Shikhar Dhawan Retirement
Shikhar Dhawan Retirement: टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Shikhar Dhawan Retirement) घेतली आहे. शिखर धवन एके काळी भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमाचा भक्कम आधारस्तंभ होता. पण काळानुसार गोष्टी बदलल्या आणि तो संघाबाहेर पडला. शिखर धवनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 10 डिसेंबर 2022 मध्ये खेळला होता. शिखर धवनने अचानकपणे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
या 37 वर्षीय खेळाडूने 2010 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. आपल्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 34 कसोटी, 167 एकदिवशीय आणि 68 टि-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. निवृत्तीची घोषणा करताना धवन म्हणाला, नमस्कार मित्रांनो आज मी अशा वळणावर उभा आहे जिथून मी मागे वळून पाहतो तेव्हा मला अनेक आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. भारताकडून खेळण्यासाठी माझ्याकडे नेहमीच एकाच गंतव्यस्थान होते आणि ते घडले. यासाठी मी अनेकांचे आभार मनू इच्छितो, माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारीक सिन्हा, मदन शर्मा, ज्यांच्या हाताखाली मी क्रिकेट शिकलो. मग माझा संघ ज्यांच्यासोबत मी वर्षानुवर्ष खेळलो. नवीन कुटुंब सापडले. नव सापडले, साथ मिळाली, खूप प्रेम मिळाले.
कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागतात. बस्स मी पण तेच करणार आहे, मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर (Shikhar Dhawan Retirement) करत आहे. आता जेव्हा मी या प्रवासाला निरोप देत आहे. तेव्हा माझ्या मनात एक शांतता आहे की मी देशासाठी दीर्घकाळ खेळलो. माझ्यावर दाखवल्याबद्दल मी बीसीसीआय आणि डीडीसिएचे आभार मानू इच्छितो. मी माझ्या चाहत्यांचेही आभार मानतो, ज्यांनी मला भरभरून प्रेम दिले. मी स्वत:ला एवढेच सांगतो की, यापुढे देशासाठी खेळणार नाही याचे दु:खी होऊ नका, तर देशासाठी खूप खेळलो याचा आनंद घ्या.
2022 मध्ये शिखर धवन भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळला होता. मात्र, नंतरच्या काळात शुभमन गिल आणि इतर तरुण फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे शिखरला संघात स्थान मिळत नव्हतं. शिखर भारतासाठी 34 कसोटी सामने, 167 एकदिवसीय सामने आणि 68 टि-20 सामने खेळला आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 6 6 हजार 793 धावा केल्या आहेत. त्याने 44.11 च्या सरासरीनं धावांचा पाऊस पडला आहे. तर कसोटी सामन्यांमध्ये त्याने 40.61 सरासरीनं 2 हजार 315 धावा केल्या आहेत.
Shikhar Dhawan Retirement: शिखरच्या नावावरील विक्रम
शिखर धवनच्या निवृत्तीच्या (Shikhar Dhawan Retirement) क्षणी त्याच्या विक्रमांबद्दल बोलणं संयुक्तिकच ठरेल.
- शिखर धवननं 14 मार्च 2013 रोजी मोहाली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विरुध्द पदार्पण केलं होतं. त्यानं पहिल्याच इनिगमध्ये 85 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. तेव्हापासून आत्तापर्यंत पदार्पणाच सर्वात जलद सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड धवनच्या नावावर आहे. धवननं मोहाली टेस्टमध्ये 174 बॉलमध्ये 187 रण काढले होते.
- तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण धवननं भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 आणि 3000 रन करणारा बॅटर आहे. धवननं एकूण 167 वन-डे सामने खेळले. त्यामधील 164 इनिंगमध्ये त्यानं 44.11 च्या सरासरीनं 6793 रन काढले. वनडे क्रिकेट मध्ये धवनच्या नावावर 17 सेंच्युरीची नोंद आहे. (Shikhar Dhawan Retirement)
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीनं पाच हजार धावांपेक्षा अधिक धावा फटकावणाऱ्या आठ फलंदाजांमध्ये शिखर धवनचा समावेश आहे.
- या समान्यांमध्ये त्याने 90 पेक्षा अधिक धावगतीनं (स्ट्राइक रेट) धावा ठोकल्या आहेत. या यादीत भारतीय फलंदाजांमध्ये फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहली आहेत.
- शिखर धवननं कसोटी सामन्यातील आपली सुरुवातच दणक्यात केली होती. कारकिर्दीच्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्यानं ऑस्ट्रेलिया विरुध्द शतक केलं होतं.
- 2013 मध्ये शिखर जबरदस्त फॉर्ममध्ये होता. तेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. यावर्षी त्याने एकदिवसीय सामन्यात 50.52 च्या सरासरीनं आणि 97.89 च्या धावगतीनं 1162 धावा ठोकल्या होत्या.
- यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा भारताला विजय मिळवून देताना शिखरनं महत्वाची भूमिका बजावली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाच डावांमध्ये मिळून शिखरनं 363 धावा केल्या. यात त्याने दोन शतकंसुद्धा केली.
- याच टूर्नामेंटमध्ये रोहित शर्मा बरोबर सलामवीर म्हणून त्याची जोडी जमली. सलामवीरांच्या या जोडीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथी सर्वोत्तम भागीदारी केली होती.
- सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांच्या जोडीनंतर ही जोडी भारतासाठी सलामवीरांची सर्वात यशस्वी जोडी ठरली आहे.
- शिखर धवननं (Shikhar Dhawan Retirement) त्यांच्या करकीर्दी मधील 100 व्या वन-डे मॅच मध्येही सेंच्युरी झळकावली होती. भारताकडून कोणत्याही बॅटरनं केलेला हा खास रेकॉर्ड आहे.
- आयपीएल मध्येही धवनचि बॅट नेहमीच तळपली. जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या T20 लीगमध्ये धवननं 222 सामने खेळले. आयपीएलमध्ये सर्वाधिक फोर लगावण्याच्या रेकॉर्डही धवनच्या नावावर आहे. त्यानं 221 सामन्यात 768 फोर लगावले आहेत. इतकच नाही तर आयपीएलमध्ये सलग 2 सेंच्युरी झळकावणारा धवन हा पहिला खेळाडू आहे.
Shikhar Dhawan Retirement: शिखर धवनला मिस्टर आयसीसी का म्हणतात?
आयसीसी स्पर्धांमध्ये शिखर (Shikhar Dhawan Retirement) धवनची बॅट खूप चमकायची त्याच्या नावावर नोंदवलेले रेकॉर्ड याचा पुरावा आहेट. शिखर धवन हा आयसीसी वनडे टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक सरासरी धावा करणारा खेळाडू आहे. किमान 1000 धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये धवनने 65.15 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तो 64.55 च्या सरासरीने धावा करणाऱ्या विराट कोहलीच्या पुढे आहे. शिखर धवन 2004 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. शिखर धवनने 2010 मध्ये टीम इंडियात पदार्पण केले. तो 2011 साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचा भाग नव्हता, मात्र यानंतर 2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग होता.
2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शिखर धवन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला गोल्डन बॅटही मिळाली. धवनने पाच डावात 363 धावा केल्या होत्या. रोहित शर्मासोबतची त्याची सलामीची जोडी हिट ठरली. तसेच 2015 च्या वर्ल्ड कपमध्येही धवनच्या बॅटने चांगली कामगिरी केली होती. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. धवनने 8 सामन्यात 51.50 च्या सरासरी 412 धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर राहिला होता.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!