T-20 World cup 2024
Saurabh Netravalkar: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली असा खेळाडू आहे, ज्याच्यासमोर खेळपट्टी आणि घातक गोलंदाज यांचा फारसा फरक पडत नाही. पण 2024 च्या टी-20 (T-20 World cup 2024) विश्वचषकात विराट कोहलीची त्याच्या नावाप्रमाणे तळपताना दिसत नाही. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात विराट 10 धावाहि करू शकला नाही. दुसरीकडे रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून स्पर्धेची सुरुवात केली. मात्र अमेरिकेसारख्या लहान संघासमोर दोन्ही दिग्गज निष्प्रभ ठरले. अमेरिकन संघाचा मास्टरमाइंड सॉफ्टवेअर इंजिनीअरने रोहित-विराटला आउट करण्याचा कोस असा क्रॅक केला की, ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
आम्ही बोलतोय त्या सौरभ नेत्रावळकर बद्दल ज्याने सुपर ओव्हर मध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांना आपल्यासमोर गुडघे टेकायला लावले होते. यानंतर आता याच सौरभ नेत्रावळकरने भारताविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना पुन्हा एकदा आपली घाप सोडली आहे. सौरभ नेत्रावळकरने विराट- रोहित सारख्या दिग्गजांनाही लोटांगण घालायला भाग पाडले. त्याबरोबर आयसीसी स्पर्धेत विराट कोहलीला गोल्डन डकवर आउट करणारा सौरभ नेत्रावळकर पहिला गोलंदाज ठरला आहे. यानंतर पुढच्या षटकात नेत्रावळकरने स्फोटक रोहित शर्मालाही आपल्या जाळ्यात अडकवले. अवघ्या 10 धावांवर टीम इंडियाने दोन विकेट गमावल्या होत्या.
अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे स्वप्न घेऊन तो अमेरिकेत स्थायिक झाला. पण नेत्वत्राळकरांच्या रक्तातील क्रिकेट टॅलेंट त्याला शंत बसू देत नव्हते. म्हणून त्याने अमेरिकेत आपला क्रिकेट जोपासत अमेरिकेच्या संघात मजल मारली. विषेश म्हणजे यापूर्वी तो भारतीय संघासाठी अंडर-19 चा विश्वचषक खेळला आहे. त्याचबरोबर त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता तो 2024 च्या टी-30 विश्वषटकात फलंदाजांसाठी काळ ठरताना दिसत आहे. नेत्रावळकरने पाकिस्तान विरुद्धच्या आपल्या प्राणघातक गोलंदाजीने चर्चेत आला.
T-20 World cup 2024: कोण आहे सौरभ नेत्रावळकर?
क्रिकेट पुन्हा कधी खेळायला मिळेल अशी अशा अपेक्षाही नव्हती. पण खेळायला मिळतंय, यासाठी मी कृतज्ञ आहे. हे वाक्य आहे सौरभ नेत्रावळकर यंच. सौरभ मूळचा मुंबईचा, पण आता तो अमेरिकेच्या संघाकडून क्रिकेट खेळतोय. एकेकाळी भरच्या अंडर-19 सांगाकडून खेळलेला सौरभ नेत्रावळकर शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, तेव्हा आता आपल्याला क्रिकेटमध्ये संधी नाही. हे त्यान गृहतच धरल्यासारखे होते. पण कुणी म्हणत ना तास सच्चा मुंबईकर मुंबईबाहेर गेला तरी त्याच्यातलं क्रिकेटप्रेम संपत नाही सौरभच तसंच झालं.
अमेरिकेत शिकतानाही तो मिळेल तेव्हा मिळेल तस क्रिकेट खेळत राहिला आणि आता थेट आयसीसी टी-20 विश्व चषकात दर त्याच्यासाठी उघडल आहे. मुंबईच्या मैदानापासून अमेरिकेन टीमपर्यंत सौरभचा प्रवास म्हणजे खेळवरच्या प्रेमाचीच गोष्ट आहे. स्वप्न पाहण का सोडू नये आणि संधीच सन कराव याच हे उदाहरणच आहे. सौरभशी आम्ही त्याविषयीच संवाद साधला.
अंडर-19 टीममधील कामगिरी
- सौरभ नेत्रावळकरचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. तो मुंबईच्या मालाड उपनगरात लाहानच मोठा झाला जणी दहाव्या वरक्षपासून क्रिकेट प्रशिक्षण घेऊ लागला. मुंबईच्या मैदानावर सराव करत, शले क्रिकेटमध्ये धडे गिरवत सौरभची वाटचाल सुरू होती. पण त्याच नाव खऱ्या अर्थानं पहिल्यांदा समोर आल ते 2008-09 च्या मोसमात. त्यावर्षी बीसीसीआयच्या कुचबिहार ट्रॉफी या अंडर -19 क्रिकेट स्पर्धेत सौरभनं सहा सामन्यात 30 विकेट्स असही चमकदार कामगिरी केली होती.
- एरवी मुंबई फलंदाजांची खान म्हणून ओळखली जाते. त्यामुळे इथल्या एखाद्या युवा गोलंदाजानं, विशेषत:वेगवान गोलंदाजांची उत्तम कामगिरी लगेच लक्ष वेधून घेते. साहजिकच उंचापुरा, शिरशिडीत बांध्याच्या डावखुरी जलदगती गोलंदाजी करणारा सौरभ चर्चेत आला. 2010 साली दक्षिण आफ्रिकेत तिरंगी मालिकेत सौरभनं आठ विकेट्स काढल्या आणि पाठोपाठ न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषकातही त्यानं नऊ विकेट्स काढल्या.
- त्यावेळी केएल राहुल, मयंक अगरवाल, जयदेव उनाडकर हे सौरभसोबत अंडर-19 संघात होते. पण त्यांना भारतीय संघापर्यंत पोहोचता आल, तस सौरभच झालं नाही. क्रिकेटबरोबरच सौरभला अभ्यासाचीही आवड होती. एकीकडे त्यानं 2009-13 या काळात मुंबईच्या सरदार पटेल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केल.
- तो सांगतो, 2013 साली इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली होती पुण्यात. तेव्हा मी ठरवल होत की दोन वर्ष तरी नोकरी कारीची नाही, आणि क्रिकेटलाच वेल द्यायचा. मला मुंबई टीमसाठी प्रयत्न करायचा होता. त्या वर्षीच माझ मुंबई रणजी संघात पदार्पण झालं. दोन वर्ष सौरभनं प्रयत्न केले, पण संघात स्पर्धा इतकी होती की लगेच त्याला स्थान पक्क करता आल नाही आणि आयपीएल मध्येही संधी मिळाली नाही.
T-20 World cup 2024: क्रिकेटर ते क्रिकेट अँप डेव्हलपर
अवघ्या 23 वर्षाच्या वयात क्रिकेटर्सच्या कारकिर्दीत खरी सुरुवात होते. पण त्या वयात सौरभनं क्रिकेट सोडायचं ठरवल. सौरभ सांगतो, “तेव्हा एक द्विधा मनस्थिति होती- क्रिकेट सोडून पुन्हा अभ्यासावर पूर्णत: लक्ष द्यायच की नाही?”
मुंबई रणजी संघातल स्थान निश्चित होत नव्हत आणि पुढे भारतासाठी खेळायला मिळेल असं मार्ग तेव्हा दिसत नव्हता. त्यामुळे मी अमेरिकेत मास्टर्ससाठी प्रवेश परीक्षा दिली होती. माझ्या सोबत इंजिनियरिंग करणारे अनेकजण अमेरिकेत शिकत होते, त्यांचे अनुभव मला माहीत झाले होते. मास्टर्स साठी न्यूयॉर्कच्या कॉर्नल विद्यापीठात प्रवेश मिळाला, जे कॉम्प्युटर सायन्ससाठी जगातल्या आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक मानल जात.
2015 साली पुढच्या शिक्षणासाठी सौरभ अमेरिकेला निघून गेला. पुढे वर्षभरात त्याला ओरॅकल या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीही मिळाली. सौरभनं या काळात क्रिकेटविषयीचं एक अँपही तयार केल होत. अलीकडच्या काळात इन्स्टाग्रामवर त्याच्या योगा आणि गाण्याच्या व्हीडियोचीही चर्चा झाली.
T-20 World cup 2024: भारताविरुद्ध खेळण्याचे आव्हान
टी-20 विश्वचषका आधी झालेल्या टी-20 मालिकेत (T-20 World cup 2024) यूएसए नं बांग्लादेशवर मत केली. त्या विजयानं आपल्या टीमला नवा आत्मविश्वास मिळाल्याच सौरभ सांगतो. मग 2 जूनला स्पर्धेच्या पाहिया सामन्यात अमेरिकेन टीमनं कॅनडाला हरवलं तर 6 जूनला थेट पाकिस्तानला धूळ चारली. अमेरिकेच्या या विजयात भारतीय वंशाच्या सौरभ नेत्रावळकर याने चमकदार कामगिरी केली.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सात बळीच्या मोबदल्यात 159 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात अमेरिकेने 20 षटकात 3 विकेट गमावून 159 धावा केल्या त्यानंतर सामना बरोबरीत सुटला. मग सुपर ओव्हर खेळण्यात आली. ज्यामध्ये अमेरिकेने 18 धावा केल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 13 धावा करू शकला. आता 12 जूनला यूएसएला भारताचा सामना करायचा आहे. भारताविरुद्ध खेळण हा एक भावनिक क्षण असेल, अस सौरभ सांगतो.
मी लहानपणी अंडर-19 क्रिकेट भारतासाठी खेळलेलो आहे. माझ्यासोबत एके काळी खेळलेले अनेकजण सध्या भारतीय संघात आहेत. त्यांना पुन्हा भेटता येईल ही छान वाटतंय. त्याच्यासाठी मी खुश आहे की त्यांनी क्रिकेटमध्ये करियर घडवल आणि भारतासाठी तसच आयपीएलमध्ये चांगल खेळतायत. आम्ही मर्यादित सुविधामध्ये सराव करून इथे आलो आहोत, आणि ते तासंतास क्रिकेट खेळतात. आपले सर्वोत्तम प्रयत्न कारीचे, हे आमच्या हाटी आहे. त्या तीन तासांत आम्ही उत्तम खेळण्याचा प्रयत्न करू.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!