RBI Repo Rate
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी गेल्या 10 पतधोरण समिती बैठकांमध्ये घेतलेली भूमिका आता 11 व्या समिती बैठकीतही कायम ठेवली आहे. अर्थात सलग अकराव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Repo Rate) पतधोरण 6.5 टक्के म्हणजेच जसे होते तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत झालेले निर्णय हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. देशात वाढलेली महागाईचे दर आणि आर्थिक विकास दरामध्ये दिसणारी घट या पाश्वभूमीवर RBI नं व्याजदर जैथे थेच ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजारात चर्चेला सुरुवात झाली आहे. यामुळे महागाई आणि महागड्या ईएमआयच्या दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या सामान्यांवरील भर कायम राहणार आहे.
RBI Repo Rate: कर्ज स्वस्ताईचे स्वप्न दूरच….
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने व्याज दर जसे च्या तसे ठेवल्यामुळे आता पुढील दोन महीने कर्जदारांच्या कर्जदारात कोणताही वध होणार नाही आणि ईएमआय महाग होणार नाही. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दर स्थिर ठेवला चलनविषयक आढावा बैठकीच्या निर्णयाची माहिती देताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा केली आणि म्हटले कि पुन्हा पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि हा दर हा 6.5% वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन दिवसांच्या चर्चेनंतर एमपीसीने व्याजदरात कपात न् करण्याचा निरणी घेतला असून या निर्णयामुळे स्वस्त कर्ज आणि ईएमआय मध्ये कपात होणाच्या आशा पुन्हा धुळीला मिळाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने रपो दरात कोणतीही कपात नं करण्याची ही अकरावी वेळ आहे, त्यामुळे कर्ज स्वस्ताईचे स्वप्न दूरच राहिले.
RBI च्या या ‘तरस्थ’ भूमिकेचा अर्थ काय?
रिझर्व्ह बँकेला प्रचलित आर्थिक परिस्थितीवर आधारित पतधोरण दर समयोजित करण्याची लवचिकता या भूमिकेतून मिळत असतो. याचा अर्थ, महागाई आणि आर्थिक वाढीशी संबंधित आकडेवारीच्या आधारे व या गोष्टी लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेला व्याजदर वाढवण्यास किंवा कमी करण्यास वाव असतो. महत्वपूर्ण अशा महागाई नियंत्रण आणि आर्थिक वाढ या दोन्हीला समान प्राधान्य दिले जाते, यामुळे RBI ला तटस्थ भूमिका स्वीकारवी लागते. त्यामुळे अर्थव्यवस्थेसंबंधी ज्या पद्धतीची आकडेवारी उपलब्ध होते. त्यानुसार व्याजदर कमी करणे किंवा ते वाढवणे असे दोन्हीकडे वळण घेण्याची रिझर्व्ह बँकेला मुभा असते. याचाच अर्थ आर्थिक वाढीवर जोर डेट महगाई व्यवस्थापित करण्यास समान महत्व दिले जाते. म्हणजेच अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारीनुसार रेपो दरात नजीकच्या काळात बदल होऊ शकतात.
RBI Repo Rate: आरबीआय गव्हर्नर रेपो दर बद्दल काय म्हणाले..
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सुरुवात ही MPC वेठकीचे महत्व सांगून केली. दास यांनी सांगितले की MPC आणि RBI धोरणांना लोकांच्या जीवनावर सामान्य माणसाच्या जीवनापासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत परिणाम होतो. महागाईवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी म्हंटले/ तसेच चलनविषयक समितीच्या सहा पैकी चार सदस्य रेपो दर बदलण्याच्या बाजूने नव्हते. त्यांनी पुढे म्हटले, आमची जबाबदारी ही जिडीपी मजबूत करण्याची आहे. व्याजदर स्थिर ठेवताना आरबीआय बँकेने आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे. दास म्हणाले की. MPC ने एकमताने तटस्थ धोरण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
खाद्यपदार्थांची महागाई कमी कधी होणार?
शक्तिकांत दास म्हणाले की, अन्नधान्य चलनवाढ तिसऱ्या तिमाहीत उच्च राहण्याची अपेक्षा आहे पण चौथ्या तिमाहीत घट होऊ शकते. तसेच महागाईचा परिणाम ग्राहकांवर होतो कारण त्यांचे डीस्पोजेबल उत्पन्न घटते ज्याचा परिणाम लोकांच्या खरच शक्ति आणि संपूर्ण अर्थव्यस्थेवर परिणाम होत असल्याचेही आरबीआय गव्हर्नरांनी अधोरेखित केले.
सुश्री मंजू याज्ञिक, नाहक समूहाच्या उपाध्यक्षा आणि वरिष्ट उपाध्यक्ष, NAREDCO, महाराष्ट्र यांनी सांगितले की, रेपो दर हा 6.5% वर सलग 11 व्यांदा कायम ठेवण्याचा RBI चा निर्णय हा वाढह आणि महागाई व्यवस्थापित करण्यासाठी संतुलित दृष्टिकोन आहे. भारताच्या GDP सह आर्थिक वर्ष 2024 – 25 मध्ये 6.5-7% दराने वाढ अपेक्षित आहे आणि रिअर इस्टेट क्षेत्राचे योगदान अर्थव्यवस्थेसाठी 7% स्थिर दर स्थिर परतफेडीच्या अटी सुनिश्चित करते, ज्यामुळे घर खरेदीदारांचा आत्मविश्वास वाढतो आणि मालमत्तेच्या किमती वाढतात. स्थिर कर्जाची परिस्थिति आणि स्थिर बाजारपेठ वास्तविक बनते इस्टेट हा आर्थिक वाढीचा प्रमुख चालक आहे. मागणी वाढवते आणि भारताच्या आर्थिक प्रगतीत महत्वपूर्ण योगदान देते.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!