Redmi Note 14 5G Price
Redmi Note 14 5G Price: सर्व कंपन्यांपेक्षा बजेट सेगमेंट स्मार्टफोनसाठी ओळखल्या जाणाऱ्या रेडमीची लोकप्रिय Note सिरिज पुनरागमन करत आहे. आज 9 डिसेंबर रोजी Redmi Note 14 ही सिरिज (Redmi Note 14 5G Price) भारतामध्ये लॉन्च होत आहे. ज्या मध्ये Redmi Note 14 सह Note 14 Pro आणि Note 14 Pro+ चा समावेश केला जाऊ शकतो. ह्या येणाऱ्या सिरिजबद्दल अनेक तपशील आधीच समोर आले आहेत. आज दुपारपासून तुम्ही कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर त्यांचा थेट कार्यक्रम पाहता येईल. Xiaomi ने चीन मध्ये Note 14 Series सप्टेंबर महिन्यातच लॉन्च केली आहे. आता भारतासह जगभरातील मार्केट्स मध्ये हा फोन येण्यासाठी सज्ज झाला आहे.
कंपनीने या सिरिज मध्ये कोणती वैशिष्ट्ये दिली आहेत जाणून घेऊया? आता लॉन्च पूर्वीच Amazon आणि Xiaomi च्या वेबसाइट वर Redmi Note 14 5G चि मायक्रोसाइट लाइव्ह करण्यात आली आहे. ज्यात फीचर्स, डिझाइन आणि कलर्स माहिती समोर आली आहे, जाणून घेऊया.
Redmi Note 14 5G Price: किंमत आणि कलर्स
Redmi Note 14 5G हा स्मार्टफोन तीन व्हेरीएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Redmi Note 14 ह्या व्हेरीएंट 6 GB + 128 GB मध्ये येतो, तर या स्मार्टफोनची किंमत ही 17,999 रुपये, तर 8 GB + 128 GB स्टोरेज सह येतो, तर या व्हेरीएंटची किंमत ही 18,999 रुपये आणि तर या फोनच्या 8 GB + 256 GB व्हेरीएंट ची किंमत 20,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
Redmi Note 14 Pro 5G या व्हेरीएंट मध्ये सुद्धा 2 व्हेरीएंट देण्यात आले आहे. 8 GB + 128 GB व्हेरीएंट किंमत 23,999 रुपये आणि 8 GB + 256 GB च्या व्हेरीएंटची किंमत 25,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
Redmi Note 14 Pro+ 5G या व्हेरीएंट मध्ये सुद्धा 2 व्हेरीएंट देण्यात आले आहे. 8 GB + 128 GB व्हेरीएंट किंमत 31,999 रुपये आणि 12 GB + 512 GB च्या व्हेरीएंटची किंमत 34,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
Redmi Note 14 5G (Redmi Note 14 5G Price) सिरिजच्या उपलब्धते बद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 13 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. या लाइनअपचे बेस मॉडेल Amazon वरुण खरेदी केले जाऊ शकते. तर pro आणि pro+ मॉडेल्स Flipkart वर उपलब्ध असतील. यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात Discount ऑफर्स देखील मिळतील. ही सिरिजची रचना चिनमिल फोनसारखी असेल. मात्र त्यात काही किरकोळ बदल करण्यात येणार आहेत. कंपनी मार्बल फिनिशसह काळ्या आणि पांढऱ्या रंगात या मालिकेचे बेस मॉडेल आणत आहे. चीनमध्ये कंपनीने हा फोन निळ्या रंगातही आणला आहे, मात्र टु भारतात लॉन्च होणार नाहीय.
Redmi Note 14 5G Price: स्पेसिफिकेशन
स्मार्टफोनमध्ये Xiaomi चा AI असिस्टंट AiMi एक व्हायब्रंट डिस्प्ले आणि उत्तम गोपनीयता पर्यायासंह मिळेल. हा कंपनीचा स्वत: चा AI असिस्टंट आहे. यात 120 Hz रिफ्रेश रेट, 2,100 nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरील्ला ग्लास संरक्षणासह 6.67 इंच फूल एचडी + AMOLED स्क्रीन असेल. कामगिरीसाठी, फोनमध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra SoC प्रोसेसर असू शकते. पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी याला IP64 रेट केलंय. फोनला शक्तिशाली 5,110 mAh बॅटरी मिळणार आहे. हा फोन 45 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यात Android 15 आधारित HyperOS 2.0 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.
Redmi Note 14 मध्ये सेल्फी स्नॅपर, फ्लॅट एज आणि नॅरो बजेटससह एक पंच होल कटआउट देण्यात आला आहे. व्हॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे आहेत. डिव्हाईस मध्ये 3.5 मिमी ऑडियो जॅक, आयआर कंट्रोल, स्पीकर वेंट आणि मायक्रोफोन टॉप वर आहेत. तसेच मागे डावीकडे वरच्या बाजूला एक चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आहे आणि ज्यात कॅमेरा सेन्सर आहेत. या मॉडेल मध्ये 50 Mp चा OIS प्रायमरी Sony LYT 600 कॅमेरा लेन्स असेल.
- Redmi Note 14 5G मध्ये डयूअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50 MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात येईल. सोबत 8 मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर असण्याची शक्यता आहे. जो एक अल्ट्रा वाइड लेन्ससह येईल. तसेच सेल्फीसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
- लिस्टिंगमध्ये फोन ब्लॅक आणि व्हाईट मध्ये मिळणार आहे. रेडमी नोट 14 5G मध्ये यूजर्सना AI फीचर्स देखील मिळतील. जे स्वत: कंपनीने बनवले आहेत. फोनमध्ये सुपर ब्राइट डिस्प्ले आणि प्रायव्हसी कंट्रोल असतील असं कंपनीनं म्हटलं आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!