Teachers Day 2024: शिक्षक दिनानिमित्त “गुरुने दिला ज्ञानरूपी वसा..!” दमदार भाषण

Teachers Day 2024 Speech

Teachers Day 2024 Speech: तुम्हालाही शिक्षक दिनी तुमच्या भाषणाने सर्वांचा वाहवा मिळवायचा असेल, तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुमच्यासाठी असे भाषण तयार केले आहे, जे ऐकल्यानंतर समोरची व्यक्ति तुमची स्तुति केल्याशिवाय राहणार नाही, तसेच टाळ्या वाजवण्यापासून स्वतला रोखू शकणार नाही. या अप्रतिम भाषणाची मग तयारी सुरू केलीच पाहिजे. या शिक्षक दिनी तुम्हीही भाषण देणार असाल, परंतु ते कसे सुरू करायचे आणि कुठे संपवायचे याबद्दल संभ्रमात असाल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही तुमच्यासाठी त्याचे एक अप्रतिम भाषण घेऊन आलो आहोत, जे खास अशा लोकांसाठी बनवले आहे, ज्यांना या दिवशी एक उत्कृष्ट आणि हृदयस्पर्शी भाषण द्यायचे आहे. या लेखाच्या मदतीने आम्ही तुमचे कम सोपे केले आहे.

Teachers Day 2024 Speech

Teachers Day 2024 Speech: शिक्षक दिन साजरा का करतात?

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (Teachers Day 2024 Speech) म्हणून साजरा करण्यात येतो. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषवली असली, तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकांची ओळख त्यांनी जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये सर्वप्रथम सण 1962 मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रूपात साजरा करणे माझ्यासाठी गौरवास्पद असेल. असे राधाकृष्णन यांनी संगीतल्याची आठवण सांगितली जाते. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी अनेक स्पर्धा देखील घेतल्या जातात.

Teachers Day 2024 Speech: तुमच्या साठी सुंदर असे भाषण

आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो

आज आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत. हा दिवस असा आहे, जेव्हा आपण आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाहीत, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करतात. ते आपल्या जीवनाचे दिवे आहेत, जे आपल्याला अंधारात मार्ग दाखवतात. मी माझ्या सर्व शिक्षकांचे मन: पूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो. कारण तुम्ही मला फक्त अभ्यास करायला शिकवलं नाहीत. तर एक चांगला माणूस व्हायलाही शिकवलं. जीवनात स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला नेहमीच प्रेरणा दिली आहे. आज मी जो काही आहे, त्याचे श्रेय तुम्हाला जाते, कारण तुमच्या प्रेरणेशिवाय कल्पनाही करता आली नसती.

मला आठवतं.. मी पहिल्यांदा शाळेत आलो तेव्हा खूप घाबरलो होतो. पण तुम्ही मला खूप प्रेम आणि आपुलकी दिली. तुम्ही मला नेहमी प्रोत्साहन दिले आणि माझ्या चुकांमधून शिकण्यास मदत केली. तुम्ही मला सांगितलेस की,अपयश ही वाईट गोष्ट नाही, आपण त्यातून शिकतो आणि पुढे जातो. तुम्ही मला केवळ विषयांचे ज्ञान दिले नाही तर जीवनमूल्ये ही शिकवलीत. इतरांचा आदर कसा करायचा, कठोर परिश्रम कसे करायचे आणि यशाच्या पायऱ्या कशा चढायच्या हे तुम्ही मला शिकवले. तुम्ही मला सांगितले की, आयुष्यात आव्हाने येतील, पण आपण कधीही हार मानू नये.

Teachers Day 2024 Speech
Teachers Day 2024 Speech

आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे. तुम्ही माझे गुरुच नाही, तर माझे मित्रही आहात तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले. मला माहीत आहे की, शिक्षक बनणे हे खूप कठीण काम आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस बनविण्यासाठी मेहनत घेता. जेणेकरून आमचे एक चांगले भविष्य घडू शकेल. तुमची निस्वार्थ सेवा आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. मी सर्व शिक्षकांना विनंती करतो /करते की नेहमीप्रमाणे आम्हाला प्रेरणा डेट रहा. तुमच्या मार्गदर्शना शिवाय आम्ही काही नाही.

आज मी तुम्हा सर्वाना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. शिक्षक दिन हा केवळ एक दिवस नसून आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्व लक्षात आणून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस आहे. शिक्षक हेच आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावतात. ते आपल्याला योग्य आणि अयोग्य यात फरक करायला शिकवतात. ते आपल्याला एक चांगली व्यक्ति बनण्यास करतात. मी माझ्या शिक्षकांना वचन देतो की तुम्ही मला दिलेल्या ज्ञानाचा मी चांगला उपयोग करेन, मी नेहमीच कठोर परिश्रम करेन आणि माझे ध्येय साध्य करेन.

शेवटी, मी पुन्हा एकदा माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानतो. तुम्ही सगळे माझ्यासाठी खूप खास आहात, खूप खूप धन्यवाद

जय हिंद!

Teachers Day 2024 Speech: शिक्षक दिनानिमित्त वर्गात लिहिण्यासाठी सुविचार

  1. गुरु हा तो दीप आहे, जो आज्ञानाच्या अंध:कारात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो.
  2. शिक्षक हा मार्गदर्शक आहे, जो विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा दाखवतो.
  3. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार.
  4. गुरु शिवाय जीवन अधुरे आहे; गुरूंनी दाखवलेला मार्गच आपल्याला यशाकडे नेतो.
  5. शिक्षक हा जीवनाचा पाया असतो आणि शिक्षक हा त्या पायाचा भक्कम आधारस्तंभ.
  6. गुरुशिवाय ज्ञान मिळवणे काठी, शिक्षक हे ज्ञानाचे खरे दूत आहेत.
  7. शिक्षकांच्या सहवासात शिकलेली प्रत्येक गोष्ट अमूल्य असते.
  8. शिक्षकांचे ज्ञान हे अमृतासारखे आहे, जे आपल्या जीवनाला सुसंस्कृत बनवते.
  9. शी.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ट, हे गुण विद्यार्थ्याला देऊ करणारा दुवा म्हणजे शिक्षक.
  10. शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत, ते स्वत: एकच ठिकाणी राहतात, परंतु इतरांना त्यांच्या लक्ष्या कडे घेऊन जातात.
Teachers Day 2024 Speech
Teachers Day 2024 Speech

Teachers Day 2024 Speech: तुमच्या शिक्षकांना शुभेच्छा पाठविण्यासाठी काही शुभेच्छा

शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत, नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना शत शत नमन! शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण केवळ आमचे शिक्षक नाही, आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात, सर्व एका व्यक्तिमध्ये आकार घेतलेले तुमच्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू.

आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात, सारब एका व्यक्तिमध्ये आकार घेतलेले तुमच्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुवीण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न् होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया.. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!