पुणे ड्रग्सप्रकरणात मोठी कारवाई, FC रोडवरील बार सील; 8 जणांविरोधात कारवाई, 2 पोलिसांचं निलंबन

Pune Drugs News

Pune Drugs News: शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचं रॅकेट थांबता थांबत नाहीये. ललित पाटील प्रकरणात ड्रग्स केस संदर्भात मोठ्या कारवाया होऊन सुद्धा पुण्यात ड्रग्ज सहजपणे उपलब्ध होत आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली फर्ग्युसन रोडवरच्या L3 (liquor, leisure, lounge) या पबमधील तरुण मुलं स्वच्छता गृहात ड्रग्जचं सेवन करताना आणि लेट नाईट पार्टी करताना दिसून आले.

या प्रकरणात आता पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पुणे पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. काल तात्काळ प्राथमिक कारवाई करताना पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी दोन अमलदारांच निलंबन केल होत. एकुण चार पोलिसांच निलंबन एका व्हिडिओमुले झालं आहे.

Pune Drugs News
Pune Drugs News

शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे गुन्हा निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलिस निरीक्ष दिनेश पाटील यंच निलंबन करण्यात आल आहे. सोबत पब चालक मालक, संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे, उत्कर्ष कालिदास देशमाने, योगेन्द्र गिरासे, देवी माहेश्वरी, अक्षय दत्तात्रय कामठे, दिनेश मानकर, मोहन राजू गायवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी पबमधील डीव्हीआर, साऊंड, लाइट्स, टीव्ही पबमधील सगळं साहित्य ताब्यात घेण्यात आल आहे. तर सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत पबमधील प्रकाराची चौकशी सुरू आहे, आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पब सील केल आहे.

Pune Drugs News: बार सील करण्यात आला, अनेकांना घेतले ताब्यात

पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी या प्रकरणाचा प्रसार माध्यमांना माहिती दिली, ते म्हणाले कि, शनिवारी रात्री पुण्यातील FC रोडवर असलेल्या L3 नावाचे एक बार आहे. त्यांना दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळेपर्यंत तो सुरू ठेवण्यात आला होता. 2 मालकांनी हा बार पुढे 3 जणांना चालवायला दिला होता. एका इव्हेंट मॅनेजरने 40 ते 50 लोकांना तिथे पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांना विचारली होती रात्री 1.30 नंतर बरचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आणि दुसऱ्या गेटने तिथे आत जाण्याची परवानगी दिली. यातील सर्व जणांना ताब्यात घेतले आहे. L3 बार सील करण्यात आला आहे.

Pune Drugs News

जॉ व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पदार्थ कोणता आहे. हे अमली पदार्थ विरोधी पाठक करत आहेत. 188 कलम महाराष्ट्र दारूबंदी कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित केले आहे.

Pune Drugs News: राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया

मुरलीधर मोहळ-

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहळ यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू कसे राहिले हा मोठा प्रश्न आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी त्यांची मागणी आहे. ‘पुण्याच्या प्रतिमेला धक्का लावणाऱ्या घटनांना सहन केले जाणार नाही’, असे मोहळ म्हणाले.

सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर-

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांवर आणि प्रशासनावर टीका करताना, ‘पुण्यात ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला जबाबदार कोण?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. या दोघांनी राज्य उत्पादन मंत्री शंभुराजे देसाई यांच्यावर जोरदार टीका करत गंभीर आरोप केला आहे. राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात. ते मंत्र्यांना पोहोचतात. तो हप्ता शंभुराजे देसाई यांना जातो, असा मोठा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. तसेच पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर आम्ही तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडत आहोत.

जेव्हा कोट्यावधीचे ड्रग्जचे साठे सापडले होते. तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. शंभुराजे देसाई यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. शंभुराजे देसाई यांच्यासाठी काम करणारे उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचेही निलंबन झाले पाहिजे. हे झाल्याशिवाय पुणे सुधारणार नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, जिथे ड्रग्ज सापडले तिथे कठोर कारवाई करण्यात येईल. आम्ही महाराष्ट्राला ड्रग्ज मुक्त करू, असे ते म्हणाले. फॉरेन्सिक पथक देखील ड्रग्ज पार्टी झालेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहे.

शंभुराजे देसाईचे प्रत्युत्तर

गेल्या महिन्याभरात आपण पुण्यातील 49 हॉटेल आणि बारवर कारवाई केली आहे. पुण्यात सरप्राइज चेकिंग सुरू करण्यात आले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार आहे. तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्याचीही चौकशी करणार आहोत. जो अधिकारी यात दोषी आढळेल, त्यावर कारवाई केली जाईल, असे शंभुराजे देसाई यांनी प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले पोलिस उपायुक्त संदीप गिल?

यावर पोलिस उपायुक्त संदीप गिल म्हणाले की, पुणे ड्रग्ज (Pune Drugs News) प्रकरणात आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 8 जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाची योग्य चौकशी होणार आहे. पार्टी करणाऱ्या ग्रुपने जेवण आणि दारुवर 80 ते 85 हजार खर्च केले आहेत. 40 ते 50 जणांची तपासणी होणार आहे. सीसीटीव्ही पाहून तपासणी केली जाणार आहे. अनेकदा सूचना देऊन देखील अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्यात दिरगाई दाखवली म्हणून दोन अधिकारी आणि दोन अंमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती संदीप गिल यांनी दिली आहे.

पोलिसांची त्वरित कारवाई-

Pune Drugs News या प्रकरणानंतर पुणे पोलिसांचे पथक तात्काळ हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, हॉटेल सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गस्तीवरील पोलिसांवर देखील कारवाई केली जाईल.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील FC रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, Pune Drugs News ते ड्रग्ज व अमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये चक्क हॉटेलमधील वॉश रूममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्ज असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील ललित पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शंत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!