“Pushpa 2” लवकरच येणार सिनेमागृहात काय असेल स्टोरी जाणून घ्या!

Pushpa 2 Release Date: 2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा : द राइज’ या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश वेड करून सोडलं. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाची क्रेज आजही कायम आहे. या सिनेमातील गाणी आणि डायलॉग्सही प्रचंड व्हायरल झाले होते. ‘पुष्पा’ नंतर आता चाहते या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतीक्षेत आहेत. ‘पुष्पा 2’ चं शूटिंग जोरदार सुरू असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी पुष्पा 2 सिनेमाच दुसर पोस्टर प्रदर्शित करण्यात आल होत. आता या सिनेमातील श्रीवल्लीचा पहिला लुक समोर आला आहे.

Pushpa 2 Release Date
Pushpa 2 Release Date

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा : द राइज’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून पुन्हा एकदा रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. आता ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना ही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. आज रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त तिचा या चित्रपटातील पहिला लुक समोर आला आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटातील श्रीवल्लीचा पहिला लुक समोर आला आहे. यात टि फारच सुंदर दिसत आहे. पुष्पा या चित्रपटाच्या अधिकृत ट्विटवरून एक ट्विट करण्यात आले आहे. यात त्यांनी रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाचे पहिले लुक शेअर केले आहे.

Pushpa 2 Release Date चित्रपटातिल पहिला लुक केला शेअर

रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘पुष्पा 2: द रुल‘ या चित्रपटाचे पहिले लुक शेअर केले आहे. या चित्रपटाचा टीजर हा 8 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये रश्मिकाने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. यात टी फारच सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या गळ्यात विविध दगीनेही पाहायला मिळत आहे. यात हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकुही पाहायला मिळत आहे. पुष्पा 2 मधी श्रीवल्लीचा हा लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Pushpa 2 Release Date

नवीन पोस्टर मधला श्रीवल्लीचा नाव अवतार एकदम थक्क करणारा आहे. रश्मिकाचा हा अवतार तिच्या चाहत्याना खूप आवडला आहे. तसेच हे पोस्टर पाहिल्यानंतर टि या चित्रपटात काय धमाल करणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्याना लागली आहे.

समंथा रुथ प्रभूही झळकणार खास भूमिकेत

Pushpa 2 Release Date हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि लेखन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनएकत्र झळकणार आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना ला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ‘पुष्पा 2’ या चित्रपटात समंथा रुथ प्रभू छोट्या भूमिकेत झळकणार आहे. तर चित्रपटात संजय दत्तचीही भूमिका पाहायला मिळणार असल्याचे बोलल जात आहे. ‘पुष्पा 2’ च्या सेटवरील काही फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे या सिनेमाबाबत चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘श्रीवल्ली’ धुमाकूळ घालणार

पुष्पा‘ या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना एका निष्पाप मुलीच्या भूमिकेत दिसली होती. पण, आता रश्मिकाचा अवतार पुढच्या भागात वेगळा असणार आहे. तिच्या टिश्न नजरेकडे आणि रागाने भरलेल्या नजरेकडे बघून तिच्या पात्राचा अंदाज येत आहे. ‘पुष्पा 2’ एक प्रकारे श्रीवल्लीचा लुक पॉवरफुल असणार आहे. ‘पुष्पा 2’ मध्ये आता श्रीवल्ली अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ लाच टक्कर देणार काय, असा प्रश्न चाहत्याना पडला आहे. कारण, या चित्रपटाच्या पोस्टरमधील तिची स्टाइल स्त्री शक्ति दाखवणार आहे.

Pushpa 2 Release Date कधी येणार टीझर?

नुकतंच ‘पुष्पा 2: द रुल’ चं आणखी एक पोस्टर रिलीज झालं होत. या पोस्टरसह चित्रपटाच्या निर्मात्यानी टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली होती. 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या खास मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असल्याचे म्हणण्यात आले आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना निर्मात्यानी लिहिले होते की, ‘पुष्पा मास जत्रा’ सुरू करूया बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2: द रुल’ चा टिझर 8 एप्रिल रोजी दुप्पट ताकदीने येत आहे. Pushpa 2 Release Date हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘पुष्पा 2’ ची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार ‘पुष्पा 2’ हा चित्रपट 15 ऑगस्ट ला रिलीज होणार आहे. 2024 च्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर तुम्हाला हा ऑप्शन चित्रपट पाहता येणार आहे. या आधी पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनचा लुकही रिलीज झाला आहे. त्या पोस्टरनंतर चाहत्यांच्या हृदयाचे ठोके आणखी वाढले आहेत.

थिएटर आधीच ‘पुष्पा 2’ च ओटीटी रिलीज जाहीर!

निर्मात्यानी चित्रपटाच्या थिएटर रिलीज पूर्वीच ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. ‘पुष्पा 2’ आता ओटीटीवर देखील धुमाकूळ घालणार आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लीक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लीक्सने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. या पोस्टमध्ये ‘पुष्पा 2’ च्या पोस्टरसह कॅप्शन लिहिले आहे की , ‘पुष्पा 2’लवकरच नेटफ्लीक्स हिन्दी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये बघता येणार आहे. मात्र हा चित्रपट नेमक्या कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला ओटीटी वर रिलीज होणार, याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

‘पुष्पा 1’ हा चित्रपट 2021 मध्ये थिएटर मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या कथेपासून ते चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली होती. तर साऊथ क्वीन अनिनेत्री समंथा रुथ प्रभूने या चित्रपटात एक आयटम सॉन्ग केले होते. जे खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली होती. पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 373 कोटींची कमाई केली होती.

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरलाही प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. चित्रपटाची ही छोटीशी झलक पाहिल्यानंतर प्रेक्षक पुन्हा एकदा या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटातही अल्लू अर्जुन सोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाशी टक्कर होणार आहे. हे दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!