SM Krishna Passed Away
SM Krishna Passed Away: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सोमनहल्ली मल्लैया कृष्णा उर्फ एस एम कृष्णा यांचे प्रदीर्घ आजारामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी (SM Krishna Passed Away) अखेरचा श्वास घेतला. त्यांची वयाच्या 92 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. एस एम कृष्णा यांचे पार्थिवावर उदय सकाळी मंड्या जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी सोमनहल्ली येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत. 2023 मध्ये केंद्र सरकारने एसएम कृष्णा यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. सध्या ते भाजपशी जोडलेले होते. एस एम कृष्णा यांच्या निधनावर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यासह भाजप आणि कॉँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
बंगळुरूची ‘सिलिकॉन व्हॅली’ करण्यात त्यांचा मोठा हातभार होता. आयुष्याची पाच दशकं कॉँग्रेस सोबत घालवल्या नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. एस एम कृष्णा यांनी भूषवलं नाही असं संसदीय राजकारणातील क्वचित एखादं पद राहिलं असेल. एस एम कृष्णा यांच्या पश्चात पत्नी प्रेमा कृष्णा आणि दोन मुली मालविका कृष्णा आणि शांभवी कृष्णा असा परिवार आहे.
SM Krishna Passed Away: एस एम कृष्णा राजकीय कारकीर्द
1 मे 1932 रोजी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील सोमनहल्ली येथे कृष्णा (SM Krishna Passed Away) यांचा जन्म झाला. त्यांनी 1960 मध्ये राजकीय खेळी सुरू केली. 1962 मध्ये त्यांनी मददूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणूनण निवडणूक लढवली आणि कॉँग्रेस उमेदवाराचा पराभव करून निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला आणि 1968 मध्ये मंड्या लोकसभा पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर एस एम कृष्णा यांनी कॉँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि मंड्या लोकसभा मतदारसंघातून 1971 मध्ये पुन्हा निवडणूक जिंकली. 1972 मध्ये विधानपरिषेदेवर निवडून आल्यावर त्यांनी राज्याच्या राजकारणात परतणे पसंत केले. यावेळी त्यांनी वाणिज्य, उद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून 1972 ते 1977 या काळात धुरा सांभाळला.
1980 मध्ये लोकसभेत परतले. 1983 – 84 पर्यंत त्यांनी उद्योग राज्यमंत्री आणि 1984 – 85 पर्यंत अर्थ राज्यमंत्री म्हणून काम पहिले. 1989 मध्ये कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, तर 1992 मध्ये ते कर्नाटक उपमुख्यमंत्री झाले. 1996 मध्ये राज्यसभेचे अध्यक्ष. तर 1999 पर्यंत त्यांनी सदस्यत्व भूषवले. 1999 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते कर्नाटक प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. निवडणुकीत पक्षाचा विजय झाला. ते ऑक्टोबर 1999 ते 2004 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. डिसेंबर 2004 ते मार्च 2008 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून तर मे 2009 ते ऑक्टोबर 2009 ते ऑक्टोबर 2012 पर्यंत मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये परराष्ट मंत्री म्हणून काम केलं.
SM Krishna Passed Away: ‘ब्रॅंड बंगळुरू’ चे प्रवर्तक
ज्यावेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना ‘ब्रॅंड बेंगळुरू’ चे प्रवर्तक म्हणून एस एम कृष्णा ओळखले जातात. त्यांच्याच कार्यकाळ कलिफोर्नीयाच्या सिलिकॉन व्हॅलीला पर्याय म्हणून बेगळुरू आयटी हब म्हणून विकसित झालं आणि हजारो तरुणांना रोजगार मिळाला. 2022 मध्ये कृष्णा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून पत्र ‘ब्रॅंड बेंगळुरू’ साठी कठोर पावलं उचलून त्याचं संरक्षण करण्याची मागणी केली होती. कृष्णा सरकारनं 1999 मध्ये स्थापन केलेल्या बेंगळुरू अजेंडा टास्क फोर्सची (बीएटीएफ) पुनर्रचना करण्याची सूचना त्यांनी केली होती. यात विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश होता. जेणेकरून भविष्यकालिन दृष्टिकोन ठेवून शहराच्या विकासाचा आराखडा तयार केला जाईल.
सार्वजनिक जीवनातील योगदाना बद्दल एस एम कृष्णा यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत.
SM Krishna Passed Away: प्राध्यापक ते राजकारणी
एस एम कृष्णा हे मूळचे कॉँग्रेसी होते. तब्बल 45 वर्षाहून अधिक काळ कॉँग्रेसमध्ये काम केलेल्या कृष्णा यांनी 2917 साली पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले होते. मात्र वयोमानामुळे सक्रिय राजकारणात नव्हते. 1 मे 1932 रोजी जन्मलेले कृष्णा उच्च विद्याभूषित होते. त्यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेज मधून पदवी घेतली. बैंगळुरूच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली आणि नंतर अमेरिकेतील डलास येथील सदर्न मेथोडीक्स् युनिव्हर्सिटी आणि नंतर जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर भारतात त्यांनी बेंगळुरूच्या रेणुकाचार्य विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून काम केलं. कालांतराने ते राजकारणात सक्रिय झाले.
- कॉंग्रेस सोबत पन्नास वर्षाचे नाते तोडले:2017 मध्ये कृष्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कॉँग्रेससोबतचं जवळपास 50 वर्षाचं नातं संपवलं. कॉँग्रेस संभ्रमावस्थेत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काही महिन्यांपूर्वीच कृष्णा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.
- महाराष्ट्राचे राज्यपाल: डिसेंबर 2004 ते मार्च 2008 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून तर मे 2009 ते ऑक्टोबर 2009 ते ऑक्टोबर 2012 पर्यंत मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये परराष्ट मंत्री म्हणून काम केलं.
- तरुणांसाठी रोजगार: ज्यावेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना ‘ब्रॅंड बेंगळुरू’ चे प्रवर्तक म्हणून एस एम कृष्णा ओळखले जातात. त्यांच्याच कार्यकाळ कलिफोर्नीयाच्या सिलिकॉन व्हॅलीला पर्याय म्हणून बेगळुरू आयटी हब म्हणून विकसित झालं आणि हजारो तरुणांना रोजगार मिळाला. 2022 मध्ये कृष्णा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून पत्र ‘ब्रॅंड बेंगळुरू’ साठी कठोर पावलं उचलून त्याचं संरक्षण करण्याची मागणी केली होती.
- अपक्ष उमेदवार म्हणून पहिली निवडणूक जिंकली: त्यांनी 1960 मध्ये राजकीय खेळी सुरू केली. 1962 मध्ये त्यांनी मददूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणूनण निवडणूक लढवली आणि कॉँग्रेस उमेदवाराचा पराभव करून निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला आणि 1968 मध्ये मंड्या लोकसभा पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर एस एम कृष्णा यांनी कॉँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि मंड्या लोकसभा मतदारसंघातून 1971 मध्ये पुन्हा निवडणूक जिंकली.
- अमेरिकेतील डलास येथील सदर्न मेथोडीक्स् युनिव्हर्सिटी आणि नंतर जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर भारतात त्यांनी बेंगळुरूच्या रेणुकाचार्य विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून काम केलं. कालांतराने ते राजकारणात सक्रिय झाले.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!