रॉयल एनफील्ड ची नवीन बाइक ‘गुरील्ला 450’ भारतामध्ये लॉन्च पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Royal Enfield Guerrilla 450

Royal Enfield Guerrilla 450: नमस्कार मित्रांनो, Royal Enfield ने आपली पॉवरफुल आधुनिक रोडस्टार बाइक Guerrilla 450 ही लॉन्च केली आहे. भारतामध्ये बाईक प्रेमींचा आकडा मोठा असून, आता अनेक बाइक उत्पादन कंपन्यांकडून, ब्रॅंड कडून याच केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या मागण्यांची पूर्तता करत एकाहून एक सरस बाइक मॉडेल सादर करण्यात येत आहेत. याच बाइक प्रेमींसाठी या क्षेत्रात कमालीचा दबदबा असणाऱ्या रॉयल एनफील्ड कडून एक नवीन बाइक नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. Guerrilla 450 असं या एनफील्डच्या नव्या मॉडेल्सचं नाव असून लवकरच ही बाइक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

ही बाइक स्पेनच्या बार्सीलोंना इथं ग्लोबल मार्केट इवेंटमध्ये ही बाइक लॉन्च करण्यात आली. नजर रोखणारा लुक आणि ताकदीने काम करणार इंजिन यामुळे ही बाइक भारतीय रस्त्यावरही अफलातुन कामगिरी करेल यात शंका नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे किंमत तर या बाइकसाठी भारतात. 2.39 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी किंमत मोजावी लगणार असून, 1 ऑगस्टपासून ती विक्रीसाठी उपलब्ध असेल. व्हेरीयंतनुसार बाइकची किंमत बदलणार असून, ॲनालॉग, डॅश आणि फ्लॅशसाठी अनुक्रमे 2.39 लाख, 2.49 लाख, 254 लाख रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे.

Royal Enfield Guerrilla 450
Royal Enfield Guerrilla 450

कंपनीने या बाइक साठीची अधिकृत बुकिंग सुरू केली असून, कंपनीचं अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत विक्रेत्याकडून ही बाइक खरेदी करता येऊ शकते. 450 सीसीमध्ये एनफील्डची दुसरी बाइक असून ती सध्या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. ब्रावा ब्लु, येलो रिबन, गोल्ड डिप, प्लाया ब्लॅक आणि स्मोक फ्लॅश अशा रंगाचे पर्याय कंपणीनं दिले आहेत.

Royal Enfield Guerrilla 450 Price

रॉयल एनफील्ड ची बाइक भारतीय बाजारात 3 व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. या बाईकच्या पहिल्या व्हेरीएंट ची किंमत दिल्ली मध्ये रु. 2.39/- लाख रुपये आहे. या बाईकच्या दुसऱ्या व्हेरीएंट ची किंमत रु. 2.49/- लाख रुपये आहे, आणि या बाईकच्या सर्वात महाग व्हेरीएंट ची किंमत रु. 2.54/- लाख रुपये आहे. या सोबत या बाइक चे संपूर्ण वजन हे 185 किलो आहे. या सोबत या बाईकच्या सीटची हाइट 780 mm आहे. रॉयल एनफील्डच्या पाच कलर च्या पर्यायामध्ये ब्रावा ब्लु, येलो रिबन, गोल्ड डिप, प्लाया ब्लॅक आणि स्मोक फ्लॅश हे येतेत.

Royal Enfield Guerrilla 450
VariantPrice Ex-ShowroomColour Options
AnalogueRs. 2.39 lakhSmoke Silver, Playa Black
DashRs. 2.49 lakhPlaya Black, Gold Dip
FlashRs. 2.54 lakhYellow Ribbon, Brava Blue
Royal Enfield Guerrilla 450
Royal Enfield Guerrilla 450

Royal Enfield Guerrilla 450 बाइकप्रेमींना हवेहवेसे असणारे फीचर्स

नवीन गुरील्ला 450 चे डिझाइन रोडस्टार स्टाईलचे आहे. अशा डिझाईन्स विशेषत बाईकचा वापर करणाऱ्या रायडर्सना आकर्षित करतात. या बाइकचे वजन 185 किलो आहे. कंपनीच्या स्वतच्या हिमालयन बाइकपेक्षा ही 11 किलो हलकी आहे. ही कंपनीची 400cc इंजिन असलेल्या दुसरी बाइक आहे. यात 17 इंच टायर आहेत. जे रस्त्यावर तसेच रस्त्यावर चांगले कार्य करण्यास सक्षम आहेत. बाइकची गोल एलईडी हेडलाइट त्याच्या डिझाइनला क्लासिक फील देण्यास मदत करते. तुम्हाला नवीन Guerrilla 450 मध्ये 5 कलर ऑप्शन मिळतात. ज्यात Smoke Silver, Playa Black, Gold Dip, Yellow Ribbon आणि Brava Blueयांचा समावेश आहे.

FeatureSpecification
Engine Capacity452 cc
Mileage (ARAI)25.6 kmpl
Transmission6 Speed Manual
Kerb Weight 185 kg
Fuel Tank Capacity 11 Liters
Seat Height 780 mm
Royal Enfield Guerrilla 450

बाइकमध्ये एक गोल TFT डिजिटल स्पीडोमीटर आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स पहायला मिळतात. याशिवाय त्यात नेव्हीगेशनची सुविधाही उपलब्ध आहे. हे मीटर ब्लुटुथ कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. यामध्ये तुम्हाला गिअर शिफ्ट इंडिकेटर सुविधाही मिळते. बाइकमध्ये बसवलेले इंजिन पॉवरफूल आहे, हे इंजिन खास राइडर्ससाठी तयार करण्यात आले आहे. रस्त्यावर रोमांच निर्माण करण्यासाठी 4ओ पीएस पॉवर पुरेशी आहे. हे इंजिन कंपनीच्या ऑफ-रोड बाइक हिमालयनला शक्ति देते.

Royal Enfield Guerrilla 450

Royal Enfield Guerrilla 450 Specification

  • Guerrilla 450 ही एक प्रीमियम मॉडर्न रोडस्टार बाइक असून, 452 सीसी क्षमतेच्या सिंगल सिलिंडर लिक्विड कुल् शेरपा इंजिननं ती परिपूर्ण आहे. बाइकमध्ये 40 PS पॉवर आणि 40 NM टॉर्क जनरेट होत असून, त्यात वॉटर कुल्ड सिस्टिम देण्यात आली आहे.
  • ज्यामध्ये इंटीग्रेटेड वॉटर पंप, ट्विन पास रेडीएटर आणि इंटरनल बायपासही देण्यात आले आहेत. 6 गिअरबॉक्सनं जोडण्यात आलेल्या या बाइकमध्ये असिस्ट आणि स्लिप क्लच उपलब्ध आहे.
  • बाइकला 4 इंचाचा इन्फोटेन्मेट डॅश क्लस्टर देण्यात आला असून, यामध्ये GPX फॉरमॅट मधील रुट रेकॉर्डिंग, म्युझिक कंट्रोल, हवामानाचा अंदाज अशी बरीच माहिती मिळणार आहे. तुम्हाला नवीन Guerrilla 450 मध्ये 5 कलर ऑप्शन मिळतात. ज्यात Smoke Silver, Playa Black, Gold Dip, Yellow Ribbon आणि Brava Blueयांचा समावेश आहे. हे कलर तेजस्वी आहे या कलर मुळे बाइक ही तिच्या साहसी टुरसाठी तयार आहे असे वाटते.
  • 17 इंचाचे ट्यूबलेस टायर, 1440 मिमीचा व्हीलबेस, स्टेप्ड बेंच सीट, एलईडी लाइट, 11 लीटर फ्यूल टॅंक, अपस्वेप्ट सायलेन्सर असणाऱ्या या बाइकला 43 मिमी टेलिस्कोपीक फोर्क सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला लिंकेज टाईप मोनो शॉक सस्पेन्शन देण्यात आलं आहे.
  • या बाइकमध्ये विविध रायडिंग मोड सुद्धा उपलब्ध असून, त्याचा वापर विविध पद्धतीच्या रायडिंगमध्ये अगदी प्रभावीपणे करता येणार आहे. सध्याच्या श्रेणीतील ही सर्वोत्तम बाइक असल्याचा दावा खुद्द एनफील्डनंच केला आहे. त्यामुळे आता बाइकप्रेमी या बाइकला कशी पसंती देतात हे पाहणं महत्वाचं.
  • जसे की या बाइकमध्ये डिजिटल स्पीडोमिटर, डिजिटल ओडमिटर, सीजीतळ ट्रीप मीटर, डिजिटल टेकोमीटर, एअर फिल्टर एलिमेंट यासोबत बाकीच्या फीचर्स मध्ये हेलोजन हेडलाइट, बल्ब टर्न सिंगल लैप, बल्ब टेल लाइट, असे खूप सुविधा या बाइक मध्ये दिल्या आहेत. ही बाइक 6 स्पीड मैन्यूअल गियर बॉक्स च्या सोबत येते.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!