Pune Police Seize Gold
Pune Police Seize Gold: महाराष्ट्रांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कुठलेही गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका कारमध्ये 5 कोटींची रक्कम सापडली होती. त्या नंतरच ही दुसरी घटना म्हणजे पुण्यातील सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. तेथील एका संशयित वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता. त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले. हे सोनं नेमकं आलं कुठून, कुठे जात होतं? कोणाचं होतं याचा तपास आता पोलिस करत आहेत.
निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पाश्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता आहे. सातारा रस्त्यावर आज पुढील तपासणी सुरू असून पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तपासणी वेळी हा टॅम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता. त्यांच्याकडे चौकशी केली, त्याची तपासणी अद्याप चालू आहे. हे जवळपास 138 कोटी रुपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी आज नाकाबंदी दरम्यान एक टॅम्पो पकडला असून तब्बल 138 कोटी रुपये किमतीचे सोने या टॅम्पोमध्ये आढळून आलं. आहे.
सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टॅम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होत, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयात हा टॅम्पो सध्या आणलेला आहे. याबाबत, पुण्यातील डिसीपी स्मार्तना पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा टॅम्पो पोलिस आयुक्त कार्यालयात हा टॅम्पो नेण्यात आलेला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक ठिकाणी कोट्यावधी रुपये सापडत आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये गैरव्यवहार होऊ नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. शहर परिसरात ठीकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. गाड्याची तपासणी केली जात आहे, त्या तपासणीमध्ये हे सोने आढळून आले आहे. पोलिसांकडून सध्या निवडणुकांच्या पाश्वभूमीवर नाकाबंदी व 24 तास तपासणी सुरू आहे. मुंबई बंगळूर बाह्यवळण मार्गावर खेड शिवापुर परिसरात ग्रामीण पोलिसांनी (Pune Police Seize Gold) एका मोटरीतून पाच कोटी रुपयांची जप्त केली होती. मावल तालुक्यात पावणे अठरा लाखांची रोकड जप्त केली होती.
Pune Police Seize Gold: पोलिसांनी दिली माहिती
पुणे पोलिसांनी आज नाकाबंदी दरम्यान एक टॅम्पो पकडला असून तब्बल 138 कोटी रुपये किमतीचे सोने या टॅम्पोमध्ये आढळून आलं. आहे. सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टॅम्पो (Pune Police Seize Gold) एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होत, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयात हा टॅम्पो सध्या आणलेला आहे. याबाबत, पुण्यातील डिसीपी स्मार्तना पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा टॅम्पो पोलिस आयुक्त कार्यालयात हा टॅम्पो नेण्यात आलेला आहे.
गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त
पुण्यात खेड शिवापुर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाल होतं. सोमवारी रात्री पुण्यात खेड शिवापुर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
हिंगोली 1 कोटींची रोकड जप्त
निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हिंगोली शहरातही पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. नाकाबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी 1 कोटी 40 लाखाची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी रोकड जप्त करून तपास करू केला असून प्राथमिक तपासात ही रोकड एका बँकेची असल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोली शहरात बस स्थानक परिसरात पोलिसांना एका इनोवा कारमध्ये 1 कोटी 40 लाख रुपयांची रोकड सापडली आहे, ही रोकड पोलिसांनी जप्त केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड कशी आली, याचा तपास केला जात आहे.
Pune Police Seize Gold: काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने पुण्यात छापे मारले
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करण्याच्या प्रयत्नातिल असल्याची भाजपचे माजी नगरसेवक अमोल बाळवडकर यांचे सासरे हे चंद्रकांत कटके आहेत. त्यांच्या घरी छापा टाकल्यामुळे ही राजकीय खेळी असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच सोमवारी रात्री उशिरा खेड शिवापुर टोल नाक्यावर नाकाबंदी 5 कोटी रुपये नेणाऱ्या मोटारीला पोलिसांनी अडविले. त्याच्याकडील रक्कम जप्त करीत कारवाई केली आहे. ही रक्कम शिंदे गटाच्या आमदाराची असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकहोते. भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत पाटील यांना संबंधित मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली जाते. दरम्यान यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ट नेत्यांनीही त्याच्यासोबत चर्चा केली होती. बालवडकरांचे सासरे चंद्रकांत कटके यांचे वाघोलीत घर आहे. त्याठिकाणी छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र केसरी अभजीत कटके यांनी एकदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला. तर दोन वेळा उपमहाराष्ट्र ठरले आहे. कटके पुण्यातील शिवरामदादा तलामीचा पहिलवान असून 2015 मध्ये युवा महाराष्ट्र केसरीचा मन मिळवला होता. त्यांनी 2016 मध्ये ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
अभिजीत कटके हे माजी नगरसेवक व कोथरूड विधान सभेसाठी इच्छुक उमेदवार अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत. कोणाकडे कीती मालमत्ता मिळते याचीच चर्चा परिसरात सुरू आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!