Tulsi Vivah 2024
Tulsi Vivah 2024: दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे.. या नंतर लग्नसराईला सुरुवात होते. तुळशी विवाह हा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील द्वादशी तिथीला प्रदोष काळात तुळशी विवाह आयोजित केला जातो. यामध्ये वृंदा म्हणजेच तुळशीचा विवाह शाळीग्रामशी (काही ठिकाणी कृष्णाशी करण्याची परंपरा) होतो. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. तुळशीला देवीचा दर्जा प्राप्त असून तुळशीपूजेचे महत्व पुराणात विषाद केले आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूच्या अंगणात तुळशीचे रोप हमखास असते. घरात तुळशीचे रोप असणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीविवाह केल्यानं वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि विवाहाच्या मार्गात येणाऱ्या अडचणीही दूर होतात. लवकरच विवाह होण्याची शक्यता असते. तुळशीविवाह देवउठणी एकादशीला किंवा दुसऱ्या दिवशी होतो.
देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो. या दिवसाला देवोत्थानी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. मान्यतेनुसार तुळशी रोपामुळे जीवनात सुख समृद्धी येते. याशिवाय तुळशीत देवी लक्ष्मीचाही वास मानला जातो. पवित्र आणि विवाह धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या अशा या तुळशीचा दरवर्षी कार्तिक महिन्यात, श्रीहरी विष्णुचे अवतार असलेल्या शालिग्राम यांच्यासोबत विवाह सोहळा पार पडतो. तुळशी विवाहाला सनातन धर्मात विशेष महत्व असून हे अत्यंत शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, या दिवशी भाविक व्रत करत तुळशी मातेसह भगवान शालिग्रामची पूजा करतात.
यंदा देवोत्थानी एकादशी 12 नोव्हेंबरला असणार आहे. या दिवशी तुळशीचा विवाह विष्णूच्या मूर्ती रूपात शालिग्रामाशी अर्थात ऊसाशी लावला जातो. तुळशीचा विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. या दिवशी भगवान श्री हरी आणि तुळशी मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्व.
Tulsi Vivah 2024: तुळशी विवाह शुभ महूर्त आणि पूजाविधी
हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांनी सुरू होईल. तर 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजून 4 मिनिटांनी संपेल. 12 नोव्हेंबरला दुपारी 4.04 वाजता द्वादशी तिथी सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी मंजेच 13 नोव्हेंबरला दुपारी 1.01 वाजता संपेल. उदयतिथीमुळे 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा होणार आहे.
- तुळशी विवाह दिवशी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.
- देवघराची स्वच्छता करून गंगाजलाने पूजा कक्ष पवित्र करा.
- त्यानंतर शंख फुंकुन आणि मंत्रोच्चाराने श्रीहरी विष्णुचे आवाहन करा. संध्याकाळी तुमचे घर आणि मंदिर दिवे, फुलं, हार आदींनी सजवा. शुभ मुहूर्त लक्षात घेत शालिग्राम आणि तुळशी विवाहाचे आयोजन करा.
- तुळशीच्या ठिकाणी मंडप बांधा, तुळशीला साज शृंगाराचे साहित्य अर्पण करा.
- यानंतर शालिग्रामजिंना गोपी चंदन आणि पिवळ्या वस्त्रानी सजवा.
- त्यांना धूप, हार, फुले, फळे, पंचामृत, दिवा, मिठाई इ. अर्पण करा.
- सर्व झाल्यानंतर वैदिक मंत्राचा जप करा, आरती करून पूजेची सांगता करावी.
- त्यानंतर सर्वाना प्रसादाचे वाटप करा. शेवटी पूजेत कळत न् कळत झालेल्या चुकांबद्दल माफी मागा.
(टीप: येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहीतकांवर आधारित आहे. MH Times24 या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)
Tulsi Vivah 2024: तुळशी विवाह कसा केला जातो?
सर्व प्रथम आपल्या अंगणातील तुळशी वृंदावनाची किंवा कुंडीची सुंदर अशी रंगरंगोटी करावी. त्यानंतर हळद तेल लावून मंगलस्नान घालण्यात येतं. तुळशी भोवती शेणाचा सडा टाकून, सुंदर रांगोळी काढण्यात येते. या दिवशी फुलांनी किंवा नवीन वस्त्राचा मंडप तयार केला जातो. त्यानंतर तुळशीचे रोप आणि भगवान विष्णूच्या मूर्तीला स्नान घातले जाते. घरा समोर सुंदर रांगोळी काढून, दाराला आंब्याचे तोरण व मांडव म्हणून ऊसाची व धांड्याची खोपटी ठेवतात. फुलांच्या मला घातल्या जातात. शेतातील बोर, हरबऱ्याची भाजी, आवळा, एकनखी सामान आणून तुळशीची ओटी भरली जाते. त्याचबरोबर कापसाची माळ करून तुळशीला घातली जाते. त्यानंतर तुळशी विवाहादरम्यान तुळशीला साज शृंगार अर्पण केला जातो.
तसेच भगवान विष्णूच्या मूर्तीलाही सजवले जाते. यानंतर तुळशी आणि विष्णुला एका धाग्यात बांधले जाते. मध्यभागी अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून विधिवत लग्न लावले जाते. नंतर एकत्र जमलेल्या बायका भजनं-भारुड म्हणून, दिवाळीचा फराळ, प्रसाद देऊन तुळशीच्या लग्नाची सांगता होते.
Tulsi Vivah 2024: तुळशीच्या लग्नाची कथा
पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असुरांचा राजा जालंधरशी लावण्यात आले. होते. दृष्ट जालंधरला नष्ट करण्यासाठी वृंदेची पतिव्रता मोडीत काढणे गरजेचे होते, म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि तिची पतिव्रता मोडीत काढली. भगवान शंकरांनी असुरांचा राजा जालंधरचा पराभव केला. मात्र, वृंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णुला शालिग्राम नावाचा दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूने वृंदेला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तुळशी विवाहानंतर तुळशीला दैवत्व प्राप्त झाले.
हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य, तुळशीचे पण घातलेले पाणी मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य आणि मृत्यूवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्तीला वैकुंठाचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. तुळशीचं लग्न लावणाऱ्याला कन्यादानाचे पुण्य लाभते, असेही मानले जाते.
Tulsi Vivah 2024: तुळशी विवाहाचे महत्व
हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय मानले जाते, असं म्हणतात. ज्या घरात तुळशीचा वास असतो तिथे देवी लक्ष्मी सदैव वास करतात, त्यामुळे तुळशी विवाहालाही विशेष महत्व आहे. देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोप आणि श्री बाळकृष्णाची मूर्ती किंवा भगवान शालिग्राम यांना विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशी विवाह विधी केल्यास वेवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!