत मोठ्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. मात्र महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वीच विनेश फोगाटला जास्त वजन भरल्याने अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेश फोगाटने कुस्तीतुन निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर विनेश फोगाटने 6 सप्टेंबर रोजी तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियाक्ष कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला.

विनेश फोगाटची संपत्ती किती?

राष्टकूल स्पर्धेत अनेकवेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या विनेश फोगाटने आपल्या प्रतिज्ञापत्रात तीन चारचाकी वाहने असल्याचे नमूद केले आहे. तसेच एका वाहनासाठी कर्ज काढले असून ते अद्याप भरायचे असल्याचेही सांगितले आहे. वीनेशकडे 35 लाख रुपयांची व्होल्वो एक्ससी 60, 12 लाखांची हुंदई क्रेटा आणि 17 लाखांची टोयोटा इनोव्हा अशा तीन गाड्या आहेत. इनोव्हा गाडी घेताना 13 लाखांचे कर्ज काढले असून ते अद्याप भरायचे असल्याचे म्हंटले आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!