ह्या वर्षी 5 श्रावणी सोमवार जाणून घ्या कथा, तिथी आणि महत्व

Shravan Somwar 2024

Shravan Somwar 2024: हिंदू धर्मात देवांचे देव महादेव यांना विशेष महत्व आहे. महदेवाला सोमवार समर्पित आहे. त्यात सोमवार हा श्रावण महिन्यात असेल तर महत्व अधिक पटींनी वाढते. धर्मशास्त्रानुसार, श्रावण सोमवारी महादेवाची शिवभक्तांसाठी उत्सवपर्व म्हणून ओळखला जाणारा हा महिना कधी सुरू होत आहे आणि यंदा कीती श्रावणी सोमवार आहे, जाणून घेऊया. शिव पूजेसाठी श्रावण मास सर्वोत्तम आणि श्रेष्ठ मानला जातो. श्रावणात देवांचे देव महादेव यांची विधिवत पूजा केली जाते. मान्यतेनुसार, श्रवणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात. या काळात शिव पार्वतीची पूजा केल्यास भक्तावर विशेष कृपा होते. श्रावणात पूजेला जितके महत्व आहे. तितकेच महत्व श्रावण सोमवार व्रत कथेला आहे.

हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रीदेवांना महत्व आहे. त्यात महेश म्हणजेच शिवला महादेवाचा दर्जा प्राप्त आहे. श्रावण महिना हा देवांचे देव महादेव यांना समर्पित असून खूप पवित्र मानला जातो. श्रावणात त्यातल्या त्यात श्रावणी सोमवारला महादेव आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे. या महिन्यात विधिवत पूजनासह व्रत केल्यास महादेवाची कृपा लाभत भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.

Shravan Somwar 2024
Shravan Somwar 2024

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मास सुरू होतो. त्यानुसार 5 ऑगस्ट 2024 रोजी श्रावण मासारंभ होत आहे. यंदा सोमवारपासून या महिन्याची सुरुवात होत असून यावेळी 5 श्रावणी सोमवार पडत आहेत.

Shravan Somwar 2024: श्रावण महिन्याचे महत्व

महादेवाच्या पूजेसाठी सोमवारचे विशेष महत्व आहे. सोमवार हा महादेवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा श्रावणी सोमवार म्हणून ओळखला जातो. या दिवशी महादेवाची विधिवत पूजा करत अनेक जण व्रत देखील करतात. धार्मिक दृष्ट्या हा महिना खूप महत्वाचा असून या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी सारखे महत्वाचे सण उत्सवासह श्रवणी सोमवार साजरा केला जातो. त्यामुळे हा महिना धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा आणि पवित्र आहे.

Shravan Somwar 2024: यंदाच्या श्रावणी सोमवारी वाहायची शिवमुठ

दरवर्षी 4 श्रावणी सोमवार येतात. मात्र यंदा 5 श्रावणी सोमवार आहेत. त्यानुसार कोण-कोणत्या दिवशी श्रावणी सोमवार आहे आणि त्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणत्या शिवमुठ वाहायची आहे जाणून घेऊया.

5 ऑगस्ट 2024 पहिला श्रावणी सोमवारतांदूळ
12 ऑगस्ट 2024 दूसरा श्रावणी सोमवारतीळ
19 ऑगस्ट 2024तिसरा श्रावणी सोमवारमुग
26 ऑगस्ट 2024चौथा श्रावणी सोमवारजव
3 सप्टेंबर 2024 पाचवा श्रावणी सोमवारसातू
Shravan Somwar 2024

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. MHTimes24 या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

Shravan Somwar 2024: श्रावण सोमवार व्रत कथा

पौराणिक कथेनुसार, एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता. मात्र, त्याला संतान नव्हते. मूळ-बाळं नसल्याने तो खूप दु:खी होता. संतानसाठी ते सर सोमवारी व्रत व पूजा करत असे. सावकाराची भक्ति पाहून मत पार्वती महादेवाला म्हणाल्या की, हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे. तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो. त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे. यावर महादेव म्हणाले की, हे जग कर्माचे आहे. त्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला फळ मिळेल. परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणण ऐकावचं लागलं. त्यानुसार महादेव म्हणाले की, सावकाराच्या नशिबात संतान सुख नसेल तरी मी त्याला पुत्र प्राप्तीचे वरदान देतो. पण हा मुलगा 12 वर्ष जगेल. माता पार्वती आणि महादेवाते हे संभाषण सावकार ऐकत होता.

त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुख आणि त्याने पूर्वीप्रमाणे व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली. काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार चिंतेत होता. मुलगा 11 वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले. सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठवले. सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की, तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे. त्यानुसार, मामा आणि भाचा काशीला निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन डेट गेले. वाटेत एका राज्यातील राजधानीत ते दोघे पोहोचले जिथे राजाच्या मुलाला एकाच डोळा होता. वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती. तेव्हा राजपुत्राच्या वडिलांना होती.

तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की, या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया. त्यानुसार, सावकाराच्या मुलासोबत राजकुमारीचा विवाह पार पडला. सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगत, तुझे माझ्याशी लग्न झाले आहे. तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे, तो एक डोळ्याने आंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे. सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वराती सोबत जाण्यास नकार दिला. काशीला पोहोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला. सावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला. तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की, त्याला बरे वाटत नाही, नंतर तो आत जाऊन झोपला. झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले. हे कळल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला.

योगायोगाने त्याच क्षणी महादेव आणि माता पार्वती तेथून जात होते. रडणाऱ्य आवाज एकुन पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आही मुलाला पुन्हा जीवंत केले पाहिजे. अन्यथा त्याचे आई-वडील दुखाने मरतील, असे माता पार्वती महादेवाला म्हणाली. माता पार्वतीच्या विनंतीनुसार, महादेवाने त्या मुलाला जीवन दिले. त्यानंतर यज्ञ करून आणि ब्रह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले. त्या राज्याच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्यासोबत पाठवले. मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई-वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपट घेतली होती की, जर मुलगा परत आला नाही तर आपण प्रणाची आहुति देऊ.

मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताला प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले. त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्व आहे. जो कोणी सोमवार व्रत पळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!