Raksha Bandhan 2024
Raksha Bandhan 2024: श्रावण महिन्याला ‘सणांचा राजा’ असे आवर्जून म्हटले जाते. कारण, या महिन्यात श्रावणी सोमवार, नागपंचमी, गोकुळाष्टमी आणि रक्षाबंधनाचा सण (Raksha Bandhan 2024) साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे. याच दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला सुंदर भेटवस्तू देतो. यंदा हा रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्ट सोमवारी 2024 रोज साजरा केला जाणार आहे. हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो.
श्रावण पौर्णिमेचा हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र ह वारुणाचे स्थान समजले जाते. या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो. देशभरात हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायांच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम, सनई सुरक्षिततेचे प्रतीक आणले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहीणींचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते.
रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्राकाळ असणार आहे. त्याबाबतीत अनेकांचा गोंधळ निर्माण झाला आहे. पहायला गेले तर भद्राकाळ मानला जातो. कोणत्याही शुभ कार्यात भद्राचा संयोग अशुभ मानलाजातो. त्यामुळे शुभ कार्यादरम्यान भद्राची सावली नसणार आहे याची विशेष काळजी घेतली जाते. यंदा रक्षाबंधनाला भद्राची सावली असणार आहे. भद्राबाबत वेगवेगळी मते आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची वेळ आणि दोषाशी संबंधित जाणून घेऊया.
Raksha Bandhan 2024 हळदीचा टिळा– तुम्ही कोणत्याही पूजेच्या वेळी किंवा शुभकार्याच्या वेळी घरात हळदीचा तिलक लावताना पहिले असेल कारण कारण हळद हे शुभ, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. अशा स्थितीत जेव्हा तुम्ही तुमच्या भावाच्या कपाळावर हळदीचा तिलक लावता तेव्हा त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी येते . याशिवाय हळद देखील आरोग्यदायी मानली जाते. म्हणून तिचे तिलक देखील आरोग्य चांगले ठेवते.
Raksha Bandhan 2024 केशर टिळा- घरातील अनेक शुभ कार्यात केशरचा वापर तुम्ही पहिला असेल. कारण केशर आदर आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. त्याउले रक्षाबंधन दिवशी भावाला केशरचा टिळा लावू शकता. यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते. याशिवाय केशरचा संबंध गुरु ग्रहाशीही आहे. यामुळे तुम्ही केशर टिळा लावल्यानं भावावर गुरु ग्रहाचा आशीर्वाद राहतो.
Raksha Bandhan 2024 कुंकवाचा टिळा- रक्षाबंधन दिवशी औक्षण करताना बहुतांश घरांमध्ये कुंकवाचा नाम ओढला जातो. कारण कुंकू हे विजयाचे प्रतीक मानले जाते. कुंकवाचा टिळा लावल्याने भावाला आयुष्यात विजयी होण्याच्या शुभेच्छा मिळतात. भावाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत राहते. त्याच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होतात. कुंकू दुर्गा देवीसाठीही प्रिय आहे. रक्षाबंधन दिवशी कुंकवाचा टिळा-नाम लावणं ही शुभ मानलं जातं.
Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला भद्रा वेळ
रक्षाबंधन 19 ऑगस्टला सोमवारी असणार आहे. या दिवशी भद्राकाळ पहाटे 5 वाजून 32 मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे 1 वाजून 31 पर्यंत असणार आहे. या दिवशी सकाळपासून भद्रा असली तरी अशुभ फळ मिळणार नाही. भद्रा काळात त्याचे वेगवेगळे परिणाम पहायला मिळतात. हिंदू पंचांगानुसार पाच मुख्य भाग आहेत. यात एकूण 11 करण आहेत. यापैकी 7 स्थिर चल आहेत. आणि 4 स्थिर आहेत. सातव्या कार करण्याचे नव वष्टी किंवा भद्रा आहे. भद्रा नेहमी 4 परिस्थितिचा विचार करते. पहिल्या स्वर्गात किंवा पाताळात,नंतर प्रतिकूल काळातील भद्रा मध्यान्ह भद्रा आणि भद्राच्या शेवटचा काळ. या 4 ही परिस्थिति भद्राचे शुभ किंवा अशुभ परिणाम शोधण्यासाठी मानले जातात. भद्रा कधी आणि कुठे हे चंद्राच्या संक्रमणावरुण कळते.
भद्रा काळात जेंव्हा चंद्र मेष, वृषभ, मिथुन आणि वृश्चिक राशीत असतो तेव्हा भद्रा स्वर्गात वास करते असे म्हटले जाते. पण जेव्हा चंद्र कन्या, तूळ, धनू आणि मकर राशीत असतो तेव्हा भद्रा पाताळात असते, आणि जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा मृत्यू लोकात म्हणजेच पृथ्वीवर वास करतो. त्यामुळे ती अशुभ परिणाम देते. पृथ्वीवर भद्राची उपस्थिती अशुभ मानली जाते. भद्रा स्वर्ग आणि नरकात असताना शुभ मानले जाते. जेव्हा चंद्र मेष, वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू आणि मकर राशीत असेल तेव्हा भद्राकाळात भद्रा स्वर्ग किंवा नरकात असेल. त्यावेळी शुभ कार्यासाठी शुभ मानले जाते. तसेच भद्रा पुष्प नक्षत्रात शुभ कार्य करता येते. ज्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या पद्धतीने ठरवल्या जातात.
(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. MHTimes24 या माहितीचे समर्थन करत नाही.)
Raksha Bandhan 2024: शास्त्रोक्त पद्धतीने राखी बांधावी?
- रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्थानादी कार्य उरकून शुचिर्भूत व्हावे. घरातील देवतांना दंडवत घालावा. आराध्य देवता, कुलदेवता यांचे नामस्मरण करावे. नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावेत.
- एका ताटात किंवा ताम्हणात राखी, अक्षता, कुंकू घ्यावे. अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात. निरांजनही तयार करावे.
- रखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा ताम्हण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी.
- रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. असे सांगितले जाते.
- राखी बांधताना भावाचे टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्याला बांधावे. यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा.
- रक्षाबंधाच्या विधित बहिणीचे प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर किंवा कुंकू लावावे.
- कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात.
- या विधीनंतर भावाचे औक्षण करावे.
- औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो. असे मानले जाते.
- रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा-बहीणींनी एकमेकांना मिठाई द्यावी.
- भाऊ मोठा असेल, तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा.
- रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!