UGC-NET ची परीक्षा रद्द, पेपरमध्ये गैरप्रकार झाल्याच्या संशयामुळे NTA निर्णय, तपास CBI कडे!

UGC-NET Exam 2024

UGC-NET Exam 2024: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 18 जून रोजी झालेली UGC-NET Exam 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाकडून यूजीसीला पेपर फुटल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे परीक्षा प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान लवकरच परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जटिल. तत्पूर्वी केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

UGC-NET Exam 2024 ची परीक्षा देशभरातील विद्यापीठातील पीएचडी प्रवेश, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाते. 18 जून 2024 रोजी 317 शहरातील 1 हजार 205 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती. एकुण 9 लाख 9 हजार 508 विद्यार्थ्यांनी NTA ची परीक्षा दिली होती.

UGC-NET Exam 2024
UGC-NET Exam 2024

देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक घटकांची चक्रदुष्टि असून, त्याचा फटका विद्यार्थ्याना बस्तान दिसत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश परीक्षा अर्थात NEET परीक्षेसंदर्भातील घोटाळा समोर आलेला असतानाच शिक्षण मंत्रालयाकडून एकाएकी राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) कडून आयोजित केल्या जाणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेला रद्द करण्याचा निर्णय घेत सादर प्रकरणी CBI कडे चौकशीचे आदेश दिले. शिक्षण मंत्रालयाने पाटणा येथील (UGC-NET Exam 2024)च्या कथित स्वरूपातील आयोजनामध्येही गैरव्यवहार झाल्याची बाब अधोरेखित करत त्या संदर्भात बिहार पोलिसांच्या इकॉनॉमिक क्राइम युनिटीकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. ज्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल.

शिक्षण मंत्रालयाकडून आधीच दोन सत्रामध्ये घेण्यात आलेली UGC-NET Exam 2024 परीक्षा रद्द करण्यात आली असून. आता तीच पुन्हा आयोजन केल जाणार असल्याच सांगितल जात आहे. यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याच वृत्त समोर येताच देशभरातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आणि विरोधी बाकावर असणाऱ्या कॉँग्रेस पक्षाकडूनही या संदर्भात मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली. X च्या माध्यमातून पोस्ट करत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातिल सरकारला कॉँग्रेसनं ‘पेपर लिक सरकार’ असं उपरोधक नाव डेट या साऱ्यांची जबाबदारी शिक्षण मंत्री कधी घेणार? असा सवाल उपस्थित केला.

परीक्षेतिल गैरप्रकारबाबत 20 हजार विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या आहेत

देशभरातील UGC-NET Exam 2024 संदर्भात सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये याचिका दाखल केल्या होत्या, ज्यात परीक्षेतिल गैरप्रकाराची तक्रार होती. ग्रेस मार्कविरोधात दाखल केलेल्या याचिकेत एनटीएने अद्याप विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली हे सांगितलेले नाही, असे म्हंटले आहे. त्याच वेळी, परीक्षेपूर्वी एनटीएने जारी केलेल्या माहिती बुलेटीनमध्ये ग्रेस गुण देण्याच्या तरतुदीत उल्लेख नव्हता. अशा स्थितीत काही उमेदवारांना ग्रेस मार्क्स देणे योग्य नाही.

CBT पद्धतीने परीक्षा गेनयात आली नाही, कारण…

यंदा UGC-NET च्या 83 विषयांची परीक्षा एक नव्हे तर दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 9.30 वाजेपासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती. यापूर्वी UGC-NET Exam 2024 ची परीक्षा ऑनलाइन CBT म्हणजे कम्प्युटरच्या माध्यमातून घेतली जात असे. सर्व केंद्रावर सर्व विषयांची परीक्षा एकाच दिवशी घेता यावी, यासाठी हा बदल करण्यात आला.

पुन्हा घेतली जाणार परीक्षा

19 जून 2024 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून परीक्षेसंदर्भात काही गैरप्रकारांच्या सूचना मिळाल्या हित्या. तावरून परीक्षेत काहीतरी गडबड झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने ती रद्द केली आहे. आता परीक्षा नव्याने घेतली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. आता ही परीक्षा नव्याने घेतली जाईल आणि त्याची माहिती स्वतंत्रपणे विद्यार्थीबरोबर शेअर केली जाईल.

काय आहे NTA?

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या देशपातळीवरील पात्रता परीक्षाचं आयोजन करण्यासाठी NTA (National Testing Agency) या स्वायत संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी वर चाचणी तयारी, आयोजन आणि त्यांच्या मार्किंग संदर्भातील संपूर्ण तयारी अमलबजावणी आणि समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय मानक, कार्यक्षमता आणि परदर्शकपणे प्रवेश प्रक्रिया आणि भरतीसाठी उमेदवारांच मूल्यांकन करण्याच काम संस्थेच्या माध्यमातून केल जात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या माध्यमातून उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश/ फेलोशिपसाठी प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यात NEET आणि NET या परीक्षासह इतर परीक्षांचा समावेश असतो.

निर्णयांतर सरकारवर टीका

NET परीक्षा रद्द झाल्यानंतर या मुद्यावरून सरकारवर विरोधकाकडून टीका व्हायला सुरुवात झाली आहे. कॉँग्रेसनं सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार तरुणाच्या भवितव्याशी खेळत असल्याचं या पोस्टमध्ये म्हंटल आहे.

देशांच्या विविध भागात काल UGC-NET Exam 2024 परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर आज पेपर लिकच्या संशयात परीक्षा रद्द करण्यात आली. आधी NEET चा पेपर लिक झाला आणि अता UGC-NET चा. मोदी सरकारवर- ‘पेपर लिक सरकार’ बनलं आहे, अस कॉँग्रेसनं या पोस्टमध्ये म्हंटल आहे. तर समाजवादी पक्षांचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. “अबकी बार, पेपर लिक सरकार” असं म्हणत अखिलेश यादव यांनी हे सरकार अवघ्या काही दिवसांचे पाहुणे असल्याच X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे.

नेट परीक्षा इतकी महत्वाची का? ही परीक्षा कोण देतं?

यूजीसी नेट परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित केली जाते. या परीक्षेमध्ये एकुन 83 विषयांचा समावेश असून, ती उत्तीर्ण करणाऱ्या परीक्षार्थीना पुढे शिक्षक बनण्यासाठी ची पात्रता प्राप्त होते. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण अपेक्षित आहे. आरक्षण प्रवर्गासाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये 5 टक्क्यांची मुभा दिली जाते. यूजीसी जेआरएफसाठी 30 वर्ष इतकी वयोमर्यादा असून, नेटसाठी मात्र कोणतीही वयाची अट नाही.

परीक्षा पेन-पेपर पद्धतीने घेण्यात आली

18 जून रोजी ही परीक्षा ओएमआर म्हणजेच पेन-पेपर पद्धतीने घेण्यात आली. यावेळी यूजीसी नेटच्या 83 विषयांची परीक्षा एकाच दिवशी दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 वाजेपासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती.

यापूर्वी, यूजीसी नेट परीक्षा ऑनलाइन सीबीटि म्हणजेच संगणक आधारित चाचणी होती. सर्व विषयांवर आणि सर्व केंद्रावर एकाच दिवशी घेता याव्यात यासाठी हा बदल करण्यात आला आहे. याशिवाय दूरवरच्या केंद्रावरही परीक्षा घेता येतात.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!