Amazon Prime वर ‘मिर्जापुर’ पासून ते ‘पंचायत’ पर्यंत नवीन सीजन लवकर येत आहे!

Upcoming Web Series 2024

Upcoming Web Series 2024; मंगळवारी संध्याकाळी Amazon Prime च्या व्हिडिओ ने धमाकेदार एंट्री करत सांगितले की या वर्षात येणाऱ्या भरपूर अशा मूवी आणि वेब सिरिज ची लिस्ट समोर आली आहे. या मध्ये सर्वाना वेड लावलेली अशी सर्वाना आवडलेली ती म्हणजे ‘मिर्जापुर’ सीजन 3 ही ज्या साठी तुम्ही वाट बघत आहे. आजून तुमच्यासाठी कोणती धमाकेदार वेब सिरिज आणि मूवी येणार आहेत या वर्षात 2024 मध्ये ते पहा.

Upcoming Web Series 2024



Title


GenreDesceiption
MirzapurCrime ThrillerSeason 3 of the popular series is coming back in 2024.
PanchayatComedy DramaSeason 3 of the story following an engineer in a village is expected in 2024.
Stree 2Horror ComedySequel to the horror comedy film featuring Shraddha Kapoor. Release date on prime video to be confirmed.
Matka King Crime DramaStory of a gambler in 1960s Mumbai, starring Vijay Verma. Directed by Nagraj Manjule. Theatrical release expected by the end of 2024.
Paatal Lok 3 Crime ThrillerSeason 2 of the gritty crime series is coming to Prime Video 2024.
Amazon Prime Upcoming Web Series 2024

Upcoming Web Series 2024: मिर्जापुर 3

‘मिर्जापुर’ चा जलवा परत येत आहे. पंकज त्रिपाठी ची ही धमाकेदार क्राइम थ्रीलर वेब सिरिज आता पर्यंत 2 सीजन हे प्रेक्षकाणा रोमांचित केल आहे. चाहते हे वेड्यावाणी पुढच्या सीजनची वाट बघत आहे. Amazon Prime च्या व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे, या सिरिज चा सीजन 3 हा 2024 मध्ये धमाकेदार एंट्री करत आहे. हा सीजन अगोदर च्या 2 सीजन पेक्षा जबरदस्त असणार आहे. ह्या सीजन मध्ये खुपसारे ट्विस्ट आहे. पण सर्वांची एंट्री ही धमाकेदार दाखवली आहे.

‘मिर्जापुर 3’ च्या फस्ट लुक ची घोषणा 19 मार्चला एक भव्य कार्यक्रम केली गेली. विशेष घोषणा ही अली फजल, पंकज त्रिपाठी आणि श्वेता त्रिपाठी सोबत अन्य स्टार कलाकारांच्या उपस्थिती केली गेली. 2018 मध्ये रिलीज झालेली ‘मिर्जापुर’ ही सिरिज बहूप्रतीक्षित तिसऱ्या सीजन ल रिलीज करण्यास तयार आहे. असे प्राइम विडिओ इवेंट च्या कार्यक्रमात ‘मिर्जापुर 3’ ची घोषणा केली.

Upcoming Web Series 2024: पंचायत 3

पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर ‘पंचायत’ चा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिरिज मधील सर्वच कलाकारांनी अशी काही कमाल केली आहे की प्रत्येकाचीच ही आवडती सिरिज बनली आहे. पंचायत 3 बद्दल महत्वाचे अपडेट समोर आल आहे जे एकूण चाहते खुश होणार आहेत. शनिवारी मेकर्सने सीझन 3 चे लेटेस्ट पोस्टर शेअर केले आहेत. एका फोटोत सचिव च्या भूमिकेतील अभिनेता जितेंद्र कुमार खांद्यावर बॅग घेऊन आपल्या बाइकवरुन जाताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत बनराकसच्या भूमिकेतील दुर्गेश कुमार, विनोद च्या भूमिकेतील अशोक पाठक आणि प्रल्हादच्या भूमिकेतील फैसल माळीक सोबत दिसत आहेत.

सिरिजचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत तर आता चाहते तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंचायत 3 चा फस्ट लुक नुकताच समोर आला आहे.

Upcoming Web Series 2024: स्त्री 2

हॉरर- कॉमेडी जॉनरमध्ये विक्रम मोडल्यानंतर श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ति खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी बहूप्रतीक्षित सिक्केल स्त्री 2 घेऊन परतले आहेत. स्त्री 2 चा फस्ट लुक प्रदर्शित झाला असून हा चित्रपट 31 ऑगस्ट 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

जिओ स्टुडिओच्या नुकत्याच झालेल्या मेगा इव्हेंटमध्ये स्त्री 2 ची घोषणा करण्यात आली. प्राथमिक कलाकारांनी स्टेजवर स्किट सादर करून ही घोषणा करण्यात आली. मॅडॉक फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसने मोशन पोस्टरसह स्त्री 2 चा स्किट व्हिडिओ ऑनलाइन रिलीज केला आहे. ओह स्त्री 2 पुन्हा परत आला आहे. इथे तुमचे मन फडण्यासाठी मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज तुम्हाला त्या डायनची पुन्हा ओळख करून देतात त्याच्या तुम्ही प्रेमात पडलात. ऑगस्ट 2024 मध्ये रिलीज होईल.

Upcoming Web Series 2024: मटका किंग

आता नुकताच ‘प्राइम व्हिडिओ’ने शेअर केलेल्या त्यांच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये नागराज यांच्या या आगामी वेबसिरिजची घोषणा करण्यात आली आहे, प्राइम व्हिडिओकडून ‘मटका किंग’या आगामी वेबसिरिजची घोषणा केली आहे. सर्वतप्रथम ही कथा चित्रपटस्वरूपात समोर येणार हिती परंतु आता मात्र ती सिरिज च्या माध्यमातून समोर येणार असल्याचे स्पष्ट झाल आहे. सिद्धार्थ रॉय कपूर व नागराज मंजुळे यांनी मिळून या सिरिजची निर्मिती केली असून यांच लेखन व दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार आहे.

Upcoming Web Series 2024: पाताल लोक 2

सध्याच्या काळात सिनेमांपेक्षा प्रेक्षक वेबसिरिजला जास्त पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक नव्या आशयाच्या वेबसिरिज ची निर्मिती झाल्याचे पाहायला मिळालं. त्यातील एक सिरिज म्हणजे ‘पाताल लोक’. अनुष्का शर्माने तिच्या भावासोबत कर्णेश शर्मासोबत या सिरिज ची निर्मिती केले होती. 2020 मध्ये प्रदर्शित झालेली ही सिरिज तूफान गाजली. त्यामुळे प्रेक्षक या सिरीजच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट पाहत होते. विशेष म्हणजे या सिरीजचा दूसरा पार्ट लवकरच येणार आहे. तत्पूर्वी सिरीजचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी लोकमत फिल्मी सोबत संवाद साधतांना एक मोठा खुलासा केला आहे.

पाताललोक गाजल्यानंतर त्याच्या दुसऱ्या पार्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा दूसरा भाग कधी रिलीज होणार, त्यांच कथानक काय असेल, कोणते कलाकार असतील असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. त्यातील कथानकाचाविषय दिग्दर्शन अविनाश अरुणयांनी उत्तर दिल आहे. पाताललोक 2 च सगळ चित्रीकरण व्यवस्थित पार पडले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना फार काळ प्रशिक्षा करावी लागणार नाही. ही सिरिज लवकरच रिलीज होणार आहे.

या आर्टिकलमध्ये आम्ही Amazon Prime येणाऱ्या नवीन वेब सिरिज बद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!