Pune Heavy Rain Update
Pune Heavy Rain Update: खडकवासला धरणातून मुठा नदीत सध्या 35000 क्युसेक्स ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एकतानगर मधील द्वारका अपार्टमेंटचे पार्किंग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. एकतानगरमधील इतर सोसायटीच्या बाहेर सुद्धा पाणी सचायला सुरुवात झाली आहे. भारतीय लष्कर जवान, अग्निशमन दल, पोलिस कर्मचारी तसेच महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. पुण्यात धरण परिसरात तूफान पाऊस (Pune Heavy Rain Update) सुरू आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिति यावेळी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. दरम्यान पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात सोसायटीमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालीय.
सोसायटी मधील नागरिकांना बाहेर काढण्यात येतंय. दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे तसेच निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादि सर्व व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा वाढल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, पुण्यातही आज विविध धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पाश्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून पुणे दौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी शनिवारी बैठक घेतली होती. या बैठकीत कोणत्या मुद्यावर चर्चा झाली याची माहिती ही त्यांनी पुणेकरांना दिली. तसेच भिडे ब्रिज पुलाजवळ शॉक लागून मुत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांनाही मदत देण्यात येत असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.
खडकवासला धारण (Pune Heavy Rain Update) साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धारण भरू लागली आहेत. धारण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्गकरण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहे. धरणात 65 टक्के पर्यंत पाणी सोडावे असे अजित पवारांनी सांगितले. तसेच पाणी सोडताना नागरिकांना सूचित करावं असे देखील अजित पवारांनी असे देखील अजित पवारांनी सांगितले आहे. खडकवासला धरण हे 65 टक्के पर्यंत खाली केलं तर रात्री पाऊस पडला तर धरणात पाणी राहील असे अजित पवारांनी सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक झाली तेव्हा राज ठाकरे यांनी महत्वाच्या 3 विषयांवर संवाद साधत प्रश्न मांडले. त्यामध्ये, मुळा-मुठा कोरीडोअर वरील बेकायदा बाबी बाजूला सारणे, दूसरा विषय होता तो रीडेव्हलपमेंटचा, या रीडेव्हलपमेंटसाठी म्हणजे जागा वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. एफएसआय वाढला तर रीडेव्हलपमेंट होऊ शकेल. ज्याप्रकारची पाऊले पुढील काही दिवसांत उचलली जटिल. जवळपास 3 लाख नागरिक येथे राहतात. या नागरिकांसाठी रीडेव्हलपमेंट होईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच तिसरा विषय हा पुण्यातील पुरस्थितिमध्ये जी वाहने पाण्यात गेली, त्यांना कंपन्या इन्शुरन्स देत नाहीत. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी कालच पुणे महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना इन्शुरन्स कंपनीसोबत बोलून हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली.
नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर करा, निवासस्थाने, खाण्याची सोय करा
पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पाश्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पुररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरिस ब्रिज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, रावेत, बालेवडी, गावठाण, ज्यूपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादि सखल भागातील लोकांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रामध्ये त्यांच्यासाठी सर्व सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सर्व प्रशासनाने समन्वयाने काम करावे हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सुचनांची दखल घेऊन त्याची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी. सर्वानी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
Pune Heavy Rain Update: कोणत्या भागाला धोका?
पुण्यात सुरू असलेल्या (Pune Heavy Rain Update) पावसांच्या पाश्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पुणेकरांना महत्वाचं आवाहन केलं आहे. विशेषत: सिंहगड रोड, संगमवाडी, दांडेकर पूल, विश्रांतवाडी, बालेवडी, बाणेर या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे. या विसर्गाची नोटिस सर्व नागरिकांनी गांभीर्यानं घ्यावी. जेणेकरून कोणतीही जिवतहानी तसंच वित्तहानी होणार नाही, असं आवाहन भोसले यांनी केलं. पुणेकरांनी महापालिकेच्या (020) 25501269, (020) 25506800 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन भोसले यांनी केलं.
Pune Heavy Rain Update: संरक्षक भिंती अन् पीडित कुटुंबियांस मदत
मुळा-मुठा कोरीडोअर प्रकल्पासाठी पुण्यातील नागरिकांची एक समिति करून महापालिकेशी बोळूनच पुढील काय ते होईल, विशेष म्हणजे येथील संरक्षण भिंती बांधण्यासाठी कालच ऑर्डरही देण्यात आली आहे. तसेच, शॉक लागून जी दोन मुळे ठार झाली, त्याच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 10-10 लाख रुपयांचा चेक मुख्यमंत्र्यांनी कालच पाठवला आहे. तो आज जिल्हाधिकाऱ्यां मार्फत त्यांना दिल जाईल. तर त्याच्या भावाला सरकारी खात्यात नोकरी देण्यात येईल, असेही राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.
Pune Heavy Rain Update: काय म्हणाले मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात आज जोरात पाऊस होत असून या पाश्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास NDRF, SDRF आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, इत्यादि सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनी द्वारे दिल्या आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!