युके मध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा पराभव,तर मजूर पक्षाचे किएर स्टार्मर हे नवीन पंतप्रधान

UK Election Result 2024

UK Election Result 2024: युके मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (UK Election Result 2024) मजूर पक्षाने मोठी झेप घेतली आहे. त्यांनी 400 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. तर गेल्या 14 वर्षापासून सत्तेत असलेल्या हुजूर पक्षाला म्हणजे कॉन्झव्हेर्टीव्ह पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जनतेने दिलेला कौल मान्य करून हुजूर पक्षाचे अध्यक्ष ऋषि सुनक यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

मजूर पक्षाचे नेते सर किएर स्टार्मर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान होऊ शकतात. लेबर पार्टीने बहुमतांचा 326 चा आकडा पर केला आहे. लेबर पार्टीला आत्तापर्यंत 410 जागा मिळाल्या असून कॉन्झव्हेर्टीव्ह पार्टीला 119 जागा जिंकता आल्या आहेत. सर किएर स्टार्मर यांनी सोशल मिडियावर मतदारांचे आभार मानले आहेट. किएर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनणार हे निश्चित आहे. 2020 मध्ये जेरेमी कॉर्बिन् यांच्या जागी स्टार्मर यांची मजूर पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती. एक्झिट पोळच्या अंदाजानुसार कॉन्झव्हेर्टीव्ह पक्षाला जर 131 किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर या पक्षाचा तो आजवरचा सगळ्यात मोठा पराभव ठरेल.

UK Election Result 2024
UK Election Result 2024

ब्रिटनमध्ये सत्तातर घडून आले असून भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीचा पराभव स्वीकारताना ऋषि सुनक यांनी जनादेशाचे वर्णन “विचारपूर्वक निर्णय”असे केले आहे. त्यांनी आत्मनिरीक्षण आणि परिणामांमधून शिकण्याच्या महत्वावर भर दिला. आज सत्ता सुरळीतपणे आणि शांततेने बदलेल, जेमद्धे सर्व पक्षांच्या सदिच्छा सहभागी आहेत. असं सुनक म्हणाले मी नुकसानीची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि ब्रिटिश लोकांनी दिलेला महत्वपूर्ण संदेश समजतो. आत्मसात करण्यासारखे बरेच काही आहे. असंही ते पुढे म्हणाले.

“देशाला मी प्रथम आणि सर्वात महत्वाचे सांगू इच्छितो की मला माफ करा. मी माझ्या या कामासाठी माझे सर्वस्व दिले आहे. परंतु तुम्ही स्पष्ट संकेत पाठवले आहेट की युनायटेड किंगडमचे UK Election Result 2024 सरकार बदलले पाहिजे आणि तुमचाच निर्णय महत्वाचा आहे. या नुकसानीची जबाबदारी मी घेतो. या निकालानंतर मी पक्षाचे नेतेपद सोडत आहे”, असे ऋषि सुनक म्हणाले. पंतप्रधान म्हणून आपल्या शेवटच्या भाषणात, ऋषि सुनक म्हणाले की, माझ्या हातात सत्ता आल्यानंतर मी आर्थिक सुधारणावर भर दिला, देशाच्या आर्थिक दृष्टिकोण या पक्षापेक्षा महत्वाचा होता.

जेव्हा मी पहिल्यांदा येथे तुमचा पंतप्रधान म्हणून उभा राहिलो, तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की माझ्याकडे असलेले सर्वात महत्वाचे काम म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला स्थिरता आणणे, महागाई पुन्हा वाढीस आली आहे, तारण दर घसरले आहेत, सुनक म्हणाले.

UK Election Result 2024: कोण आहेत किएर स्टार्मर?

एप्रिल 2020 मध्ये मजूर पक्षाचे नवीन नेते म्हणून सर किएर स्टार्मर याची निवड झाली होती. किएर स्टार्मर 61 वर्षांचे आहेट याआधी जेरेमी कॉर्बिन् ब्रिटनमध्ये विरोधी लेबर पार्टीचे नेतृत्व करत होते. व्यवसायाने वकील असलेले किएर स्टार्मर 2015 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. लेबर पार्टीच्या नेत्यांच्या निवडणुकीत, किएर स्टार्मर पहिल्या फेरीतील मतमोजणीत 50 टक्क्यांहून अधिक मतांनी पुढे होते.

UK Election Result 2024

लेबर पार्टीचे नेते बनल्यावर किएर स्टार्मर म्हणाले होते की, या महान पक्षाला नवीन अशा आणि आत्मविश्वासाने एका नव्या युगात घेऊन जाण्याचा त्यांचा उद्देश आहे. पक्षाने जारी केलेल्या व्हीडियो संदेशात ते म्हणाले की , मी निवडून आलो UK Election Result 2024 ही माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे आणि मला अशा आहे की, वेल आल्यावर मंजूर पक्ष सरकार स्थापन करून पुन्हा एकदा देशाची सेवा करण्यास सक्षम असेल.

UK Election Result 2024

कॉन्झव्हेर्टीव्ह पार्टीच्या पराभवाची कारण काय?

हुजूर पक्षाचा हा गेल्या काही वर्षातला सर्वात दारुण पराभव आहे. असं का झालं? यामागे अनेक कारणं आसल्याचे तज्ञ लोकांनी सांगितले.

  • डॉ. निलम रैना या मिडलसेक्स युनिव्हर्सिटीमध्ये दक्षिण आशियाविषयक तज्ञ आहेत. त्या म्हणतात. एकामागोमाग एक उघडकीला आलेल्या स्कँडल्सस् मुळे लोकशाहीला धक्का बसला होता, हे या मोठ्या परभवामागचं कारण आहे. राजकारणावरच्या विश्वासाला धक्का पोहोचला होता.
  • लंडनमधल्या चॅथम हाउस या थिंक टॅंकमधल्या एशिया-पॅसिफिक प्रोग्रामचे सीनियर रिसर्च फेलो डॉ. चितिगी बाजपेयी यांच्यामते टोरीज म्हणजेच हुजूर पक्षाचा पराभव होण्यामागे मतदारांच्या गेल्या 14 वर्षामधल्या भावना आहेट. सततच्या धोरणात्मक चुका आणि स्कँडल्सस् यामुळे हे झालंय ते सांगतात.
  • यापैकी बहुतेक तथाकथित घोटाळे हे गेल्या काही वर्षात उघडकीस आले. हुजूर पक्षाच्या सरकारने कोव्हिड 19 च्या जागतिक साथीला तोंड देण्यासाठी केलेले लॉकडाऊनच्या नियमांच उल्लंघन वगैरे.
  • बोरिस जॉन्सन यांनी जागा लिझ ट्रस यांनी घेतली पण त्यांची आर्थिक धोरणं इतकी भयंकर होती की पदावर त्या फक्त 40 दिवस टिकल्या.
  • त्यानंतर ऋषि सुनक हे पहिले भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान बनले. त्याच्या सरकारला Cost of Living म्हणजेच महागाईच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागलं. आणि काही काळापूर्वीच त्याच्या जवळचे आणि त्याच्या सरकारमधील काहीजणांचा समावेश असणार बेटिंग स्कँडल उघडकीस आलं. लिझ ट्रस आणि ऋषि सुनक या दोघांचीही पंतप्रधान पदासाठी निवड पक्षाने केली होती, असं डॉ. रैना लक्षात आणून देतात.
  • विरेन्द्र शर्मा हे साऊथहॉल मधून मजूर पक्षाचे म्हणजेच लेबर पार्टीचे अनेक वर्ष खासदार होते. यावेळी त्यांनी निवडणूक लढवली नाही. “एखाद्या तरुण खासदाराला संधी मिळावी म्हणून मी माझी जागा सोडली, असं ते सांगतात. अनेक टोरी (कॉन्झव्हेर्टीव्ह) खासदार त्याचे मित्र आहेत. त्यांच विश्लेषण कदाचित पूर्णपणे निष्पक्ष नसेलही, पण त्याच्यामते पक्षांतर्गत मतभेद आणि नेतृत्वपातळीवर अनेकदा झालेले बदल ही हुजूर पक्षाचा पराभव होण्यामागची काही कारणं आहेत.
UK Election Result 2024

जर तुम्ही सेनापती बदलत राहिलात, तर तुम्ही युद्ध कसं जिंकणार? गेल्या काही वर्षातच चार पंतप्रधान होऊन गेले. पक्षात अजिबात एकी नव्हती आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्था गेली 14 वर्ष एकचजागी सुस्तावली.

मजूर पक्षाचे नेते किएर स्टार्मर यांनी पक्षांमध्ये एकहाती बदल घडवून आणल्याचं हुजूर पक्षातल्या काही नेत्यांनी म्हंटलं होतं. लेबर पार्टी जेरेमी कॉर्बिन् यांच्या नेतृत्वाखाली लढली असती तर हरली असती. पण स्टार्मर यांनी पक्षाचा पूर्णपणे कायापालट केल्याचं एका जेष्ट टोरी खासदारांने म्हंटल होत. 2019 च्या निवडणुकीवेळी कोणी विचार केला असता का,की ही निवडणूक लेबर पार्टी इतक्या प्रचंड बहुमताने जिंकले ते म्हणाले. लेबर पार्टीचा धुरा कॉर्बिन् यांच्याकडे असताना भारत त्यावर अतिशय नाखुष होता.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!