Sikkim Flood News
Sikkim Flood News: सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात संततधार पावसाने झालेल्या भूस्खलनामुळे (Sikkim Landslide) 15 परदेशी नगरिकांसह 1200 हून अधिक पर्यटक अडकले आहेत. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. राज्यात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मोठ नुकसान झाला आहे. मोठ नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मिळालेल्या Sikkim Flood News वृत्तानुसार, जवळपास 1200 हून अधिक पर्यटक हे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत. सिक्कीम पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाने प्रधान सचिव सी. एसराव यांनी एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. मंगन जिल्ह्यातील लाचुंगमध्ये, बांग्लादेशातील 10 जण अडकले आहेत.
सिक्कीम मधील मंगन जिल्ह्यातील लॅच्युन्ग व्हॅली येथे पडलेल्या मुसळधार पावसांमुळे रस्त्यावर दरड कोसळल्याने अनेक राज्यातील पर्यटक अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सिक्कीम मध्ये ढगफुटीमुळे Sikkim Heavy Rain जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार
- या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील पायाभूत सोयीसुविधांचं नुकसान झाले आहे.
- भूस्खलन झाल्याने लाचुंग शहरातील 15 परदेशीसह 1200 हून अधिक पर्यटक अडकले आहेत.
- यामुळे विविध भागातील वीज, खाद्य पुरवठा आणि मोबाइल नेटवर्कवर परिणाम झाला आहे.
- अडकलेल्या पर्यटकांना लाचुंग शहरातील विविध हॉटेलांमध्ये राहण्याची व्यवस्था आणि स्वस्तात जेवणाची सोय करण्यात आल्याची माहिती आहे.
सिक्कीम च्या मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
Sikkim Flood News मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलना नंतरच्या परिस्थितीचा आढावा गेनयसाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी मिटोंकगुंग येथे एका उच्च स्तरीय बैठक घेतली. डोंगराळ राज्याला भूस्खलनाचा मोठा फटका बसलेला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी अडकलेल्या पर्यटकांना आहेत. त्याठिकाणी थांबा आणि धोका पत्करू नका असं सांगितल आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या सर्व पर्यटकांसाठी रेशनचा पुरेसा साठा आहे. हवामानाच्या परिस्थिति नुसार सर्व पर्यटकांच्या हवाई मार्गाने आणण्यासाठी मुख्य सचिव कार्यालयाने केंद्राशी बोलणी सुरू केल्याच त्यांनी सांगितल, मंगनमधील जिल्हा प्रशासन, पोलिस आणि पर्यटन अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अडकलेल्या लोकांची सुटका करत आहे.
Sikkim Flood News: अनेक घरे गेली पाण्याखाली
आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले कि जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे भूस्खलन झालं ज्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली, नुकसान झालं, तर विद्युत खांब वाहून गेले. संततधार पावसांमुळे ही परिस्थिति निर्माण झाली आहे. संगकलांग येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांधलेला पूल कोसळला, ज्यामुळे उत्तर सिक्कीम मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक अडकले आहेत.
महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश; मुख्यमंत्र्यांकडून महत्वाचे निर्देश
सकाळी महाराष्ट्रातील पर्यटक सिक्कीममध्ये अडकल्याच वृत (Sikkim Flood News) कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काल दखल घेऊन राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे निर्देश राज्य प्रशासनाला दिले. त्यामुळे या सर्व पर्यटकांना वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने गंगटोक येथे सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार आहे. सिक्कीम येथे झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे तेथील स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ही बातमी मुख्यमंत्र्यांना माध्यमांद्वारे समजली. त्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडकलेल्या सर्व पर्यटकांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे निर्देशन दिले.
एवढ्यावर न् थांबता त्यांनी स्वत: सिक्कीम सरकारमधील वारिष्ट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून राज्यातील पर्यटकांना मदत मिळवून देण्याची विनती केली. तसेच तिथे अडकलेल्या पर्यटक सुनीता पवार यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला, तसेच त्यांना लागल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देऊन धीर दिला.
सिक्कीममधून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व पर्यटक हे सध्या सुरक्षित असून त्यांच्यापर्यंत सर्व मदत पोहोचवण्यात येत आहे. तसेच त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले असून उद्या वायुसेनाच्या विशेष हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वाना गंगटोक येथे सुरक्षितस्थळी आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मदतकार्यावर मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी देखील या पर्यटकांशी सतत संपर्कात आहेत. त्यांच्या शिवाय अजून कुणीही सिक्कीम मध्ये अडकले असल्यास त्यांनी त्वरित राज्य शासनाला संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Sikkim Flood News: खराब हवामानानुसार आज मदत कार्य ठप्प
- उत्तर सिक्कीम मधील लॅच्युन्ग व्हॅली आणि चुंगधांग येथे अडकलेल्या पर्यटकांना एअरलिफ्ट करण्यासाठी सिक्कीम सरकारची योजना रविवारी पाऊस आणि खराब हवामानानुसार Sikkim Heavy Rain पूर्ण होऊ शकली नाही, तर गेल्या आठवड्यापासून भूस्खलनामुळे रस्ते पूल आणि मानवी वस्तीचे नुकसान झाल्यामुळे या भागातील बहुतेक भागांचा संपर्क तुटला आहे.
- शनिवारपासून कोणताही जीवितहानी झाली नसल्याने सिक्कीममधील मृतांचा आकडा नऊ राहिला आहे. यापैकी सहा जण माणगांव जिल्ह्यातील आहेत. उत्तर सिक्कीममध्ये सुमारे 1200 पर्यटक अडकले आहेत. त्यांपैकी किमान 200 जणांनी चुंगथांग येथील गुरुद्वारात आश्रय घेतला आहे, तर इतर लाचुंग येथे आहेत.
- हवाई वाहतूक तूर्तास बंद असल्याने ट्रॅव्हल्स आणि टूर ऑपरेटर्स आणि राज्य सरकारने सोमवार पासून लाचुंग टे तुंग पर्यंत पर्यटकांना वाहनातून नेहण्याचा निर्णय घेतला अंतर अवघे 13 किमी असले तरी पाच ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. तुंग ते माणगाव दरम्यान दरड कोसळल्याने अनेक वाहने अडकून पडली आहेत. पर्यटन या वाहनांमध्ये चढून ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत त्या ठिकाणी उतरतील.
- ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ सिक्कीमचे (टीएएएस) अध्यक्ष सोनम लाचुंगपा यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी वाहनांची पुढील तुकडी उपलब्ध होती. त्या ठिकाणी ते चालत जातील.
- मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी शनिवारी सांगितले की, पर्यटकांना बाहेत काढण्यासाठी हवाई ऑपरेशन हा एकमेव मार्ग आहे. हवामानाने परवानगी दिली नाही. पर्यटकांना हवाई मार्गाने उचलणे सध्या तरी अशक्य वाटत आहे, असे माणगाव येते तैनात असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
- प्रभावित भागात टंल ठोकून असलेले राज्याचे पर्यटनमंत्री शेरिंग थेडुप भूतीया यांनी सांगितले की सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, परंतु त्यापैकी बरेच जण अस्वस्त होत आहेत. सिक्कीम आणि बंगालच्या कालीम्पोंग जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेला राष्ट्रीय महामार्ग-10 रविवारी वाहनांसाठी बंद करण्यात आला, करण डोंगराळ भागातून विशेषत: कालीम्पोंग मधील लिखू वीर सारख्या ठिकाणी दगड कोसळत आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!