यूपी मधील हाथरस मधील सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 100 हून अधिक जणांचा मृत्यूतर, अनेक जण जखमी

UP Hathras Satsang Stampede

UP Hathras Satsang Stampede: उत्तर प्रदेशातील (UP Hathras Satsang Stampede) हाथरसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रतीभानपूर येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 100 पेक्षा जास्त भविकांचा मृत्यू झाला आहे. आणि अनेक लॉक जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुळे आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी एका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरू होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथसरमधील रतीभानपूर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरू होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे.

एटाचे वरिष्ट पोलिस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी सांगितले, एक दुखद घटना घडली आहे. हाथसर जनपद मधील सिकद्राराऊ जवळच्या मुगलगढि गावात भोले बाबांचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळेस झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणले की प्राथमिक तपासणीतून कळालं आहे की धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेस झालेल्या चेंगराचेंगरी मुळे हे घडलं आहे.

UP Hathras Satsang Stampede
UP Hathras Satsang Stampede

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आणि जखमींना रु. 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मिडिया व्यासपीठावर उत्तर प्रेदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानं हाथसर मध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांना सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हंटले आहे की, जखमी लवकर बरे व्हावेत अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. जखमींना तत्काळ हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊन योग्य उपचार करण्याच्या आणि घटनास्थळी वेगानं मदतकार्य करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आग्र्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडिजी, आग्रा) आणि अलीगडचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली या दुर्घटनेची Hathras Stampede चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

UP Hathras Satsang Stampede

Hathras Stampede: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीनी घेतली सदर दखल

उत्तर प्रदेशचे UP Hathras Satsang Stampede मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सदर प्रकाराची दखल घेतली असून या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तत्काळ एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. इटाहचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. उमेश कुमार त्रिपाठी ताणणी माहिती देतांना सांगितले की, आतापर्यंत 27 मृतदेह रुग्णालयात आले असून त्यापैकी 25 महिला आहेत. तर 2 पुरुष आहेट. याव्यतिरिक्त काही जखमींनाही रुग्णालयात आणण्यात आले आहे. सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हे मृत्यू झाल्याचे कळाले आहे. या सत्संगाला हजर असलेल्या एका महिलेने सांगितले की एका आध्यात्मिक गुरूच्या सन्मानार्थ या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते सत्संग संपल्यानंतर लोकं माघारी निघाले होतेयन त्यावईली ही चेंगराचेंगरी झाली.

UP Hathras Satsang Stampede

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी X वरील पोस्टमध्ये म्हंटले आहे की, अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करण्याचे आणि लोकांना दिलासा देण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. जखमींना योग्य उपचार मिळतील याकडे लक्ष देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. लक्ष्मी नारायण चौधरी आणि संदीप सिंह या दोन राज्यमंत्र्यांनी घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजलि वाहत असल्याचे योगी यांनी म्हटले आहे. सदर प्रकारची चौकशी करण्यासाठी एक समिति गठित करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Hathras Stampede: जखमींमध्ये जास्त महिला आणि लहान मुलांचा समावेश

उत्तर प्रदेशच्या हाथसर (UP Hathras Satsang Stampede) जिल्ह्यातील सिकंदरराव पोळी स्टेशन हद्दीतील फुलराई गावात भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली त्यात 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एटा रुग्णालयाने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कुमार त्रिपाठी यांनी केली आहे. दरम्यान, अनेक जण जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा आमवेश आहे.

UP Hathras Satsang Stampede

ही घटना एका धार्मिक सत्संगादरम्यान घडली, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी होऊन अनेक भविकांचा मृत्यू झालं, तर काही जण जखमीही झाले आहेट. शवविच्छेदन तपासणी आणि पुढील कार्यवाहीसाठी मृतांचे मृतदेह एटा मेडिकल कॉलेज मध्ये पाठवण्यात आले आहेत.

जो एकदा पडला, तो उभा राहू शकलाच नाही

अलीगडला एटाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर असलेल्या सिकंद्राराऊ शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील फुलराई गावात हा सत्संग कार्यक्रम होता. तिथे कार्यक्रमासाठी अनेक एकर जमिनीत मंडप जमिनीत मंडप लावण्यात आला होता. आता घाईघाईने तो मंडप काढला जातो आहे. या दुर्घटनेत बहुतांश लोकांचा मृत्यू कार्यक्रमाच्या ठिकाणाच्या पलीकडच्या बाजूस महामार्गाच्या कडेला झाले आहेत. तिथे महामार्गाला उतार असलेली जागा पावसांमुळे निसरडी झाली आहे.

प्रत्यक्षदर्शीनी दीलया माहितीनुसार या चेंगराचेंगरी जो खाली पडला त्याला उभं राहण्याची संधीच मिळाली नाही. दिवसा पाऊस झाला होता आणि त्यामुळे माती ओली झालेली होती त्यातच टी जागा निसरडीसुद्धा झाली होती. यामुळे तिथली परिस्थिति आणखीच कठीण झाली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणाहून जाण्यासाठी नारायण साकार विश्व हरी उर्फ भोले बाबा यांच्यासाठी एक वेगळा रस्ता बनवण्यात आला होता. अनेक महिला बाबांच जवळून दर्शन घेण्यासाठी उभ्या होत्या.

सत्संग संपल्याबरोबर महामार्गावर गर्दी वाढली. नारायण साकार आपल्या वाहनाकडे जात होते त्याच वेळी चेंगराचेंगरी झाली. नारायण साकार यांचे भक्त चेंगराचेंगरी अडकले होते. मात्र ते तिथे न् थांबताच निघून गेले. या दुर्घटणेनंतर बाबा किंवा सत्संग कार्यक्रमाशी निगडीत लोकांकडून कोणतीही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेलं नाही.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!