आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती! कुणाकुणाचे मानले आभार?

R Ashwin Retirement

R Ashwin Retirement: क्रिकेट विश्वातुन मोठी बातमी समोर येत आहे. आता चाललेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी आणि दिग्गज ऑलराऊंडर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतातील आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आर आश्विन मानलं जातं. आर. अश्विन आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी- 20 अशा तिन्ही प्रकरांमधील 287 सामने खेळला असून या कारकिर्दीत त्याने 765 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या बीसीसीआयने ही आर. अश्विनला पुढील प्रवसांसाठी सदिच्छा दिल्या आहेत. आतापर्यंतच्या करकीर्दीचं बीसीसीआयनं कौतुक केलं आहे.

R Ashwin Retirement
R Ashwin Retirement

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील गाबा कसोटीतिल तिसरा सामना हा पावसामुळे अनिर्णीत राहिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि आर आश्विन या दोघांनी पत्रकार परिषेद घेतली. अश्विनने या पत्रकार परिषेदेतुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करत असल्याचं (R Ashwin Retirement) जाहीर केलं. आर आश्विनने घेतलेल्या या एकाएकी निर्णयामुळे टीम इंडियाला आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. अश्विनच्या या निर्णयासह त्याच्या 13 वर्षीय क्रिकेट कारकीर्दीचा अंत झाला आहे. टीम इंडियाची गेली अनेक वर्ष सेवा करणाऱ्या या दिग्गज खेळाडूला निरोपही देता न आल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

आश्विन ने निवृत्ती जाहीर करून सर्वांनाचं धक्का दिला आहे. तेव्हा विराट कोहली बरोबर बोलतांना आश्विन खूप भावुक झालेला दिसला. विराट त्याला मिठी मारत त्यांचं सांत्वन करताना दिसला. ज्याचा व्हिडिओही व्हायरल होताचं त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती आणि सामना संपताचं त्याने निवृत्ती जाहीर केली. रवीचंद्रन अश्विन हा भारतीय इतिहासातील आता पर्यंतचा सर्वात यशस्वी फिरकीपट्टू ठरला आहे. या दौऱ्यात त्याला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. ॲडलेडनंतर तो गाबा कसोटीच्या प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर झाला आहे. गाबा कसोटी दरम्यान आश्विन टीम इंडियाच्या खेळाडूंना मिठी मारताना दिसला. त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी मारली. आश्विनने मुख्य प्रतिक्षक गंभीर यांच्याशीही बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषेद घेऊन (R Ashwin Retirement) निवृत्ती जाहीर केली.

R Ashwin Retirement: आश्विन याने या व्यक्तींचे मानले आभार

पत्रकार परिषेदेत अश्विन म्हणला की, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मधून निवृत्ती घेत आहे. मला खात्री आहे की, क्रिकेटपटू म्हणून अजूनही माझ्यात काहीतरी उरलं उरलं आहे, मात्र आता त्याचा वापर मी कदाचित क्लब स्तरावरील क्रिकेटमध्ये करेन. माझ्या करकीर्दीत मी खेळण्यातून मनमुराद आनंद लुटला. क्रिकेटमध्ये करेन. माझ्या कारकिर्दीत मी खेळण्यातून मनमुराद आनंद लुटला. क्रिकेटशी संबंधित अनेक सुंदर आठवणी जोडल्या गेल्या आहेत. मला रोहित शर्मा आणि अनेक सहकार्यानसोबत घालवलेले क्षण आठवतात, ड्रेसिंग रूममध्ये त्यांच्याशी निगडीत आठवणीही आहेत. मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो.

R Ashwin Retirement

याशिवाय अनेक नवे आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे रोहित, विराट कोहली, अजिंक्य, पुजारा ज्यांनी माझ्या चेंडुंवर अनेक चंगळे झेल घेतले. माझ्यासाठी भावनिक क्षण आहे, माफ करा आता या क्षणी मी तुमच्या कोणत्याच प्रश्नांना उत्तर देऊ शकणार नाही. पण तुमचे खूप खूप आभार.

R Ashwin Retirement: आर. आश्विन यांचा क्रिकेट मधील प्रवास

  • “अरे जेसबॉल, ही तुझ्यासाठी फिल्डिंग लावली आहे. आता मार.” धर्मशाळा कसोटी सामन्यापूर्वी रवीचंद्रन अश्विनचे हे शब्द तुमच्या कानावर पडतात. तेव्हा भारतीय क्रिकेट हा दिग्गज सलामवीर त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी त्याच पद्धतीने वागतो जसं तो पहिल्या सामन्यावेळी होता, यावर विश्वास ठेवणं कठीण होतं.
  • अश्विनचा हा टोमणा ऐकुन जैस्वालच नाही तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव ही जोरजोरात हसायला लागले. अश्विन यांनी मैदानात असताना क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत खेळाडू म्हणून अनेक बदल केले आहेत, पण मैदानाबाहेरही त्याने आपल्या व्यक्तिमत्वात अनेक गुण जोडले आहेत. त्यामुळे तो प्रत्येक वयोगटातील आणि प्रदेशातील खेळाडूसमोर अतिशय सहज वागतो.
  • तमिळनाडू मधून येणारे खेळाडू पारंपरिकरित्या हिंदी भाषेशी संघर्ष करतात, पण अनधिकृतपणे ही भारतीय ड्रेसिंग रूमची भाषा आहे. 100 कसोटी क्लबमध्ये सामील होणारा तमिळनाडूचा पहिला खेळाडू होण्याचा अर्थ काय आहे, असा प्रश्न पत्रकार परिषेदेत अश्विनला विचारण्यात आला. त्याने अतिशय तात्विक उत्तर दिले.
  • अश्विन म्हणाला “एक यशस्वी भारतीय क्रिकेटपटू होण्याचे अनेक पैलू आहेत आणि या काळात तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल.”
  • येणाऱ्या पुढील काळात ते तमिळनाडूच्या युवा खेळाडू सोबत आपले अनुभव शेअर करून राज्यातील खेळाडूंना आशिक चांगली कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची इच्छा अश्विननं बोलून दाखवली.
  • आश्विनच्या विलक्षण कारकिर्दीची कहाणी केवळ तमिळनाडूचा क्रिकेटर किंवा फक्त भारतीय क्रिकेटपट्टू म्हणून पाहणे योग्य नाही.

R Ashwin Retirement: आर. अश्विन यांची कसोटी मधील कारकीर्द

आर. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 106 सामन्यात 537 विकेट घेतल्या आहेत. त्यांच्या नावावर 37 वेळेस 5 विकेट घेतले आहेत. आणि 8 वेळ सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने 156 एकदिवशीय विकेटही घेतल्या आहेत. अश्विनने टि-20 मध्ये 72 विकेट घेतल्या. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण 765 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने फलंदाज म्हणून आपली छाप सोडली. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 3503 धावा आहेत आणि त्याने एकूण 6 कसोटी शतकं झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नवे एकूण 8 शतकं होती.

दरम्यान अश्विन याने आपल्या करिअरमध्ये 11 वेळा सामनावीरचा पुरस्कार जिंकला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडियाचा दूसरा खेळाडू ठरला आहे. या यादीमध्ये 619 विकेटसह पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहे.

R Ashwin Retirement

R Ashwin Retirement: अश्विन याला कधीच कर्णधारपदाचा दावेदार समजलं नाही

अश्विन याला कसोटी कर्णधार पदासाठी कधीही गंभीर दावेदार मानले गेले नाही. आश्विनची अनेकदा अनिल कुंबळे या महान गोलंदाजाशी तुलना केली जाते. कुंबळे प्रमाणेच अश्विनला देखील सुरुवातीच्या टप्प्यात टोमणे ऐकावे लागले की, तो देशात उत्कृष्ठ खेळतो, पण परदेशी खेळपट्यांवर प्रभावी खेळत नाही. पण कुंबळे प्रमाणेच अश्विननेही प्रत्येक टीकेला त्याच्या शांत आणि अनोख्या शैलीत आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले. कुंबळेला त्याच्या शेवटच्या टप्प्यात कसोटी कर्णधारपद मिळाले होते. अश्विन आता त्या शर्यतीतूनही बाहेर पडला आहे. अजिंक्य रहाणे आणि नंतर रहित शर्मा सारख्या फलंदाजांना भारतीय कसोटी कर्णधारपद मिळाले. पण आश्विनने या निराशेबाबत कधीच त्याच्यात बदल केला नाही आणि ही काही क्षुल्लक गोष्ट नाही.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!