Sitaram Yechury Death
Sitaram Yechury Death: मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे जेष्ठ नेते सीताराम येच्युरी यांच गुरुवारी निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिनाभरापासून सीताराम येच्युरी यांच्यावर उपचार सुरू होते. त्याच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात होते. प्रकृती खालावल्यामुळे मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (दि. 12 सप्टेंबर) अखेर त्यांची प्राणज्योती मालवली. ताप अशक्तपणा जाणून लागवल्या नंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यानच 72 वर्षीय येच्युरी यांचे निधन झाले. 2015 साली ज्येष्ठ नेते प्रकाश करात यांच्यानंतर सीताराम येच्युरी यांची मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती झाली होती.
त्यानंतर 2018 आणि 2022 साली त्यांना दोन वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली. डाव्या पक्षातील निर्णय प्रक्रियेत महासचिव हे सर्वोच्च पद मानले जाते. भारतीय कम्युनिष्ट पक्षाकडून त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुण यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. यानुसार आज दुपारी 3 वाजून 3 मिनिटांनी सीताराम येच्युरी यांचं निधन झाले. श्वसन मार्गात जंतु संसर्ग झाल्यामुळे आणखीन क्लिष्ट अशा व्याधी निर्माण झाल्या होत्या, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. कॉमरेड येच्युरी यांच्यावर सर्वोत्तम उपचार आणि त्यांची चांगली काळजी घेतल्याबद्दल आम्ही एक्सचे डॉक्टर, नर्स आणि संचालकांचे आभार मानतो. त्यांच्या अंत्यसंस्काराची वळ व इतर तपशील कळवण्यात येतील, असंही या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
सीताराम येच्युरी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. सीताराम येच्युरीनी कॉलेज जीवनापासून राजकारणात सहभाग नोंदवत होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. तेव्हापासूनच तीनच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दनही सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले होते.
Sitaram Yechury Death: राहुल गांधी यांची मित्र गमावल्याची भावना
कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. एक मित्र गमावल्याची भावना व्यक्त करत त्यांनी लिहिल की, सीताराम येच्युरी चांगले मित्र होते. त्यांना देशाची सखोल माहिती होती आणि ते आयडीया ऑफ इंडिया चे संरक्षक होते. आमच्यात होणाऱ्या चर्चा माझ्या कायम स्मरणात राहतील. या कठीण प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व कार्यकर्त्यासोबत माझ्या सद्भावना आहेत, असं राहुल गांधीनी म्हटलं आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येच्युरी यांना 19 ऑगस्ट रोजी दिल्लीतिल एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आधी आपत्कालीन विभागात आणि नंतर अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलं.
माकपचे नेते हन्नान मोल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी कालवश झाले आहेत. अशी माहिती दिली. सीताराम येच्युरी भारतीय राजकारणातील दिग्गज नेते होते. विशेषत डाव्या चळवळी मधील राष्ट्रीय स्तरावरील मोठं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिलं जायचं. 32 वर्षापासून ते माकपच्या पॉलिट ब्यूरोचे (राष्ट्रीय कार्यकारीणी) सदस्य होते. ते 2015 पासून पक्षाचे सरचिटणीस होते. सीताराम येच्युरी 2005 पासून 2017 पर्यंत राज्यसभेचे हसदार राहिले. गेल्या महिन्यात 22 ऑगस्ट रोजी त्यांना एम्स मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी येच्युरी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनी संदेशामध्ये म्हटलं होत की, मला एम्स मधून बुध्दो दा यांना आदरांजली अर्पण करावी लागत आहे. आणि लाल सलाम म्हणावं लागत आहे, ही बाब फारच दुर्दैवी आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तुणमुल कॉँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत म्हटलं की सीताराम येच्युरी यांच्या निधनाचं वृत्त ऐकुन फारच दु:ख झालं. राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता, त्यांच्या जाण्यामुळे मोठी हानी झाली आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांप्रती मी संवेदना व्यक्त करते.
Sitaram Yechury Death: राजकीय प्रवेश आणि जीवन
सीताराम येच्युरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षक हैदराबाद येथे झाले आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रातील पदवी प्राप्त केली. पुढे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले. जिथे त्यांच्या राजकीय करकीर्दीला सुरुवात झाली. 1970 च्या दशकात विद्यार्थी संघटनेत सामील झाले. कालांतराने ते SFI चे प्रमुख नेते बनले आणि या संघटनेचे अध्यक्षही झाले. 1984 साली येच्युरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरो मध्ये नियुक्ती झाली पक्षाचे मुखपत्र असलेल्या पीपल्स डेमोक्रसीचे अनेक वर्ष संपादकपदही त्यांनी भूषविले. 2015 साली ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्त झाले. यादरम्यान त्यांनी तब्बल 12 वर्ष राज्यसभेत खासदार म्हणून काम केलं. या काळात त्यांनी कामगार, मागासवर्ग, मध्यमवर्ग या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडल्या.
भाजपा आणि संघाचे कडवे टीकाकार
भाजपा आणि संघावर कॉँग्रेस पेक्षाही अधिक कडवी टीका सीताराम येच्युरी यांनी केलेली आहे. लोकसंवाद या कार्यक्रमात राम मंदिरावर बोलताना ते म्हणाले होते. महात्मा गांधी किंवा राम मनोहर लोहिया यांनी रामाचा उल्लेख केला असला तरी तो राजकारणासाठी नव्हता. त्यामागे रामराज्य किंवा रामाची पूजा करणे हा उद्देश होता. भाजपकडून रामाचा नेहमी राजकीय फायद्यासाठीच वापर केला गेला. यामुळेच भाजपची मंडळी जय श्री राम असाच उल्लेख करतात. ते जय सियाराम असे म्हणत नाहीत. भाजप किंवा रा. स्व. संघाचे हिंदुत्व हे नेहमीच उच्चवर्णीयांचे किंवा ब्राम्हणवादी राहिले आहे. त्यांच्या हिंदुत्वाचा सारा ढाचा हा मनुस्मूतिवर आधारित आहे. समाजाची रचना कशी असावी याचे स्वरूपही संघ परिवाराने मनुस्मूतिनुसारच केले आहे.
महिलांना कशी वागणूक दिली जाते हे त्याचेच उदाहरण आहे. खाप पंचायतीना अजूनही प्रोत्साहन दिले जाते. मनुस्मूतिला एक प्रकारे बळ देण्याचे कामच या सरकारने केले आहे. उच्चवर्णीयांचेच हिट जपले जाते हे सुद्धा अनुभवास आले आहे.
Sitaram Yechury Death: राजकारणातील एक महत्वाचा आवाज म्हणून समोर आले
सीताराम येच्युरी हे भारतातील प्रख्यात मार्क्सवादी नेते असून, त्यांची राजकीय जडण घडण डाव्या विचारांच्या चळवळीत झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच (CPI(M) चा एक सामान्य कार्यकर्ता ते महासचिव या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा ट्यांचा राजकीय प्रवास आहे. डाव्या विचारसरणीशी असलेली एकनिष्टता अनुषंगाने घेतलेल्या भूमिका आणि त्या भूमिकांसाठी वेळोवेळी राजकीय किंमत मोजण्याची तयारी, या गुणांमुळे ते भारतीय डाव्या राजकारणातील एक महत्वाचा आवाज म्हणून समोर आले.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!