Samit Dravid in Team India U19
Samit Dravid in Team India U19: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बहू फॉरमॅट मालिकेसाठी भारतीय U19 संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन आणि माजी हेड कोच राहुल द्रविड यांच्यासाठी आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडलाही संधी मिळाली आहे. संघांमध्ये समित द्रविडचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय अंडर 19 संघांमध्ये ज्युनिअर द्रविडचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवशीय मालिका आणि चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय अंडर 19 संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
ज्युनिअर निंवड समितीने ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्धच्या आगामी बहू स्वरूप IDFC FIRST बँक घरच्या मालिकेसाठी भारताच्या अंडर-19 संघाची निवड केली आहे. या मालिकेत पुदुचेरी आणि चेन्नईमध्ये तीन 50 षटकांचे आणि दोन चार दिवसीय सामने खेळवले जातील. ज्यामध्ये युपीचा स्टार फलंदाज मोहम्मद अमानला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. चार दिवसाच्या या मालिकेत मध्य प्रदेशचा सोहम पटवर्धन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
टीम इंडिया माजी हेड कोच आणि कॅप्टन राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याला महाराजा ट्रॉफी KSCA T20 च्या आगामी हंगामापूर्वी खेळाडूंच्या लिलावा दरम्यान म्हैसूर वॉरियर्स टीमच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी संवाद साधताना म्हंटले कि, त्याला आमच्या संघात सहभागी करून घेणे चांगलेच आहे. करण त्याने कर्नाटक कडून खेळताना विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवली आहे. समित हा कर्नाटक अंडर 19 टीमचाही भाग होता, ज्याने या हंगामात कूच बिहार ट्रॉफी जिंकली तसंच या वर्षाच्या सुरुवातीस तो लँकशायर संघाविरुद्ध KSCA XI कडूनही खेळला होता.
समितबद्दल बोलायचं झालं तर, 18 वर्षीय अष्टपैलू खेळाडू सध्या सुरू असलेल्या महाराजा टि-20 KSCA स्पर्धेत शानदार षटकार मारल्यामुळे चर्चेत होता. म्हैसूर वॉरियर्स कडून खेळताना त्याने सात सामन्यात 82 धावा केल्या आहेत. तो मध्यमगती गोलंदाज आहे, पण या लीगमध्ये त्याच्या गोलंदाजीचा वापर झालेला नाही. त्याच्या संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ज्यापैकी गुलबर्गा मिस्टिक्स विरुद्ध 33 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. गेल्या वर्षी स्ट्रेस फॅक्चर झालेल्या समित द्रविडणे भारताच्या अंडर 19 देशांतर्गत स्पर्धा विनू मांकड आणि कूचबिहारमध्ये चांगली कामगिरी केली. विनयी मांकड ट्रॉफी मध्ये समितने चार डावात 122 धावा केल्या, ज्यात 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
दरम्यान त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह महत्वाची भूमिका बजावली आणि कर्नाटकला कूचबिहार ट्रॉफी जिंकण्यात मदत केली. समितने आठ सामन्यात तीन पन्नास पेक्षा जास्त धावा करून 362 धावा केल्या आणि 19.31 च्या सरासरीने 16 विकेटही घेतल्या. समित अष्टपैलू खेळाडू असून उजव्या हाताने फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करतो. तो सर्वात आधी चर्चेत आला टे 14 वर्षाखालील क्रिकेट गाजवताना. त्याने 2016 मध्ये 125 धावांची खेल केली होती. त्यानंतर त्याने 2018 मध्ये कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या 14 वर्षाखालील शालेय स्पर्धेतही 150 धावणाची दमदार खेळी केली होती. त्याने 2019 मध्येही 14 वर्षाखालील सामन्यात द्विशतकी खेळी केली होती.
तो 19 वर्षाखालील नॅशनल चॅम्पियनशिप मधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. त्याने आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेतही 4 सामन्यात 130 धावा ठोकल्या होत्या. पण पाठीच्या वेदनेमुळे त्याला गोलंदाजी करता आली नव्हती.
Samit Dravid in Team India U19: राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड-
अलीकडेच, भारताच्या पुरुष वरिष्ट संघाने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टि-20 विश्वचषक जिंकत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपुष्टात आणला होता. याशिवाय बीसीसीआयनेही वेळापत्रक जाहीर केले आहे. भरत दौऱ्यावर आलेला अंडर 19 ऑस्ट्रेलियन संघ प्रथम भारतात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यानंतर चार दिवसांच्या कसोटी मालिकेतिल पहिला सामना 3 ऑक्टोबर पासून खेळवला जाणार आहे. जिथे चार दिवसीय सामने खेळवले जातील. ज्या अनुक्रमे पुदुचेरी आणि चेन्नई येथे जाईल. वनडे मालिका आणि चार दिवसीय कसोटी मालिकेसाठी प्रत्येकी 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
Samit Dravid in Team India U19: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा अंडर 19 संघ
एकदिवसीय अंडर 19 संघ | चार दिवसीय अंडर 19 संघ |
---|---|
मोहम्मद अमन (कर्णधार) | सोहम पटवर्धन (कर्णधार) |
रुद्र पटेल (उपकर्णधार) | विहान मल्होत्रा (उपकर्णधार) |
कार्तिकेय केपी | वैभव सूर्यवंशी |
साहिल पारख | नित्या पांड्या |
किरण चोरमले | कार्तिकेय केपी |
अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक) | समित द्रविड |
हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक) | अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक) |
समित द्रविड | हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक) |
युधाजीत गुहा | चेतन शर्मा |
समर्थ एन | समर्थ एन |
निखिल कुमार | आदित्य रावत |
चेतन शर्मा | निखिल कुमार |
हार्दिक राज | अनमोलजीत सिंग |
रोहित राजावत | आदित्य सिंग |
मोहम्मद अनन | मोहम्मद अनन |
Samit Dravid in Team India U19: समित द्रविड देशांतर्गत झालेल्या क्रिकेटमधील कामगिरी
भारताचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा देखील क्रिकेटचा शौकीन आहे आणि तो स्वत: ला अष्टपैलू खेळाडू सिद्ध करण्याच्या मार्गावर आहे. समित द्रविड देशनतर्गत स्तरावर धावा करत आहे. अलीकडे, महाराजा केएससीए टी 20 ट्रॉफीमधील त्यांच्या काही मोठ्या शॉटस व्हिडिओ व्हायरल झाले आहे. समितने म्हैसूर वॉरियर्सकडून 7 डावात अनुक्रमे 7, 7, 33, 16, 2,12 आणि 5 धावा केल्या आहेत. एकदिवसीय मालिकेसाठी मोहम्मद अमान आणि चार दिवसीय कसोटीसाठी सोहम पटवर्धनला बनवण्यात आले आहे.
Samit Dravid in Team India U19: मात्र वर्ल्ड कप खेळता येणार नाही..
दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांसाठी निवडण्यात आलेल्या 19 वर्षाखालील भारतीय संघातील खेळाडूंची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी विचारात घेण्यात आली आहे. मात्र लक्षात घेण्यासाठी गोष्ट अशी की या संघात निवड झालेले अनेक खेळाडू आहेत. जे 2026 साली होणाऱ्या 19 वर्षाखालील वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार नाहीत. कारण ते 19 वर्षापेक्षा त्यांचे वय अधिक असेल. यामध्ये समितचाही समावेश आहे. समित या वर्ल्ड कपपर्यंत 20 वर्षाचा असेल.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!