Pune Flights Bomb Threat Case
Pune Flights Bomb Threat Case: देशभरात विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवांना पेव फुटला आहे. अशातच आता पुण्यात शा वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठवल्याचं धक्कादायक ट्विट केलं आहे. विस्तारा एअरलाईन्सच्या 6 वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठवण्यात येणार असल्याचं ट्विट करत दहशत पासरवण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील विमाननगर पोलिस स्टेशनमध्ये ट्विट करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या शनिवार 19 ऑक्टोबरला 30 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे विमानांचे इमार्जन्सी लॅंडींग करण्यात आले. त्यानंतर पूर्ण तपासणीनंतर विमाने रवाना करण्यात आली. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे तासनतास हाल झाले. हा खळबळजनक प्रकाश ताजा असताना पुण्यातून पण एक बातमी समोर आली आहे.
पुण्यात 6 वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठेवणार असल्याचं धक्कादायक ट्विट (Pune Flights Bomb Threat Case) समोर आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील विमान नगर पोलिस स्टेशनमध्ये ट्विट करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या ट्विटमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कीझोफेर्निया या ट्विटर अकाऊंट वरून अज्ञात इसमाने ट्विट केलं आहे. 6 वेगवेगळ्या विमानांमध्ये 12 जण बॉम्ब ठेवणार असल्याची ट्विट मधून माहिती देण्यात आली होती. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीने 6 विमानाचे नंबरही ट्विटमध्ये टाकले होते आणि बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याचे ट्विट केलेले होते. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स बॉम्बने उडवून देण्याच्या खोट्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. नागरी वाहतूकमंत्री राम मोहन नायडू कींजरापू यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले या खोट्या धमक्यांना आळा घालण्यासाठी सरकार कायदेशीर उपायांवर विचार करत आहे. प्रशासन गुन्हेगारांना नो फ्लाय लिस्टमध्ये ठेवण्याचा विचार करत आहे. गेल्या आठवड्यात सुमारे 100 विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये मध्यमांशी संवाद साधताना नायडू यांनी संभाव्य कायदेशीर कारवाईसाठी दोन प्रमुख बाबी सांगितल्या. ते म्हणाले आम्ही या संदर्भात करण्याजोगे दोन मार्ग शोधले आहेत. सर्वात अगोदर आम्ही विमान सुरक्षा नियमांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहोत. अशा धमक्यांना जबाबदार असलेल्या व्यक्तीचा समावेश नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव आहे.
आम्ही 1982 च्या नागरी विमान वाहतूक कायद्यात सुरक्षेविरुद्ध बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासंबंधी सुधारणांचा मार्गदेखील तपासत आहोत. या आठवड्याच्या सुरुवातीला देशातल्या विविध एयरलाइन कंपन्यांना धमक्याचे फोन येण्यास सुरुवात झाली होती. भारतीय एयरलाईन्स कंपन्यांच्या तीन आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला होता. पण तपासणी अंती निदर्शनास आलं, की या सर्व धमक्या खोट्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अनेक धमक्या अथवा अफवा समोर आल्या आहेत. यामुळे विमान कंपन्या व त्या त्या विमानतळ प्रशासनाची पाचावर धारण बसते. त्यांना पुन्हा तपास करावा लागतो.
बॉम्ब शोधणाऱ्या पथकाला पाचारण करावे लागते, विमानतळावरील व्यवस्थापनात बदल करावा लागतो. यात वेळ आणि पैसे खर्च होत आहेत. मात्र यातून काहीच हाती लागत नाही. या धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Pune Flights Bomb Threat Case: प्रवासी विमानांना बॉम्बच्या धमक्यांची मालिका सुरूच
एकंदरीत देशातील प्रवासी विमानांना बॉम्बच्या धमक्यांची मालिका लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण सुरक्षा ब्यूरोकडून या संदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे. सीआयएसएफ, एनआयए आणि आयबीलाही अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी, केंद्रीय कार्मीक मंत्रालयाने डीजीसीए प्रमुख विक्रम देव दत्त यांना पदावरून हटवून कोळसा मंत्रालयात सचिव केले. हा बदल धोक्याच्या बाबीशी जोडला जात आहे. त्याच वेळी, एकाच वेळी 30 धमक्या मिळाल्यानंतर विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरी उड्डाण सुरक्षा ब्यूरो (BCAS) च्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली. ब्यूरोचे महासंचालक झुल्फीकार हसन यांनी आश्वासन दिले की भारतीय आकाश पूर्णपणे सुरक्षित आहे.
ट्विट करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल
सीझोफेनिया 111 (schizophrenia111 @schizophreniqqq) असे ट्विटर अकाऊंट वापर कर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सिंगापूर ते पुणे विमान प्रवासादरम्यान ट्विटरद्वारे रविवारी दुपारी दीड वाजता घडला. मेसेजमध्ये 12 जण विमानात असून त्यापैकी 6 जण तुमच्या विमानात बॉम्बसह आहेत. फ्लाइट यू के 24, फ्लाइट यू के 106, फ्लाइट यू के 146 फ्लाइट यू के 116, फ्लाइट यू के 110, फ्लाइट यू के 107 (प्रत्येकी 2 जण) सर्व जण संपणार आहेत. असा मेसेज मिळाला आहे. तर एयरपोर्ट परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये खोटी माहिती आणि अफवा पसरवून भीतीदायक वातावरण निर्माण केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
Pune Flights Bomb Threat Case: 12 जण बॉम्ब ठेवणार?
मिळालेल्या माहितीनुसार, स्कीझोफेर्निया या ट्विटर अकाऊंटवरुण अज्ञात इसमाने हे ट्विट केले होते. यात 6 वेगवेगळ्या विमानमध्ये 12 जण बॉम्ब ठेवणार असल्याची ट्विटमधून माहिती देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा दाखल केला असून ट्विटद्वारे दहशत पसरवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा शोध सध्या सुरू करण्यात आला आहे. यातील आरोपीने 6 विमानांचे नंबरही ट्विटमध्ये टाकले होते. आणि बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याचे ट्विट मध्ये उल्लेख केला आहे.
Pune Flights Bomb Threat Case: विमान उडविण्याच्या 20 धमक्या
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अनेक धमक्या अथवा अफवा समोर आल्या आहेत. यामुळे विमान कंपन्या व त्या त्या विमानतळ प्रशासनाची पाचावर धारण बसते. त्यांना पुन्हा तपास करावा लागतो. बॉम्ब शोधणाऱ्या पथकाला पाचारण करावे लागते, विमानतळावरील व्यवस्थापनात बदल करावा लागतो. यात वेळ आणि पैसे खर्च होत आहेत. मात्र यातून काहीच हाती लागत नाही. या धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत बॉम्बने विमान उडवून देण्याच्या जवळपास 20 हून अधिक धमक्या आल्या आहेत, तर 12 विमाने रद्द झाली आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!