Seema Chandekar
Seema Chandekar:अभिनेत्री सीमा चांदेकर (Seema Chandekar) या अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आई आहेत. सिद्धार्थ चांदेकर हा मराठी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून सिनेसृष्टीत त्याचा जम बसवला. सिद्धार्थ त्याच्या करिअर बरोबरच पर्सनल आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. सिद्धार्थने गेल्या वर्षी त्याच्या आईचं मोठ्या थाटामाटात दुसरं लग्न लावून दिलं होतं. सिद्धार्थच्या या निर्णयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. आता सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांनी पहिल्यांदाच याबाबत भाष्य केलं आहे. सीमा चांदेकर यांनी नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 57 व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचा निर्णय का घेतला? याबाबत सांगितलं.
त्या म्हणाल्या पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घ्यायला देखील मला खूप वर्ष लागली. मुलं सेटलं झाली, आता त्यांचं सगळं झालंय म्हणून मी हा निर्णय घेतला असंही नाही. कारण टे दोघेही माझ्याबरोबर होतेच. त्यामुळे मला एकटं वाटायचं असं काहीच कारण नव्हतं. पण 3 वर्षापूर्वी माझा एक अपघात झाला होता. त्यावेळी माझ्या उजव्या हातात प्लेट होती. त्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नव्हते. सिद्धार्थ सुमेधा देखील मला येऊन भेटत होते. आमचं व्हिडिओ कॉलवर बोलण होत होतं. पुढे त्या म्हणाल्या या वयात बाकीच्या कुठल्या गरजांसाठी म्हणून आपण लग्न करत नाही. या वयात लग्न करण्याची काय आवश्यकता आहे, असंही म्हटलं जातं. माझ्यासारख्याच प्रत्येक बाईने हा विचार करावा असंही माझं म्हणण नाही. प्रत्येकीचा विचार वेगळा असेल. अपघाताच्या वेळी मला कुठेतरी एकटं वाटू लागलं होतं.
म्हणजेच मला असं सांगायचंय की माझी बाई आलेली नाही आणि मला त्रास झालाय तर मी हे सिद्धार्थला फोनवर सांगू नाही शकत किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील. म्हणजेच आज आम्ही मैत्रिणी भेटलो, खूप मजा आली. तर हे सगळं मी प्रत्येकवेळेस मुलांना सांगू शकत नाही. मुलं ऐकतात पण त्याच्याकडे तेवढा वेळही पाहिजे ना हे मला कुठेतरी हळूहळू जाणवायला लागलं होतं.

सीमा चांदेकर (Seema Chandekar) या देखील अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आईच्या पावलांवर पाऊल ठेवतच सिद्धार्थनेही कलाविश्वात काम करण्याचा निर्णय घेतला. 23 ऑगस्ट 2023 रोजी यांनी दुसरं लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्याच्या या धाडसी निर्णयाला अभिनेत्यानेही पाठिंबा दिल्याने त्यांचंही कौतुक झालं होतं. वयाच्या या टप्प्यात आल्यानंतर आयुषात जोडीदाराची गरज का भासली या सगळ्या मुद्यांवर सीमा चांदेकर यांनी नुकतच आरपार ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तसेच हा निर्णय त्यांनी का घेतला याचं कारणही सीमा चांदेकरांनी सांगितले आहे.
Seema Chandekar: मुलांना त्यांच्या आई-वडिलांचे खरे डोळे समजतात
माझ्या आईला एका जोडीदाराची गरज वाटणं हे मोर्डनायझेशन नाही आहे. तर ती माझी आणि माझ्या आईची गरज आहे. ट्रोलिंगकडे मी फारसे गंभीरपणे पहिलं नाही कारण माझ्या आईचं जीवन टि लोक तर माझी आईच तिचं आयुष्य जगत आहे आणि मी पहिले आहे तिने तिचा एकटेपणा कसा सहन केला, त्या एकटेपणातही तिने माझा सांभाळ कसा केला, मला कसं मोठं केलं आहे. महत्वाच म्हणजेच मला माझं लग्न झाल्यानंतर समजलं की, जोडीदार सोबत असला की आपल्या जीवनात किती आणि कसा फरक पडतो हे मला माझ्या लग्नानंतर अधिक जाणवलं. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे, पोरांनाच त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील सुख आणि दु:ख दिसून येतं, केवळ त्यांनाच ते खरे डोळे दिसतात आणि समजतात.

हेच हेरून मी तिला देखील तिचे पुढचे आयुष्य सुखात घालवण्याचा अधिकार आहे हे जाणवून दिलं आणि पुढचा प्रवास घडला.
Seema Chandekar: सीमा चांदेकर यांनी काय म्हटलं?
पुन्हा लग्न करण्याच्या मुद्यावर बोलताना सीमा चांदेकर यांनी म्हंटलं की, पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घ्यायलाही मला खूप वर्ष लागलीत असं नाहीये की, आता मुलं सेटल झाली आहे, त्याचं सगळं सुरळीत सुरू आहे, ते माझ्याबरोबरच होतेच ना. त्यामुळे मला एकट वाटावं असं काही कारण नव्हतं. पण तीन वर्षापूर्वी माझा अपघात झाला होता. बाइकने मला धडक दिली होती. माझ्या उजव्या हातामध्ये प्लेट होती. मी कुठेही जाऊ शकत नव्हते. मुलं होतीचं, त्यांना जसा वेल मिळायचा तसे ते यायचे . पण या वयात लग्न करणं म्हणजेच बाकी कोणत्या गरजेसाठी करतोय असं नाहीये. आज आपल्यासमोर अशाही अनेक बेक आहेत, ज्या त्यांच आयुष्य एकटीने घालवण्यासाठी समर्थ आहेत आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो. मी मात्र त्याच्यापेक्षा एक पाऊल मागे पडले असेन.
कारण मी कायम माणसात राहिलेय. माझी मुलं कायम माझ्यासोबत होती. पण त्या अपघाताच्या वेळी मला कुठेतरी एकटेपणा आला. म्हणजेच मला असं सांगायचंय की माझी बाई आलेली नाही आणि मला त्रास झालाय तर मी हे सिद्धार्थला फोनवर सांगू नाही शकत किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील. म्हणजेच आज आम्ही मैत्रिणी भेटलो, खूप मजा आली. तर हे सगळं मी प्रत्येकवेळेस मुलांना सांगू शकत नाही. मुलं ऐकतात पण त्याच्याकडे तेवढा वेळही पाहिजे ना हे मला कुठेतरी हळूहळू जाणवायला लागलं होतं. त्यानंतर माझी चिडचिड व्हायला लागली. माझ्यात आणि मुलांमध्ये त्यावरून वाद व्हायला लागले. पण मग एकदा बोलता बोलता सिद्धार्थ म्हणाला की, आई काय हरकत आहे पुन्हा विचार करायला. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणींशी बोलले.

कारण मला आगितून फुकट्यात यायचं नव्हतं. रात्र रात्र झोप यायची नाही, खूप विचार केला. यासाठी मला माझ्या सासरच्या ही लोकांनी पाठिंबा दिला. 23 ऑगस्ट 2023 रोजी यांनी दुसरं लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्याच्या या धाडसी निर्णयाला अभिनेत्यानेही पाठिंबा दिल्याने त्यांचंही कौतुक झालं होतं. वयाच्या या टप्प्यात आल्यानंतर आयुषात जोडीदाराची गरज का भासली या सगळ्या मुद्यांवर सीमा चांदेकर यांनी नुकतच आरपार ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तसेच हा निर्णय त्यांनी का घेतला याचं कारणही सीमा चांदेकरांनी सांगितले आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!