Shivaji Maharaj statue: त्यांना केवळ मोदींच्या हस्ते पुतळा उभरायचा होता, दर्जाशी देणंघेणं नाही

Shivaji Maharaj statue

Shivaji Maharaj statue: भारतीय नौदलाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती (Shivaji Maharaj statue 2024) पुतळा उभारला होता. गेल्या वर्षी नौदल दिनाचे (4 डिसेंबर) औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. 15 फुट उंचीचा चबुतरा आणि त्यावर 28 फुट उंचीचा शिवाजी महाराजांचा रुबाबदार अशी या स्मारकाची रचना होती. या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जावरून महायुती सरकार कोंडीत सापडले होते. राज्य सरकारने हा पुतळा नौदलाने उभारल्याचे स्पष्टीकरण दिल असलं तरी महाविकास आघाडीने या मुद्यावरून महायुती सरकारचा अक्षरश पिच्छा पुरवला आहे. या पाश्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

सोमवारी 26 ऑगस्ट दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा पुतळा कोसळला.या पुतळ्यावरुन आता महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. राज्यातील विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. तसेच ही घटना पाहून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. यावर कोणीही राजकारण करू नये. पुतळा उभारण्यात राजकोट किल्ल्यावरील वाऱ्यांचे आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याचठिकाणी नवा पुतळा उभारू. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावल हे फोटो व्हायरल करणार नाही’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केली.

दरम्यान या घटनेवर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या चौकशीत जे जे लोक दोषी आढळतील त्यांच्यावर काठोरात कठोर कारवाई व्हायला हवी असं यादव म्हणाले. याबाबत यादव यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.

Shivaji Maharaj statue
Shivaji Maharaj statue

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्यावर हा पुतळा उभारण्यात आलेला होता. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? हे अजूनही स्पष्टपणे कालू शकलेलं नाही. हा पुतळा कोसल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी सामाजिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यलयाची तोडफोड केली.

Shivaji Maharaj statue: केवळ मोदींच्या हस्ते पुतळा उभरायचा होता, दर्जाशी देणंघेणं नाही – जयंत पाटील

राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा पुतळा कोसळल्यामुळे सरकारवर टीका केली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही. या सरकारला केवळ मोदींच्या हस्ते पुतळा (Shivaji Maharaj statue) उभरायचा होता, त्यांना कामाच्या दर्जाशी कसलंही देणंघेणं नाही. बारामतीच्या सुप्रिया सुले यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिलं की, “देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्यांचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे.”

Shivaji Maharaj statue

सुप्रिया सुले यांनी लिहिलं की, “विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. ज्याआधी एक वर्षही पूर्ण न होता. हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. हे उघड आहे. या अर्थाने ही प्रधानमंत्री महोदय यांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.”

Shivaji Maharaj statue: अखिलेश यादव काय म्हणाले?

अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे की भाजपाने आतापर्यंत ज्या-ज्या वास्तूंची निर्मिती केली आहे त्या केवळ भ्रष्टाचाऱ्यांना भेट म्हणून बनवल्या गेल्या आहेट. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. टु पुतळा कोसळणं ही खूपच वेदनादायी व दुर्दैवी घटना आहे. या पुतळ्याच्या बांधकामाशी संबंधित सर्व सरकारी व निमसरकारी लोकांची सखोल चुकशी करून त्यांच्यावर कठोर व दंडात्मक कारवाई करायला हवी. या घटनेने केवळ महाराष्ट्रातील लोकांच्याच नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेट. महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत भाजपाच्या भ्रष्टाचारी कृत्यांना सडेतोड उत्तर देईल व त्यांच भ्रष्ट सरकार पाडेल.

Shivaji Maharaj statue

Shivaji Maharaj statue: पुतळा बनवणारे ठेकेदार , शिल्पकार मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्य केले आहेट. या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे कारणीभूत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. शिवाय घाईगडबडीत हा पुतळा लावू नका असेही सरकारला सांगितले होते. पण निवडणुकीत श्रेय घेण्यासाठी पुतळा लावला गेला असेही राऊत म्हणाले. याबाबत राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट करत पुतळा बनवणाऱ्यांचे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंधच उघड केले आहेत.

Shivaji Maharaj statue
Shivaji Maharaj statue

राजकोटवर उभारण्यात आलेला पुतळा हा ज्या ठेकेदाराने बनवला होता तो ठाण्याचा आहे. शिवाय शिल्पकारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्जितला आहे. या दोघांचेही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर संबंध आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे यातून किती कमिशन मिळाले आहे हे ही समोर येणे गरजेचे आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र दुखी आहे. महाराष्ट्राच्या हृदयात आरपार वेदना होत आहेत. जनतेने महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे होताना पहिले आहे. हे पाहण्याची वेल जनतेवर या सरकारमुळे आली. तरीही हे सरकार हसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना नाही असे राऊत म्हणाले. किल्ल्यावर हवा होती असे मुख्यमंत्री सांगत आहेत. पण हवा यांच्या डोक्यात गेली आहे असा हल्लाबोल राऊत यांनी यावेळी केला. आठ महिन्यात हा पुतळा कोसळला. याला सार्वजनिक बांधकाम विभागही तेवढाच जबाबदार आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!