अनेक AI फीचर्सने भरपूर असा Realme चा स्मार्टफोन भारतात लॉन्च,120 W चार्जिंग आणि स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसह

Realme GT 6

Realme GT 6: स्मार्टफोन ब्रॅंड रिअलमिने (Realme) गुरुवारी आपला नवीन गेमिंग फोन रिअलमी जीटी 6 (Realme GT 6) भारतात आणि जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. फोनमध्ये शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट आणि 120 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय Realme GT 6 हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. ज्यामुळे आउट ऑफ द बॉक्स जनरेटीव्ह AI (GenAl) फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये एमोलड डिस्प्ले, ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप आणि 5,500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme GT 6
Realme GT 6

Realme GT 6 5G अखेर भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. बऱ्याच काळापासून फोनच्या लॉन्चची चर्चा सुरू होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. जो अनेक AI फीचर्सने सुसज्ज आहे. या फोनच्या पहिल्या विक्रीमध्ये अनेक अप्रतिम ऑफर्स देखील मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया Realme GT 6 स्मार्टफोन बद्दल.

Realme GT 6 5G ची किंमत

ऑफर्स बद्दल बोलायचे झाल्यास बॅक कार्डद्वारे फोनच्या बेस व्हेरीएंट वर 4000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांची सूट मिळेल. उपलब्धते बद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 25 जूनपासून Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Next AI

Realme ने Realme GT 6 हा स्मार्टफोन तीन व्हेरीएंटमध्ये सादर केला आहे. फोनच्या 8 GB रॅम + 256 GB स्टोरेज व्हेरीएंट किंमत 35,999 रुपये आहे. तर, 12 GB रॅम + 256 GB स्टोरेजची किंमत 38,999 रुपये आहे. त्याच्या तिसऱ्या 16 GB रॅम + 512 GB स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 44,999 रुपये आहे. हा फोन फ्लाइड सिल्व्हर आणि रेझर ग्रीन कलर पर्यायांमध्ये येतो.

Realme GT 6 5G फोनमध्ये Next AI देण्यात आला आहे. याद्वारे, AI Imaging, AI Efficiency आणि Ai Personalization फोनमध्ये उपलब्ध असतील. फोनमधील फोटोग्राफीचा अनुभव AI द्वारे सुधारण्यात आला आहे. त्याबरोबर, फोनमध्ये Ai नाईट व्हिजर मोड उपलब्ध आहे, जो तुम्हाला रात्रीच्या अंधारात उत्तम दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ प्रदान करेन त्याबरोबर Ai Smart Image Matting फीचर्स Google फोटोद्वारे फोटो स्टोरेज आणि एडिट सुविधा देतो. आम्ही तुम्हाला सांगतो की गुगल फोटो वापरकर्त्यांना मॅजिक एडिटर, ब्लर, इरेजर सारखी टूल्स देतात.

Realme GT 6 5G चे फीचर्स

Realme GT 6T या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा FHD AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 5500 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 120 W Super Vooc फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. 26 मिनिटांच्या चार्जवर हा फोन 1.90 दिवसांसाठी वापरता येईल. असा कंपनीने दावा केला आहे.

याव्यतिरिक्त Realme च्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50 MP Sony LYT-808 प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याबरोबर 50MP टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये तिसरा 8 MP अल्ट्रा- वाइल्ड सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 MP फ्रंट कॅमेरा आहे.

Category Specification
Display6.78-inch AMOLED Screen
Resolution: 1080 x 2400 pixels
Pixel Density: 391 ppi
3D Curved Screen, 1300 nits Local Peak Brightness
120 Hz Refresh Rate
Punch Hols Display
Camera50 MP Primary (Sony LYT-808) + 50 MP Ultra-wide (Sony IMX355)
4K @ 30 fps UHD Video Recording
Front Camera: 32 MP
Technical
Qualcomm Snapdragon 8 Gen 3
Octa-core processor, 2.2GHz
16 GB/ 12 GB/ 8 GB (LPDDR 5x)
storage 512 GB/ 256 GB
Memory Card: Hybrid
Connectivity
4G, 5G, VoLTE
USB-C v2.0
5500 mAh Battery
120 W Fast Charging
Realme GT 6 5G

Realme GT 6 5G Specification

  • प्रोसेसर Realme GT 6 5G ला अँन्ड्रॉईड 14 आधारित रिअलमी युआय 5 वर सादर केले जाऊ शकते. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा 4 नॅनोमीटर फॅब्रीकेशनवर बनलेला Snapdragon 8 Gen 3 ऑक्टोकोर प्रोसेसर दिला जाणार असल्याची अशा आहे जो 3 गिगा हर्टझ पर्यंतच्या स्पीडवर रण करण्याची क्षमता ठवतो.
  • स्क्रीन रिअलमी 6 ला 6.78 इंचाच्या पंच- होल डिस्प्लेवर लॉन्च केले जाऊ शकते. या फोनमध्ये 8T LTPO AMOLED स्क्रीन दिली जाऊ शकते ज्यावर 120 Hz रिफ्रेश रेट, 6000 nits पीक ब्राइटनेस तसेच 2160 Hz पीडब्ल्यूएम दीमईनग मिळवण्याची शक्यता आहे.
  • फ्रंट कॅमेरा सेल्फी काढणे, रिल्स बनविणे तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी Realme GT Neo 32 MP Selfie Camera ला सपोर्ट करतो. हा Sony IMX615 सेन्सर आहे जो एफ/ 2.45 अपर्चरवर चालतो.
  • बॅक कॅमेरा फोटोग्राफीसाठी या रिअलमी मोबाईलच्या बॅक पॅनलवर 50 MP Sony IMX882 OIS मेन सेन्सर तसेच 8 MP IMX355 122 अल्ट्रा वाइल्ड अँगल लेन्स मिळू शकते. त्याबरोबर फ्रंट 32 Sony IMX615 selfie कॅमेरा दिला जाणार असल्याची अशा आहे.
  • बॅटरी पावर बॅकअपसाठी Realme GT 6 5G फोनला दमदार 5,500 mAh Battery सह बाजारात आणले जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 120 W फास्ट चार्जिंग मिळवण्याची शक्यता आहे.
जागतिक स्तरावर होणार लॉन्च

Realme ने आपला GT 6T स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला भारतात लॉन्च केला होता. आता कंपनी Realme GT 6 फोन भारतात लॉन्च करण्यात विचार करत आहे. Realme चे संस्थापक सीईओ स्काय ली यांनी पुष्टी केली आहे की, Realme GT 6 हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लॉन्च केला जाईल. या बाजारपेठामध्ये भारत, इटली, इंडोनेशिया, स्पेन, थायलंड, मलेशिया, मेक्सिको, फिलिपीन्स, ब्राझील, पोलंड, तुर्की, सौदी अरेबिया इत्यादिमध्ये केला जाईल. यांची पुष्टी करण्यात आली आहे की, हा फोन प्रीमियम ग्रेड फीचर्स अनि AI आधारित फीचर्ससह लेस असेल. कंपनी फ्लॅगशिप किलर या टॅगलाईनसह या डिव्हाईसची जाहिरात करत आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!