Ram Narayan: जगप्रसिद्ध सारंगीवादक राम नारायण यांचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Ram Narayan Passes Away

Ram Narayan Passes Away: जगप्रसिद्ध सारंगीवादक आपल्या वादनानं लाखों रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ‘पद्मविभूषण’ पंडित राम नारायण यांचे (8 नोव्हेंबर) रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा सरोदवादक ब्रिज नारायण आणि नातू सारंगीवादक हर्ष नारायण असा परिवार आहे. पंडित राम नारायण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शनिवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास अंत्य संस्कार होणार आहेत. पं. राम नारायण यांचा काही महिन्यापूर्वीच लोकमत चा सुर ज्योत्स्ना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

Ram Narayan Passes Away
Ram Narayan Passes Away

सारंगी वादक पंडित राम नारायण (Ram Narayan Passes Away) यांनी भारतीय संगीताला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवणारे ते पहिले भारतीय संगीतकार होते. सारंगी वादक पंडित राम नारायण यांना पंडित या नावाने ओळखले जायचं. पं. राम नारायण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रासह बॉलीवूड इंडस्ट्रीवरही शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.

पंडित राम नारायण यांनी सारंगी यात्रा लहान वयातच सुरू झाली. त्यांच्या समर्पणामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध सारंगी वादक बनले. त्यांच्या सदरीकरणांनी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि त्यांनी जागतिक मंचावर सारंगी आणि भारतीय अभिजात संगीताला लोकप्रिय करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात 2005 मध्ये भारताचा दूसरा सर्वोच्च नागरी सन्मान, पद्म विभूषण यांचाही समावेश आहे.

Ram Narayan Passes Away: पंडित राम नारायण यांचा जीवन प्रवास

पं. राम नारायण यांचा जन्म 25 डिसेंबर 1927 ला उदयपूर येथे झालेला यांनी सारंगीला संगीत वाद्य म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या वडिलांनी जयपूर मधील सारंगी वादक मेहबूब खान यांना राम नारायण यांना सारंगी शिकवण्याची विनंती केली. 1944 मध्ये त्यांनी लाहोरमधील ऑल इंडिया रेडिओसाठी काम केले. 1947 मधील भारत-पाकिस्तान फाळणीनंतर ते दिल्लीमध्ये स्थलांतरित झाले. भारतीय सिनेसृष्टित काम करण्याच्या उद्देशाने 1949 मध्ये ते मुंबईत आले. पं. राम नारायण यांना 1974-75 मध्ये राजस्थान संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 1975 मध्ये राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुसकर प्रदान करण्यात आले. 1988-89 मध्ये त्यांना राजस्थान संगीत नाटक अकादमीचे फेलो बनवण्यात आले.

Ram Narayan Passes Away

1976 मध्ये मध्ये पद्मश्री, 1991 मध्ये पद्मभूषण आणि 2005 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मध्य प्रदेश सरकारकडून त्यांना कालिदास सन्मान, तसेच 1999 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. ॲलेक्झांडर यांच्या हस्ते विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2013 मध्ये राजस्थान रत्न आणि चौथा ग्लोबल इंडियन म्युझिक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत क्षेत्रातील महान व्यक्ति काळाच्या पडद्याआड गेली आहे. कोणत्याही प्रकारचा प्रसिद्धीचा हव्यास नसलेले आणि केवळ संगीताचा ध्यास असलेली व्यक्ति, जगभरात जिथे भारतीय अभिजात संगीत पोहोचले, तिथे राम नारायणही पोहचले. 60-70 च्या दशकात त्यांच्या सांगीतिक मैफली खूप गाजल्या.

भारतातील संगीत क्षेत्रातील सर्वच पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पारंपारिक संगीताचा वारसा अतिशय श्रद्धेने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जपण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी भारतीय संगीत केवळ आत्मसात केले नसून, ते जपले आणि त्याला विकासही केला.

Ram Narayan Passes Away: पद्मविभूषणने सन्मानित

संगीतकार पंडित राम नारायण 1956 मध्ये सोलो कॉन्सर्ट करणारे पहिले कलाकार बनले, त्यानंतर त्यांनी भारतातील अनेक प्रमुख संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले. त्यांनी अनेक अल्बम रेकॉर्ड केले 1950 च्या दशकात शंकरसोबत दौरा केला. 1964 मध्ये त्यांनी मोठा भाऊ तबला वादक चतुर लाल यांच्यासोबत अमेरिका आणि युरोपात पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केला. त्यांनी अनेक भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना सारंगी वादन शिकवलं. 2000 च्या दशकात त्यांनी परदेशात अनेक कॉन्सर्ट केले 2005 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दूसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

Ram Narayan Passes Away

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शोक प्रकट केले

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल शॉक प्रकट केले आहे. पंडित राम नारायण यांनी आपल्या अद्भुत वादनातून सारंगी हे वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी व स्वर्गीय आनंद देणारे होते. पंडित राम नारायण यांनी देश विदेशात अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले व आपले ज्ञान मुक्तहस्ताने वाटले. त्यांचे दैवी संगीत त्यांच्या पश्चात देखील शतकानुशतके कायम राहील. त्यांच्या निधनामुळे सारंगीतिल एक पर्व संपले आहे. पंडित राम नारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय, शिष्यपरिवार व संगीत प्रेमींना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हंटलं आहे.

पंडित राम नारायण यांच्या निधनानं संगीत क्षेत्रातील एका महत्व कलाकारास आपण मुकलो आहोत, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. ,यू;याचे राजस्थानच्या उदयपूर मधील पंडित राम नारायण हे 50 च्या दशकात मुंबईत आले आणि एकल सारंगी वादक म्हणून त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांनी सारंगी वादनाच्या विविध शैली विकसित करून जागतिक स्तरावर कीर्ती मिळवली. संगीत क्षेत्रातील नवनव्या कलाकारांना पंडित राम नारायण यांचं कार्य नेहमीच प्रेरणा देणारं ठरेल, असं मत मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केलं आहे.

Ram Narayan Passes Away: आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता

पंडित राम नारायण हे असे भारतीय संगीतकार होते, ज्यांनी सारंगीला भारतीय शास्त्रीय संगीतातील एकल वाद्य म्हणून लोकप्रिय केलं आणि ते पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी सारंगी वादक बनले त्यांचे आजोबा हरलालजी बियावत आणि वडील नथूजी बियावतही शेतकरी आणि गायक होते.

पंडित राम नारायण यांनी सारंगी यात्रा लहान वयातच सुरू झाली. त्यांच्या समर्पणामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध सारंगी वादक बनले. त्यांच्या सदरीकरणांनी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि त्यांनी जागतिक मंचावर सारंगी आणि भारतीय अभिजात संगीताला लोकप्रिय करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात 2005 मध्ये भारताचा दूसरा सर्वोच्च नागरी सन्मान, पद्म विभूषण यांचाही समावेश आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!