Reel Star Aanvi Kamdar
Reel Star Aanvi Kamdar: नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा रिल्स बनवत असाल तर सावधान! तुम्ही रिल्स च्या नादात पुढे काय आहे विसरून जाता. अशीच एक तरुणी रिल्स बनवण्याच्या नादात दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्वी कामदार (Reel Star Aanvi Kamdar) असं तीच नव आहे. ती माणगाव तालुक्यातील कुंभे येथे फिरण्यासाठी गेली होती. तरुणी उच्च शिक्षित होती. ती सिए (सनदी लेखापाल) म्हणून काम करत होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सह्याद्रीतिल निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केल्याशिवाय राहत नाही.
पावसाळ्यात हीच सह्याद्री सर्वत्र हिरवाईने नटलेली असते. हे सर्व पाहून तरुणाईला आपल्या मोहावर आवर घालता येत नाही. मग धबधब्यामध्ये पोहण्याचा आनंद असो अथवा निसर्गाचा अद्भुत दृश पाहण्याचा अनुभव असो. परंतु हे सर्व करत असताना काही अतिउत्साही पर्यटक आपल्या जिवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. आणि अशातच आपला जीव गमावतात. असाच काहीसा प्रसंग हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या कुंभे धबधबा येथे घडला. अन्वी एका कड्यावर रील बनवत होती. त्यावेळी तिचा तोल गेला अन् ती 300 फुट खोल दरीत कोसळली. यावेळी तिच्या सोबत तिचे सहा सहकारी होती. पण, कोणालाही धोक्याबाबत तिला सूचना देता आली नाही. घटनेनंतर पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरू केली. दरी खोल असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता.

माणगावचे वरिष्ट पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी या घटनेचा आढावा घेतला. बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. बचाव पथक दोरीच्या सहाय्याने दरीत उतरले. या ठिकाणी त्यांना अन्वी जखमी अवस्थेत आढळून आली. तिला वरती काढण्यात आले. तिला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रिल्सच्या नादात अनेकजण आपला जीव गमावत असतात. अशीच घटना अन्वी सोबत घडली आहे. एक रील करण्यासाठी तरुण-तरुणी कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत. कोणतीही जोखीम पत्करण्यास ते तयार आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी एक तरुणी मित्रांच्या हाताला पकडून बिल्डिंगच्या खाली लटकत असल्याचं पहायला मिळालं होतं. अशा घटना आपण रोज पाहत आहोत. आव्हान करून देखील याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे.
Reel Star Aanvi Kamdar: रिल्सचा नाद जिवावर बेतला
कड्याच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती 300 फुट खोल दरीत पडली. तिच्या सोबत असलेल्या मित्र मैत्रिणींनी ही माहिती जवळील माणगाव पोलिस स्थानकात दिली. माणगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या सर्व बचाव पथकांना बोलावले. कुंभे ग्रामपंचायत सरपंच आणि काही सदस्य, ग्रामपंचायतचे कर्मचारी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले. महावितरणचे कर्मचारी देखील बचाव कार्यासाठी पुढे सरसावत बचाव पथके येण्यापूर्वी खोल दरीचा घेत होते. वीळे येथील शेलार मामा रेस्क्यू टीम देखील तातडीने येथे पोहोचली पर्णतू पाऊस आणि अतिशय धुके असल्यामुळे आणि अपुऱ्या उपकरणामुळे काहीच करणे शक्य होत नव्हते.
सदरची घटना कळताच कोलाड रेस्क्यू टीमचे सागर दहिबेकर त्वरित आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले त्यांनी माणगाव येथील वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना सदरचा कुंभे परिसर अधिक परिचयाचा असल्यामुळे संपर्क साधला असता ते देखील तातडीने आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले. जवळपास दुपारी एकच्या सुमारास येथे पोहोचताच बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच मुलगी कोठे पडली असावी याचा नेमका अंदाज आल्याने शंतनू कुवेसकर व सागर दहिबेकर त्यांचे सहकारी सुरज दहिबेकर आणि शुभकर वनारसे फक्त सुरक्षा रोपच्या सहाय्याने साधारण 15 मिनिटातच दरीत पडलेल्या मुलीपर्यंत पोहोचले. त्यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कदाचित त्या मुलीचे प्राण गेले असावे असे वाटले होते. परंतु त्या मुलीचा श्वास चालू होता. चौघांनी मिळूनच मुलीला स्ट्रेचर वरती सुरक्षित बांधले, खोल दरीतून घासरणाऱ्या दगडांमधून 300 फुट वरती घेऊन जाने अधिक आव्हानात्मक होते.
त्यात बराच कल वरुण कोणत्याही प्रकारची मदत येत नव्हती व संपर्क देखील नीट होत नव्हता, अंगावर पडणारे दगड आणि प्रतिकूल परिस्थिति सामना करत बाकीच्या सहकाऱ्यांनी मिळून मुलीला पडलेल्या ठिकाणाहून वरती साधारण 100 फुट अंतर स्ट्रेचर वर उचलून आणले. त्यानंतर महाड येथील सिस्केप रेस्क्यू टीमचे चिराग मेहता आणि ओम शिंदे वरुण रॅपलिंग करत दरीमद्धे उतरले त्यामुळे बचावकार्याला अधिक गती मिळाली.
दरीत पडली होती तरीपण जीव वाचला होता
खाली उतरत असताना मोठे-मोठे दगड आमच्या अंगावरती पडत होते. अवघ्या 15 मिनिटात टीम त्या तरुणीच्या जवळ पोहोचली. पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित ती जीवंत नसावी परंतु जवळ जाऊन तिचा श्वास तपासल्यानंतर ती जीवंत असल्याची खात्री झाली. तिला हॅक दिल्यानंतर ती हलका आवाजात साठडेट होती. लगेचच जखमी तरुणीला सुरक्षितरित्या स्ट्रेचर वरती बाधण्यात आले. धारणपणे 120 मीटरच्या अंतरावरती हाताने उचलून तिला जवळील मार्गावरती आणले. त्यानंतर दोरीच्या साह्याने जवळपास 200 ते 250 फुट उंच कड्यावरून तिला वरती नेण्यात आले. जखमी तरुणीला माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. अन्वी कामदार (Reel Star Aanvi Kamdar) असं मृत तरुणीचं नव आहे. मुंबईतल्या माटुंगा इंफ्ल्यूएन्सर आहे. फेसबुक आणि इतर ठिकाणी तिचे लाखोंने फॉलोवर्स आहेत.
अन्वी च्या मृत्यूनंतर प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन
रिल्स स्टार अन्वी कामदार (Reel Star Aanvi Kamdar) हिच्या मृत्यूनंतर माणगावचे पोलिस निरीक्षक, तहसीलदार आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांनी पर्यटक आणि आसपासच्या लोकांना आवाहन केले आहे. लोकांनी जबाबदारीने पर्यटनाचा आनंद घ्यावा. प्रवास करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्या. पर्यंतनस्थळी धोकादायक वर्तन टाळावे, अशा सूचना डेट लोकांना सुरक्षित राहण्याचे व जिवाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Reel Star Aanvi Kamdar: हा व्हिडिओ शेवटचा ठरला
16 जुलै रोजी रील शूट करताना दरीत पडून अन्वीचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या केवळ एक दिवस आधी म्हणजे 15 तारखेलाच तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी पाच पर्यटन स्थळाची माहिती तिने त्यात दिली होती. यात उदयपूर, कर्नाटक, गोवा, दिल्ली-आग्रा, भंडारदरा, शीलॉंग अशी काही स्थळ तिने सुचवली होती.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!