लेकाची शान, दोन कुटुंबांच्या मनावर आयुष्यभरासाठी घाव; जीव घेऊन निबंध लिहायला लावतात!

Pune Porsche Car Accident

Pune Porsche Car Accident: पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन अभियंत्यांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेने पोलिस प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि राज्यात खळबळ माजली आहे. एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यपान करत आपल्या पोर्शे कारने या दोन अभियंत्यांना उडवल. यावेळी ही पोर्शे कार भरधाव वेगात होती. या घटनेत अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया या दोघांचा मृत्यू झाला आहे.

आश्चर्य म्हणजे इतक्या क्रूर(Pune Porsche Car Accident) दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासात जामीन मंजूर करण्यात आला. हा अल्पवयीन आरोपी सामान्य व्यक्तीचा पोरगा नसून एका बड्या घरचा शहजादा असल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया समान्यांमधून उमटू लागल्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला संभाजीनगर येथून अटक केली. तर अल्पवयीनवर दाखल केलेल्या गुन्ह्यात दारू पिऊन गाडी चालविल्याचे कलम समाविष्ट केले आहे.

Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car Accident

या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यात पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 304,304 (अ), 279, 337, 338, 427 आणि मोटर वाहन अधिनियम 1988 च्या 184, 119 आणि 177 नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यात आता पोलिसांनी कलमवाढ करून मोटार वाहन अधिनियम 1988 च्या 185 ची कलमवाढ केली आहे.

हा कोणता न्याय, मृतांचे कुटुंबीय संतापले

Pune Porsche Car Accident अश्विनी कोस्टा ही मध्य प्रदेशातील जबलपूरची होती तर अनिस अवधिया हा उमरिया जिल्ह्यातील बिरसिंहपुर च्या पाली गावचा राहणारा होता. हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. आपल्या पोरांचा अशा प्रकारे जीव घेणाऱ्याला फक्त निबंध लिहाण्याची शिक्षा सुनावण्यात आल्याने कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. ‘आमच्या नातवाचा बळी घेणाऱ्या आरोपीला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगून जमीन देणे हा कोणता न्याय आहे.’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया अनिसचे आजोबा यांनी दिली. तर एकुलती एक लेक गामावल्याने अश्विनीच्या आई वडिलांच्या डोळ्यातील आसव थांबत नाहीयेत.

‘राज्यघटना आणि कायद्याच्या आधारे दोषींवर कारवाई व्हावी. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे चुकीचे आहे. आमची मुले मोठी झाल्याशिवाय आम्ही त्यांना वाहन चालवायला दिले नाही.’ असे सुरेश कोस्टा म्हणाले. दुसरीकडे अनिसच्या अपघाती मृत्यूचे दु:ख त्याची आई आणि आजीला सहन होत नव्हते. ‘अनिस महिनाभरापूर्वी घरी आला होता. त्याचे लवकर लग्न करून घरी सून आणण्याचे स्वप्न आई पाहायची; परंतु आता सारा आनंद हिरावला गेला,’ असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

अशी घटना घडते तेव्हा कारवाई कशाप्रकारे केली जाते?

18 वर्षाखालील मुलगा गाडी चालवत होता त्यामुळे याप्रकरणात बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 या कायद्यांतर्गत कारवाई होईल. याच कायद्यांतर्गत त्याला जामीन मंजूर करत 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला गेला. जर एखादी प्रौढ व्यक्तीकडून ही घटना घडली असती तर भांदवीअंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली असती. त्याला अटक झाली असती आणि खटला चालला असता. जॉ निर्णय कोर्टाने दिला आहे, त्यामध्ये कोणताही दोष देता येणार नाही कारण आपला कायदाच तसा आहे. अस जेष्ठ कायदेतज्ञ अॅड. आभा सिंग यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितल.

Pune Porsche Car Accident: 15 तासांच्या दिरंगाई भोवणार?

15 तासांच्या दिरंगाई ही पोलिसांनी जाणूनबुजून केली. कारण, तो एका बिल्डरचा मुलगा असल्याने त्यांना पैसे मिळाले असतील, इतकंच नाही तर एनसीपी चे आमदार रात्री पोलिस स्टेशनला पोहचले, त्यांनी स्वत:सांगितले की रात्री त्या बिल्डरचा मला फोन आला होता. जर, राजकीय नेते जिथे जातील तर पोलिस कारवाई करण्यास घाबरतीलच, त्यामुळे पोलिसांनी एफआयआर मध्येही अस नमूद केल की निष्काळजी पणामुळे मृत्यू झाला. हे जामीनपात्र आहे आणि त्यात दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. त्याने मद्यपान केल होत. त्यामुळे त्यांच्यावर 302 (2) हे कलम लावायला हव होत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

जास्तीत जास्त तीन वर्षाची शिक्षा

अल्पवयीन मुलांवर जुवीनाईल जस्टीस बोर्डच कारवाई करत, त्याच्यावर भारतीय दंड विधानांतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही. पण, कायद्यात हे देखील लिहिलेल आहे की जर 16 टे 18 वर्षाच्या मधील एकदा अल्पवयीन अशा प्रकारची घटना घडून आणतो कीव एखादं क्रूर कृत्य करतो. त्यामध्ये जुवीनाईल जस्टीस बोर्ड त्याला बाल न्यायालयात पाठवू शकते. तिथे त्याच्यावर कारवाई होईल. बाल न्याय कायदा कलम 18 अंतर्गत तीला जास्तीत जास्त ती वर्षाची शिक्षा होऊ शकते. ते पण त्याला बालसुधार गृहात ठेवल जाईल, तुरुंगात नाही.

पोलिसांना कोर्टासमोर हे तथ्य सिद्ध कराव लागेल की जारी त्यांच वाय कमी असलं तरी त्याची मानसिकता ही प्रौढाची आहे, त्याने मद्यपान केल होत, त्याने निष्काळजीपणाचे हे कृत्य केल त्यामुळे त्याला प्रौढसमजून कारवाई करण्यात यावी. मग यावर निर्णय घेतला जाईल आणि त्याच्यावर भांदवीच्या कायद्यांतर्गत कारवाई आणि शिक्षा होऊ शकते.

पण, 15 तास उशीर केल्याने त्याच्या ब्लड रिपोर्टमध्ये अल्कोहोल कन्टेंट आलेला नाही त्यांमुळे त्याच्यावर कारवाईची शक्यता फार कमी आहे. जस चाललं आहे तसंच चालू राहणार, असंही त्या म्हणाल्या.

वकील कोर्टात सांगतील कि पोलिसांनी दबावाखाली येऊन हे कलम बदलले, तसेच त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये काही नसल्याने ही केस वीक झाली आहे. वकील त्या सीसीटीव्ही फुटेजलाही आव्हान देतील. त्यामुळे या प्रकणात आरोपीवर कडक कारवाई होणार नाही, अस त्यांनी सांगतील.

पुणे पोलिसांना प्रकरणात नवी चार्जशिट दाखल करावी लागणार

Pune Porsche Car Accident पोलिस आता कोर्टात पुन्हा नव्याने नव्या पुराव्यासह नवी चार्जशिट दाखल करू शकते. तसेच. मेडिकल रिपोर्टमध्ये डॉक्टरांकडून हे लिहून घ्याव की इतक्या तासांनी हे मेडिकल झालं आहे. आता पुणे पोलिसांना प्रकरण मजबूत करण्यासाठी मेहनत करावी लागेल, प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवावे लागतील.

नव्या वाहतूक नियमानुसार, जर अल्पवियन मुलांकडून अशा प्रकारचा गुन्हा घडतो, तर असं मानलं जातं की त्याला वाहन देणाऱ्या पालकांकडून किंवा गार्डीयनकडून हा गुन्हा झाला आहे. त्यामुळे त्यांना तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!