राहुल गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र! “मोदी सरकारने जनतेच्या पाठीत अन् छातीत सुरा खुपसला”

Rahul Gandhi in Loksabha

Rahul Gandhi in Loksabha: ज्याप्रमाणे चक्रव्यूहात अडकवून अभिमन्युला मारण्यात आलं, त्याप्रमाणे देशातील जनतेला ही चक्रव्यूहात अडकवलं जात आहे. या चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान मोदी आणि इतर पाच जणं आहेत, अशी टीका कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आज लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी, पेपरफूटी, अर्थसंकल्प या मुद्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरले. देशातील दलित आणि मगासवर्गीयांना कुठेही स्थान मिळत नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मात्र या भाषणा दरम्यान एकवेळ असही आली की, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी डोक्यावर हात मारून घेतला.

Rahul Gandhi in Loksabha
Rahul Gandhi in Loksabha

तसेच जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi in Loksabha) यांच्या भाषणातील काही मुद्दे ऐकुन अनेकजण स्तब्ध झाले. या भाषणा दरम्यान राहुल गांधी एक फोटो दाखवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच यावेळी ते आहेत म्हणत होते, देशात हलवा वाटला जातोय. देशातील केवळ 2 ते 3 टक्के लोक हा हलवा बनवत आहेत आणि आपसात वाटून खात आहेत. परंतु, यात कुठेही दलित, ओबीसी व आदिवासी दिसत नाहीत राहुल गांधी याचं हे वक्तव्य ऐकुन अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दोन्ही हात कपाळाला लावले आणि हसत हसत तोंड लपवू लागल्या.

राहुल गांधी लोकसभेत हलवा समारंभाचे फोटो दाखवत होते. अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी बनवण्याची प्रथा आहे. ही प्रथा अनेक दशकांपासून चालत आली आहे. सभागृहात आज राहुल गांधी यांनी समारंभाचे काही फोटो दाखवत प्रश्न उपस्थित केला की “यात दलित व ओबीसी अधिकारी कुठे आहेत? राहुल यांच्या या प्रश्नावर निर्मला सीतारामन आधी चकित झाल्या आणि नंतर त्यांनी कपाळावर हात मारला, त्यानंतर त्या हसू लागल्या तसेच त्यांनी दोन्ही हातांनी चेहरा झाकला होता. राहुल गांधी म्हणाले, “या फोटोत हलवा वाटप छलू असल्याचं दिसतंय. मात्र यात एकही ओबीसी, आदिवासी किंवा दलित अधिकारी उपस्थित नाही आपल्या देशात नेमकं काय चाललंय? देशात हलवा वाटला जातोय आणि देशातील 73 टक्के लोकसंख्ये पैकी एकही व्यक्ति तिथे नाही. काही मोजके लोक हलवा खाता आहेत. आणि इतरांना मिळत नाहीये.”

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणावेळी जोरदार राडा झाला. महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. चक्रव्यूहाचा देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक अडकले आहेत. या चक्रव्यूहाचं चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या छातीवर लावून फिरतात. अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी सभागृहात हलवा समारंभाचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नकार दिला,

Rahul Gandhi in Loksabha

Rahul Gandhi in Loksabha: नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी (Rahul Gandhi in Loksabha) म्हणाले, 20 अधिकाऱ्यांनी मिळून देशांचा अर्थसंकल्प तयार केला. 20 लोकांनी हलवा वाटला. मात्र देशातील 90 टक्के लोकांपैकी यात केवळ दोनच जन आहेत. यात एक अल्पसंख्याक व एक ओबीसी आहे. तर हलवा बनवण्याच्या कार्यक्रमात तर अल्पसंख्याक व एक ही अधिकारी तिथे नाही. आदिवासी, ओबीसी आणि दलितांना कुठेच प्रतिनिधित्व मिळत नाहीये. त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की अर्थसंकल्पात जातीनिहाय जनगणना व्हायला हवी. देशातील 95 टक्के लोकांची तीच मागणी आहे, यावर अर्थमंत्र्यांनी चेहरा लपवला.

शेतकरी, कामगारांना मदत केली जाईल असे वाटले होते पण..

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याची शक्ति कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना मदत केली जाईल. तरुणांना मदत केली जाईल. देशातील कामगार, छोट्या उद्योजकांची मदत केली जाईल. मात्र या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एकाधिकारशाहीच्या सूत्राला आणखी मजबूत करण्यात आलं. एकाधिकारशाहीमुळे लोकशाही मूल्यांना नेस्तनाबूत केलं. उद्योगातील एकाधिकारशाहीमुळे देशातील लघु, लहान उद्योगांना फटका बसला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi in Loksabha

Rahul Gandhi in Loksabha: तरूणांपूढे सर्वात महत्वाचा मुद्दा बेरोजगारी

आज देशातील तरूणांपूढे सर्वात महत्वाचा मुद्दा बेरोजगारी आहे. स्पर्धा परीक्षांचे पेपर लिक होत आहेत. गेल्या 10 वर्षात 70 वेळा या परीक्षांचे पेपर लिक झाले आहेत. या पेपर फूटीबाबत या अर्थसंकल्पात एक शब्दाचाही उल्लेख नाही. सरकारने तरुणांसाठी अग्निवीर योजना फसवलं. या अर्थसंकल्पात अग्निवीरांच्या पेन्शन योजनसाठी एक रुपयांची तरतूद ही केली नाही. शेतकऱ्यांनी एमएमपी कायदेशीर हमीची मागणी केली आहे. मात्र, त्याचा कोणताही उल्लेख या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. इतकं काय तर शेतकरी जेव्हा मला भेटायला संसदेत आले. तेव्हा त्यांना आत देखील येऊ दिले नाही, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

Rahul Gandhi in Loksabha: शिक्षणासाठी सर्वात कमी तरतूद

अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शिक्षण, पेपर फुटीवर कोणतेही भाष्य केलेले नाही. शिक्षणासाठी सर्वात कमी आर्थिक तरतूद करण्यात आली. टॅक्स टेरीरिझम रोखण्यासाठी सरकारने काहीही केलेलं नाही.. सरकारने मध्यम वर्गाच्या पाठीत आणि छातीत सुरा खुपसला आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi in Loksabha: भाजपच्या चक्रव्यूहामागे तीन मोठ्या शक्ति

21 व्या शतकातील चक्रव्यूहामागे तीन शक्ति काम करत आहेत, एक म्हणजे भांडवल दारांची एकाधिकारशाही, दुसर म्हणजे देशातील तपास संस्था आणि तिसरं म्हणजे राजकारण शक्ति. आज संपूर्ण देशाची संपत्ति केवळ दोन तीन व्यक्तीच्या हातात आहे, देशातील तपास संस्थांचा वापर करून विरोधकांवर दबाव आणला जात आहे. अशी टीकाही राहुल गांधी (Rahul Gandhi in Loksabha) यांनी केली.

या चक्रव्यूहने पहिला हल्ला छोट्या-मध्यम उद्योगांवर केला

मोदी सरकारच्या चक्रव्यूहने सर्व प्रथम या देशातील छोट्या व मध्यम व्यवसायिकांवर हल्ला केला. हे तेच व्यवसायिक आहेत. जे देशातील लाखों तरुणांना रोजगार देतात. नोटबंदी आणि जीएसटी लागू करून त्याचे व्यवसाय या सरकारने बंद पाडले. त्यामुळे कितीतरी तरुण बेरोजगार झाले. या उद्योगांसाठी सरकारने या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!