Ramdas Athawale
Ramdas Athawale: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा तिसरा शपथविधी (9 जून)रोजी पर पडला. पंडित नेहरू नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मनही मोदींना मिळाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रीपदासाठी पुढे असत, ते म्हणजे रामदास आठवले (Ramdas Athawale). सरकार कोणाचही येवो आठवलेंची सीट पक्की असते. मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का घेतात? भाजपला आठवलेचा कसा फायदा होतो? हे सगळं आपण संविसठर सजून घेऊया.
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रविवारी मोदींच्या तिसऱ्या सरकारचा शपथविधी पार पडला. या सोहळ्याला जगभरातून पाहुणे आले होते. मोदींच्या मंत्रिमंडळात 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा संवेश होता. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहळ आणि रामदास आठवले यांचा समावेश करण्यात आला आहे.
रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आता रामदास आठवलेना पुन्हा सामाजिक न्याय खत मिळतं की आणखी कुठलं खात दिल जात हे पाहण महत्त्वाच असणार आहे.
2014 पासून रामदास आठवले (Ramdas Athawale) हे मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत. विशेष म्हणजे 2014 पासून आठवलेचा एकही खासदार लोकसभेत निवडून गेलेला नाही, त्याचबरोबर महाराष्ट्रातील विधानसभेत देखील त्यांचा एकही आमदार नाहीये. आठवले हे स्वत: राज्यसभेचे खासदार आहेत. एप्रिल 2026 ला आठवलेचा खासदार पदाचा कार्यकाळ संपतोय. त्यामुळे 2026 पर्यंत तरी आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असणार आहेत.
भाजपला आठवलेंचा काय फायदा?
- निवडणुकीत राजकारणात आठवलेंचा सध्या फायदा होतोय, अशी कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाहीये. केवळ मुंबईतील नगरपालिकांच्या काही वार्डमध्ये आठवलेंचा थेट प्रभाव दिसून येतो. त्यापलीकडे त्यांचा निवडणुकीतील प्रभाव फार दिसत नाही. अस असलं तरी एक दलित चेहरा म्हणून भाजपसाठी त्यांच महत्व अधिक असल्याच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील दलित राजकारणाचे अभ्यासक हरीश वानखेडे सांगतात.
- 2014 पासून भाजप आपली राष्ट्रीय पातळीवर पक्षाची प्रतिमा बदलू पाहत आहे. याआधी भाजप एक ब्राम्हण-बनिया पक्ष म्हणून ओळखला जायचा. त्या प्रतिमेला छेद देण्यासाठी भाजप नेतृत्वाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला.
- सामाजिक न्याय, ओबीसी, दलित मतदार आपल्याकडे कसे वळवता येतील. यासाठी रणनीती आखण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भाजप आठवलेंचा एक दलित चेहरा म्हणून उपयोग करून घेत आहे. अस हरीश वानखेडे यंच विश्लेषण आहे.
- लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपात आठवलेंचा भाजपला काहीच फायदा झाला नाही, हे स्पष्ट दिसत असूनही यांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्यामागे भाजपच काय गणित असाव? यामागे आणखी एक महत्वाच्या कारण असल्याच जेष्ठ पत्रकार मधू कांबळे सांगतात.
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. त्याची वेगवेगळी कारण आहेत. पण सध्या आठवलेंसारख्या दलित चेहऱ्याला डावलल, तर येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचे उलट पडसाद पडू शकतात. तेच टाळण्यासाठी आठवलेंचं मोदी कॅबिनेट मधील स्थान कायम ठेवल असाव, अस कंबळे यांना वाटत.
- याशिवाय आठवलेच्या राजकारणाची लवचिकताही एक कारण असल्याच सांगितल जात. सध्या दलित नेत्यांमध्ये प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे आणि राजेंद्र गवई यासारखे नेते आहेत. पण त्यांनी सत्तेत राहण्यासाठी आठवलेप्रमाणे राजकीय लवचिकता दाखवली नाही.
- यासोबत निवडणुकीत प्रचारात आणि राजकीय सभेत दलित मतदारांचा प्रतिनिधित्व करणाऱ्या निळ्या झेंड्यासाठी आठवलेसोबतच्या आघाडीच्या भाजपला फायदा होत असावा असही म्हंटल जातं.
Ramdas Athawale: आठवलेंच राजकारण कसं बदलत गेल?
64 वर्षीय रामदास आठवलेंचा जन्म 25 डिसेंबर 1959 रोजी सांगलीत जिल्ह्यातील आगळगावच्या आंबेडकरी विचारधारा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांच शिक्षण मुंबईत झालं आहे. दलित पँथरच्या माध्यमातून रामदास आठवलेंनी सामाजिक कार्यात उडी घेतली. सत्तरच्या दशकात राजा ढाले यांनी अमेरिकेतील ब्लॅक पँथरच्या धर्तीवर महाराष्ट्रात दलित पँथर सुरू केली होती.
या चळवळीच्या माध्यमातून दलीतांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर लढा देण्याच काम करण्यात आल. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यानंतर रामदास आठवलें यांनी दलित पँथरच नेतृत्व केल. औरंगाबाद मधील मराठवाडा विद्यापीठाच नमंतर करण्यासाठी आठवलेंनी महत्वाची भूमिका बजावली होती. दलित पँथर बरखास्त केल्यानंतर नव्वदिच्या दशकाच्या सुरुवातीला आठवलेंनी राजकारणात प्रवेश केला.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक गट पडू लागले होते. त्यामुळे रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale Party) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची स्थापना केली. पुढ ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी समाज कल्याण, रजी परिवहन आणि रोजगार हमी मंत्री म्हणून काम पहिले.
Ramdas Athawale: प्रत्येक गावात आठवले गट,पण..
रामदास आठवलेंचा राज्यात कुठेही हुकूमी मतदारसंघ नाहीये, जिथ ते स्वत: निवडून येतील किंवा त्यांनी पाठिंबा दिलेला उमेदवार लोकसभेत किंवा विधानसभेत निवडून शकेल. पण एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक गावात आठवले गत हमखास असायचा. त्यांच्यावर काही प्रमाणात आठवलेंचा प्रभाव रहायचा. नव्वदिच्या काळात सिवसेना प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेत होती. देशात मंडल राजकारणच वर वाहत होत तेव्हा आठवलेचा दलित मतदारांवर मोठा प्रभाव होता.
पण आता दिवसेंदिवस आठवलेंचा दलित मतदारांवरील प्रभाव क्षीण होत चालला आहे. 2024 च्या निवडणुकीत तर तो किंचितही दिसला नसल्याच आकडेवारीतुन दिसून यत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर महाराष्ट्रात फोड फोडीच्या राजकारणात भाजपला फटका बसला आहे. त्यासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानभूती मिळाली. दुसरीकडे, भाजप 400 जागा जिंकून संविधान बदलणार अशी भीती दलित मतदारांच्या पसरली. या सर्व कारणांमुळे यावेळी दलित मतदारांनी पारंपारिक पद्धतीने मतदान केल नाही, अस रिपोटर सांगतात.
ही निवडणूक लोकांची स्वत: च्या हातात घेतली होती. त्यांनी दलित नेत्यांच्या सांगण्याप्रमाणे मतदान केल नसल्याच सांगितले. पण शेवटी भाजपला दलित चेहरा पाहिजे आणि रामदास आठवलेंना (Ramdas Athawale) सत्तेच्या जवळ राहायच आहे. अशा परिस्थितीत ज्या आंबेडकरवादी विचारांमुळे आठवले राजकारणात मोठे झाले त्यांच पुढे काय? असं अनुत्तरित प्रश्न प्राध्यापक यांनी सांगितले. यासोबत निवडणुकीत प्रचारात आणि राजकीय सभेत दलित मतदारांचा प्रतिनिधित्व करणाऱ्या निळ्या झेंड्यासाठी आठवलेसोबतच्या आघाडीच्या भाजपला फायदा होत असावा असही म्हंटल जातं.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!