Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case: बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप केला जात आहे.संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 22 दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरून विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केलाय. या प्रकरणातील संशयित आरोपी (Santosh Deshmukh Case) वाल्मिक कराड यांचे बीड पोलिस स्थानकात लाड केले जात असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर मोठ्या आकांना वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात असल्याच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. वडेट्टीवार म्हणाले की, पोलिस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेले आहेत. पोलिसांसाठी नेले असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी कधी पोलिस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेले आहेत. पोलिसांसाठी नेले असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी कधी पोलीस स्थानकात पोलिस कधी कॉटवर झोपल्याची माहिती नाही. हे कोणाचे लाड आहेत? वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला पोलीस कोठडीत असताना बेडवर झोपवण्यासाठी नेले आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे.
वडेट्टीवार म्हणाले की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटरही केला जाऊ शकतो. त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटर (Santosh Deshmukh Case) करू नका. मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी असे होऊ शकते. अशी माहिती मला विश्वसनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. यावरून काहीही होऊ शकते. अशी या प्रकरणात शक्यता व्यक्त होत असल्याचे त्यांनी म्हंटले.

सीआयडीने वाईट काम केले म्हणून एसआयटी नेमली का?
एसआयटी पथक आज बीडमध्ये दाखल होणार आहे. याबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, सीआयडी तपास सुरू होता. आता एसआयटी आणली. हा तपास भरकटवण्यासाठी तर नसेल ना? अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली. एसआयटी म्हणजे राज्याबाहेरील पोलीस नाहीत. राज्यातील अधिकारीच आहेत. सीआयडी वाईट कम केले म्हणून यांना नेमके का?असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
Santosh Deshmukh Case: विजय वडेट्टीवार यांची पोस्ट
विजय वडेट्टीवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत महायुती सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले कि, महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस सठणकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मिक कराड पोलिस कोठडी मध्ये असताना पाच पलंगाची आवश्यकता भासवी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरवात आहे. हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल. वाल्मिक कराड वर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे.
ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर टी गांभीर्यपूर्वक करावी कराड वर अजून ही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेलं नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असेही वडेट्टीवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
तर कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो
वडेट्टीवार यांनी एक वरिष्ट अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या गुन्ह्यातिल सूत्रधारांना वाचवण्यासाठी आरोपीचे एन्काऊंटर केले जाऊ शकते. असा दावा देखील यावेळी केला आहे. मला कल जी माहिती मिळाली टी अशी आहे की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होणार असेल तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. मला काल विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. यावरून काहीही होऊ शकत. अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे. असा खळबळजनक दावा देखील वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

Santosh Deshmukh Case: विष्णु चाटे यांने नेमकं काय सांगितलं?
बीडच्या दोन कोटीच्या खंडणी प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे, खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या अडचणी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या विष्णु चाटे याने चौकशीमध्ये कबुली दिलेली आहे, वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांची फोनवरती संभाषण केले होतं. वाल्मिक कराड याचं अधिकाऱ्यांशी बोलण झालं होत, अशी कबुली विष्णु साठे यांनी दिलेली आहे, सीआयडी न्यायालयामध्ये सदर केलेल्या आवाहलामध्ये हा मोठा खुलासा त्यांनी केला आहे. विष्णु चाटे च्या फोनवरून कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार केली होती. कराडने कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केले असल्याचा देखील विष्णु साठे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता कराड च्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा थेट सबंध याद्वारे गेलेला आहे.
पीसीआरसाठीची मागणी केलेली होती. त्या पीसीआरचा रिपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. विष्णु चाटे आणि जी खंडणी मागितली होती, टी त्याच्या स्वत:च्या फोनवरून मागितली होती. त्यावेळी तिथे वाल्मिक कराड देखील उपस्थित होता. त्याच्या फोनवरून वाल्मिक कराड याने संबंधित अधिकाऱ्यांना खंडणी मागितली होती असं स्पष्ट झालं आहे. सीआयडी तपासामध्ये विष्णु चाटे याने तशा प्रकारची माहिती दिली आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!