Ratan Tata Death
Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या निधना नंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रेमी, नफा तोटा न पाहणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा यांची ओळख होती. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रत्न टाटा यांनी एक व्यक्ति आणि उद्योजक म्हणून जगण्याचे अनेक नवे मापदंड घालून दिले आहेत. त्यांच्या निधनानंतर सामाजिक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातून शोकाकुल प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई ही रतन टाटा यांची कर्मभूमी. टाटा घराण्यातील इतर व्यक्तिप्रमाणेच रतन टाटा यांचाही मुंबईशी खास ऋणानुबंध होता.
या पाश्वभूमीवर रतन टाटा यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांच्या क्रिएटिव्ह पद्धतीच्या अनेकदा चर्चा होत असते. आतादेखील रतन टाटा निधनानंतर मुंबई पोलिसांच्या ट्विट हँडलवरुन करण्यात आलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या ट्विटमध्ये एक प्रतिमा तयार करण्यात आली आहे. टाटा उद्योगसमूहाचे भलेमोठे चिन्ह आणि त्यावरून बाहेर चालत जाणारा व्यक्ति प्रतिमेमध्ये दाखवण्यात आला आहे. त्या प्रतिमेच्या खाली Tata, Legend असे लिहिण्यात आले आहे. तर या ट्विट सोबत India lost its RATAN अशी कॅप्शन् लहिन्यात आली आहे.
रतन टाटा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून र्टन् टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, त्यानंतर रतन टाटा यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जारी करत माझी प्रकृती व्यवस्थित असून मी रुग्णालयात काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी रतन टाटा यांचा प्रकृती खालावत गेली आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांचे पार्थिव सध्या कुलाबा येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे. यानंतर सर्वसामान्यांना त्यांचे अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी रतन टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉइंट येथील एनसीपीए येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. यानंतर वरळी येथील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारं, देशसेवेसाठी आयुष्य वाहणार व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. रतन टाटा यांच्याबद्दल देशातील जनतेला वेगळीच आपुलकी होती. टाटा कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांनी लाखों कुटुंबांना आपलंस केल होतं. देशभक्ती व देशहिताचं आदर्श उदाहरण म्हणजे रतन टाटा असंही बोललं जायचं.
Ratan Tata Death: टाटा समूहाला बनवलं विश्वासार्ह ब्रॅंड
मात्र असं असून ही रतन टाटांचा समावेश नेहमीच भारतातील सर्वात विश्वासार्ह उद्योगपतीमध्ये होत आला. भारतात कोरोंनाचं संकट आल्यानंतर आणि त्यानंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी म्हणून रतन टाटांनी तत्काळ तात ट्रस्टकडून 500 कोटी आणि टाटा कंपण्यांकडून 1000 कोटी रुपयांची मदत केली होती. स्वत:ला मोठ्या धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना राहण्यासाठी त्यांनी टाटांच्या लक्झरी हॉटेलचा वापर करण्याची ऑफर दिली होती. असं पाऊल उचलणारे देखील रतन टाटाच पहिले होते. आज सुद्धा भारतातील ट्रॅक चालक त्यांच्या वाहनांचा मागील बाजूस ‘ओके टाटा’ असं लिहितात. जेणेकरून कळावं की हा ट्रक टाटांच्या कंपनीचा आहे आणि म्हणून विश्वासार्ह आहे.
टाटांनी जागतिक स्तरावरील देखील मोठा ठसा उमटवला आहे. टाटा समूह ‘जॅग्वार’ आणि ‘लँड रोवर’ सारख्या जगप्रसिद्ध ब्रॅंडच्या कारचं उत्पादन करतो. तर ‘टाटा कॅन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ जगातील सर्वात प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे. ही सर्व उभं करण्यामागील रतन टाटांचं योगदान नेहमीच लक्षात ठेवलं जाईल. भारतीय संस्कृतीत परोपकार, निस्वार्थपणा, साधेपणा सामाजिक बांधिलकी, नम्रपणा या मूल्यांना प्रचंड महत्व आहे. यशाच्या शिखरावर असताना आणि देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहाच्या प्रमुखपदी असूनही रतन टाटा नावाच्या एका अद्भुत माणसाच्या अंगी या सर्व गुणांच प्रकटीकरण झालेलं होत. म्हणूनच उद्योगविश्वातील त्यांच्या योगदाना बरोबरच एक उत्तम माणूस म्हणून त्यांनी समाजात दिलेलं योगदान भारतीय समाज कधीच विसरू शकणार नाही.
Ratan Tata Death: रतन टाटा यांची कारकीर्द
- जन्म- 28 डिसेंबर 1937, वय 86 वर्ष
- 1961-62 टाटा स्टीलमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून रुजू.
- 1991 मध्ये टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वत:ची हिस्सेदारी वाढवली.
- त्यांनी 1996 मध्ये दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली.
- 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची इंडिका कार टाटा मोटर्सने बनवली. (रतन टाटांचं स्वप्न पूर्ण)
- 2004 मध्ये आयटी क्षेत्रातील टाटा कॅन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी सार्वजनिक केली.
- एका कुटुंबाला मोटरसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना सुचली. 2009 मध्ये रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांसाठी जगातील सर्वात स्वस्त कार उपलब्ध करून देण्याचे वचन पूर्ण केले. ₹ 1 लाख किंमतीची टाटा नॅनो ही मध्यमर्गीयांसाठीची कार त्यांनी बाजारात आणली होती.
- रतन टाटा हे टाटा समूहाचे 1991 ते 2012 आणि 1016 ते 2017 या काळात दोनदा अध्यक्ष होते. त्यांनी कंपनीच्या दैनदीन कामकाजातून माघार घेतली असली ट्री, त्यांनी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून काम चालू ठेवले.
Ratan Tata Death: रतन टाटा यांचा मृत्यू कशामुळे?
रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यामुळे मुंबईतील ब्रिड कँडी रुग्णालयात रतन टाटा यांच्यावर उपचार सुरू होते. रतन टाटा यांना सोमवारी (7 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रिड कँडी रुग्णालयातदाखल करण्यात आलं होत. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन (Ratan Tata Death) झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज 10 ऑक्टोबर 2024 रोजी, दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!