Tirupati Laddoos: तिरूपति बालाजीच्या प्रसादात मिळणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच वापर? चाचणीमध्ये धक्कादायक खुलासे

Tirumala Tirupati Laddu

Tirumala Tirupati Laddu: तिरूपती बालाजी हे एक प्रसिद्ध असे तीर्थस्थान आहे. तेथे संपूर्ण भारतातून आणि परदेशातून भक्त हे श्रद्धेने येतात. तेथील असा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे, येथील लाडू हा खूप असा प्रसिद्ध आहे. हा लाडू संपूर्ण भारतातच नाही, तर परदेशात देखील चर्चेत आहे. या लाडूची चव ही अतिशय उत्तम असते, या चविणे मनतृप्त होते म्हणून या लाडूना खूपच अशी मागणी आहे. पण याच लाडू बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे, जे ऐकुन तुमचे या लाडुवरून मन उडून जाईन. या लाडू बद्दल असे सांगितले जात आहे की तिरूपती मधील प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडू बनवण्यासाठी प्राण्यांचे गोमास, फिश ऑइल आणि पाम ऑइलचा उपयोग केला जात होता.

या प्रकरणा बाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सुद्धा आरोप केला की, मागील वायएसआरसीपी सरकारच्या काळात प्रसिद्ध तिरूपती लाडू तयार करण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरली गेली. मात्र वायएसआरसीपीणे हा दावा फेटाळून लावला आहे. जे अहवाल आले होते जी मागील वायएसआरसीपी सरकारच्या काळात प्रतिष्ठित तिरूपति लाडू प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या तुपात गोमांस आणि माशाच्या तेलासह प्राण्यांच्या छबीचे अंश होते, त्यामुळे लोकांमध्ये एक वेगळेच संताप जनक वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळे धार्मिक भावनांचा अनादर केल्याचा आरोप लोकांकडून देखील करण्यात येत आहेत.

या सेंटर ऑफ ॲनालिसिस अँड लर्निंग लाइव्हस्टॉक अँड फूड किंवा CALF, गुजरातच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात YSRCP सत्तेत असताना प्रसिद्ध तिरूपति लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीची उपस्थिती उघड झाली. अहवालात असे सूचित केले आहे की तुपात फिश ऑइल, बिफ टॉलो आणि लार्डचे अंश आहेत. तसेच त्यात अर्ध घन पांढरे चरबी उत्पादन आहे. जे डुकराच्या फॅटी टिश्यूचे प्रस्तुतीकरण करून प्राप्त होते, त्याचा वापर देखील केला गेला आहे. तिरूपति लाडू तिरूपति येथील आदरणीय श्री व्यंकटेश्वर मंदिरात विकले जातात, जे तिरूमाला तिरूपति देवस्थानम (TTD) द्वारे चालवले जाते. बुधवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, हे लाडू निकृष्ट दर्जाच्या पदार्थाचे बनवले जात होते.

Tirumala Tirupati Laddu

राज्याचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनीही या मुद्यावर पूर्वीच्या वायएस जगन मोहन रेड्डी सरकारची निंदा केली. तिरूमल्ला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे आमचे सर्वात पवित्र मंदिर आहे, वायएस जगन मोहन रेड्डी प्रशासनाने तिरूपति प्रसादामध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली हे ऐकुन मला धक्का बसला आहे, असे ही ते म्हणाले.

Tirumala Tirupati Laddu: वायएसआरसीपी पक्षाने काय उत्तर दिले?

वायएसआरसीपी सरकारच्या काळात तिरूमला तिरूपति देवस्थान (TTD) चे अध्यक्ष असलेले वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी चंद्राबाबूच्या आरोपांच खंडन केलं. चंद्राबाबू तिरूपती मंदिराचे पावित्र्य आणि हिंदू भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवून मोठे पाप केले आहे, असं सुब्बारेड्डी म्हणाले. चंद्राबाबूनी तिरूपति मंदिरातील लाडुंबाबत अत्यंत घाणेरडे आरोप केले आहेत. असं त्यांनी एका (पूर्वीचे ट्विटर) वार पोस्ट करत म्हटलंय.

Tirumala Tirupati Laddu: चंद्राबाबू नायडूचे खळबळजनक आरोप

एनडीए आघाडीच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी मागील सरकारवर टीका केली. आधीच्या सरकारचे तिरूपति बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळ केल्याचे गंभीर आरोप केले.

  • गेल्या 5 वर्षात YSR कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरूमलाचे पावित्र्य कलंकित केलं.
  • तिरूपतिच्या लाडू प्रसादात तुपाऐवजी प्राण्याची चरबी वापरत होते.
  • लाडू तयार करतांना शुद्ध तुपाऐवजी प्राण्याची चरबी वापरली जात होती.
  • आता आमच्या सरकारच्या काळात लाडू बनवण्यासाठी शुद्ध तुपाचा वापर करण्यात येत आहे.
Tirumala Tirupati Laddu

चंद्राबाबू म्हणाले तिरूपति देवस्थानात अतिशय निकृष्ट दर्जाचा प्रसाद तयार केला जायचा. याबाबत आम्ही आधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रसादच नव्हे तर अन्नदानम अर्थात जे अन्नदान मंदीरातर्फे केलं जातं त्याचा दर्जाही खालावला होता. त्यांनी देवस्थानातील पावित्र्य घालवलं. आता आमच्या सरकारच्या काळात लाडू बनवण्यासाठी शुद्ध तुपाचा वापर करण्यात येत आहे. तसंच मंदिरातर्फे दिल्या जाणाऱ्या अन्नदानाचा दर्जाही आम्ही सुधारला आहे. असं चंद्राबाबू नायडू म्हणाले.

राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणी धक्कादायक केले खुलासे

राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाणे आपल्या अहवालात तिरूमला तिरूपति देवस्थान (TTD) द्वारे संचालित तिरूपति इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिराचे लाडू बनवण्यासाठी चरबी अनि माशांच्या तेलाचा वापर करण्यात आल्याचं म्हटलं हे तिरूपति मंदिरातील लाडू आणि अन्नदानाचे नमुने तपासल्यानंतर बोर्डाच्या अहवालात हा मोठा खुलासा झाला आहे. देवाला अर्पण केल्यानंतर हे लाडू प्रसाद म्हणून भक्तामध्ये वाटले जातात. त्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.

तपासानंतर प्रसादात फक्त तुपाचा वापर – टीटीडी युनियन लिडर्स

तिरूमला तिरूपति देवस्थानचे लेबर युनियनचे माजी हंगामी अध्यक्ष कंदारापू मुरली म्हणाले मुख्यमंत्र्यांनी तिरूपति देवस्थानातील प्रसादाबाबत केलेले आरोप गंभीर आहेत. या आरोपांनी टीटीडी कर्मचाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तिरूपति देवस्थानातील लाडू टीटीडीच्या मार्गदर्शन सूचनेनुसार तयार केले जातात. त्यासाठी एक विशेष प्रयोगशाळा देखील आहे, जेथे प्रसादासाठी लागणारा प्रत्येक घटक तपासल्या नंतरच पुढची प्रक्रिया पर पडली जाते.

हे सर्व केंद्र सरकारच्या देखरेखीखाली पार पडतं, असं कंदारापू मुरली म्हणाले टीटीडीच्या पुष्टी नंतरच प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तु कर्मचाऱ्यांकडे पाठवल्या जातात, असंही त्यांनी सांगितलं.

Tirumala Tirupati Laddu

Tirumala Tirupati Laddu: कोणी काय प्रतिक्रिया दिली?

मात्र तेलुगू देसम पार्टी (TDP) सरकारच्या स्थापनेनंतर 23 जुलै रोजी पार पडलेल्या पत्र परिषदेत तिरूमला तिरूपति देवस्थानचे कार्यकारी अधिकारी (TTD EO) यांनी प्रसादातिल भेसळीबाबत भाष्य केले होते. प्रसाद (Tirumala Tirupati Laddu) तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात मार्जरीन सारख्या वनस्पती तुपाचा वापर करण्यात आल्याचं ते म्हणाले होते. प्रसादासाठी लागणाऱ्या तुपाचा पुरवठा करणाऱ्या पाच पुरवठादारांपैकी एकाने ही चूक केल्याचे त्यांनी सांगितले होतं.

तर तिरूमला तिरूपति देवस्थान बोर्डातिल माजी सदस्यांपैकी एक असलेल्या रामन्ना यांनी चंद्राबाबू यांच्या आरोपांच समर्थन केलं. त्यांनी वायएसआरसीपी सरकारच्या काळात मंदिरात तयार होणाऱ्या लाडूमध्ये प्राण्याच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचं मान्य केलं.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!