टीम इंडियाच्या कोचपदासाठी ‘गौतम गंभीर’ या दिवशी सांभाळणार पदभार

Team India Head Coach

Team India Head Coach: टी-20 विश्वचषक 2024 चा शेवट जवळ येत आहे. त्यामुळे भारताच्या नव्या प्रशिक्षकाबाबतही चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. या विश्वचषकानंतर विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय जोमाने नव्या प्रशिक्षकाचा शोध घेत आहे. दैनिक जागरणच्या वृतानुसार, भारताचा नवा प्रशिक्षक (Team India Head Coach) म्हणून माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरचे नाव निश्चित झाले आहे. जूनच्या अखेरीस त्यांची औपचारिक घोषणा केली जाईल.

गौतम गंभीर गेल्या काही वर्षापासून आयपीएल मध्ये मार्गदर्शक म्हणून उत्तम कामगिरी करत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट राइडर्स यंदाच्या मोसमात चॅम्पियन बनले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत तो लखनऊ सुपर जायंट्सचा भाग होता. त्यावेळी लखनऊ संघही गंभीरच्या नेतृत्वाखाली चांगला खेळत होता. त्यामुळेच सध्या भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Team India Head Coach
Team India Head Coach

गौतम गंभीरणे भारताच्या मुख्य प्रशिक्षक होण्यास होकार दिला आहे. त्याने बीसीसीआयला कळवले आहे की तो त्यांच्या कोचिंग स्टाफसह काम करायला तयार आहे. सध्या भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आहेत. गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पारस म्हाबरे यांच्या खांद्यावर आहे. त्याचवेळी टि. दिलीप हे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आहेत.

गौतम गंभीर होणार टीम इंडियाचा हेड कोच

गौतम गंभीर संध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 30 जून रोजी T20 वर्ल्ड कपनंतर लगेचच संपत आहे. अलीकडील काही रिपोर्टसनुसार, द्रविड नंतर गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे. मात्र, त्यांनी बीसीसीआय समोर काही मागण्या ठेवल्या होत्या त्या बोर्डाने मान्य केल्या आहेत.

Team India Head Coach

Team India Head Coach: मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत गंभीरचे काय मत?

अलीकडील, बीसीसीआय चे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले होते की, वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा प्रशिक्षक असणार नाही. अशा परिस्थितीत तिन्ही फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध असेल, जो 3.5 वर्षासाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत गौतम गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे. या माजी सलामीवीराने सांगितले की, मला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायला आवडेल.

गौतम गंभीर म्हणाला होत की, आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. तुम्ही 140 कोटी भारतीयांचे आणि जगभरातील त्याहूनही अधिक भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहात आणि जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता, जेव्हा यापेक्षा मोठे काहीही कसे असू शकते? भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी मदत करणारा इ नाही तर 140 कोटी भारतीय आहेत, जे टीम इंडियाला विश्वचषक जिंकण्यास मदत करतील. जर सर्वानी आमच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करू लागलो तर भारत विश्वचषक जिंकेल.

बीसीसीआय समोर ठेवल्या ह्या अटी

  • बीसीसीआय ने दिलेला प्रस्ताव गंभीरने मान्य केला, मात्र काही अटी शर्ती देखील. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने गंभीरसोबत चर्चा केली असून टी- 20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर तो राहुल द्रविडची जागा घेणार आहे,
  • या वृतात म्हंटल आहे की, जर त्याला स्वताहून सपोर्ट स्टाफ निवडण्याची अनुमति दिली गेली तरच तो या पदाचा स्वीकार करेल. बीसीसीआयने त्यांची ही यात मान्य केली असून लवकरच तो मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ स्वीकारणार आहे.
  • सध्या राहुल द्रविड हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. सध्या भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आहेत. गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पारस म्हाबरे यांच्या खांद्यावर आहे. त्याचवेळी टि. दिलीप हे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आहेत. यापूर्वी रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.
  • या वृतात असं देखील दावा करण्यात आला आहे की, गौतम गंभीर केवळ सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांमध्ये नव्हे तर संघातील खेळाडूंमध्ये देखील बदल करणार आहे. गौतम गंभीरने 2022 आणि 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स या संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पर पडली होती. त्यानंतर 2024 मध्ये त्याने कोलकाता नाइट राइडर्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका पर पडली. याचवर्षी कोलकाता नाइट राइडर्स संघाने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल.
टी-20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड कार्यकाळ संपणार

भारतीय संघाचे विद्यमान मुख्य कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 कप स्पर्धेनंतर संपणार आहे. बीसीसीआयने काही काळापूर्वी नव्या Team India Head Coach प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. दरम्यान, राहुल द्रविड या पदासाठी पुन्हा अर्ज करणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत गौतम गंभीरच्या नावासह अनेक नवे या शर्यतीत सामील होती.

गंभीरने बीसीसीआयला घातलेल्या 5 अटी

काही मिडिया रिपोर्टस नुसार गौतम गंभीरने कोच होण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. बीसीसीआयला देण्यात आलेल्या या अटी मान्य झाल्यानंतर त्याने प्रशिक्षकपदासाठी होकार दिला आहे. देशाला 2007 आणि 2011 साली वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गंभीरच्या अटी काय आहेत ते जाणून घ्या.

  • भारतीय क्रिकेट संघावर संपूर्ण नियंत्रण
  • सपोर्ट कोचिंग स्टाफ निवडण्याचे स्वातंत्र्य
  • CT 25 सिनिअर खेळाडूंना अखेरची संधी
  • भारताचा कसोटी संघ पूर्णपणे वेगळा
  • 2027 साली होणाऱ्या वर्ल्डकपसाठी रोड मॅप तयार
मुख्य प्रशिक्षकासाठी दोघांमध्ये चुरस?

रमण हे भारताचे माजी खेळाडू असून त्यांनी 2018 ते 2021 पर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाचे देखील मुख्य प्रशिक्षक पद भूषवल होत. गंभीर आणि रमण यांनी दोघांनी क्रिकेट सल्लागार समितीच्या मुलाखातीला व्हर्चूअली हजेरी लावली होती. क्रिकेट सल्लागार समितीत अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षण नाईक यांचा समावेश आहे.

राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून गौतम गंभीरच नाव चर्चेत आहे. मात्र न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार विव्ही रमण यांनी देखील अत्यंत सखोल प्रेझेंटेशन दिल. यामुळे क्रिकेट सल्लागार समिति चांगलीच प्रभावित झाली आहे. बीसीसीआय मधील एका सूत्राने सांगितले की रमण यांच्या प्रेझेंटेशनने त्यांचा समितीवर चांगलाच प्रभाव पडला आहे.

बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, गौतम गंभीर व्हर्चूअली मुलाखतीला हजर राहिला होता. मात्र रमण यांचे प्रेझेंटेशन खूप प्रभावी होत. क्रिकेट सल्लागार समिति उद्या विदेशी उमेदवारांची मुलाखत घेणार आहेत. सध्या गंभीरचं पारडं जड आहे. त्यांच्यासाठी चांगला अनुभव आहे. मात्र रमनच प्रेझेंटेशन दुर्लक्ष करण्यासारख नाही.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!