Pune Drugs Case
Pune Drugs Case: एकेकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज घेणार पुणे शी होत आहे. पुण्यातील FC रोडवरील L3 लाउज मधील ज्या पार्टीत ड्रग्ज घेतल्याचा आरोप झाले त्या पार्टीसाठी चाळीस ते पन्नास जणांचा ग्रुप हडपसरमधून आल्याचे समोर आले आहे हडपसरमधील कल्ट नावाच्या पबमध्ये त्यांनी रात्री साडेबारा वाजेपर्यंत पार्टी केली आणि पुढे पहाटेपर्यंत पार्टी करण्यासाठी ते FC रोडवरील L3 लाउजमध्ये पोहचले. त्यामुळे पोलिस त्या पन्नास आता त्या पन्नस जणाच्या ग्रुपचा शोध घेतायत. या प्रकरणात रविवारी दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचं निलंबन करण्यात आल्यानंतर सोमवारी आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. मात्र ड्रग्ज घेणारे ते दोन तरुण कोण आहेत आणि त्यांच्याकडे ड्रग्ज कुठून आले याच उत्तर मात्र अजून मिळू शकले नाही.
या पुण्यातल्या तरुणाईला झालंय काय असा प्रश्न आता वारंवार उपस्थित राहत आहे. पुण्यामध्ये काही महिन्यांपूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरण आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मेफीडरॉनचा पुण्यामध्ये सापडलेला साठा आणि त्याचा थेट कनेक्शन हे इंग्लंड पर्यंत होत. आता तर सर्रासपणे पब मध्येच ड्रग्ज मिळत आहे. त्याच्यामुळे पुण्याचा उडता पंजाब झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पुण्यातील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक असलेल्या FC रोडवरील या लिक्विड लेझर लाउज या पबमध्ये ड्रग्ज Pune Drugs Caseघेतलं जात असल्याच उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत या हॉटेलचा, मालक, मॅनेजर, कर्मचारी आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तीसह आठ जणांना अटक केलीय. रात्री एक वाजेपर्यंत पब सुरू ठेवण्यास परवानगी असताना पाठीमागच्या दाराने रात्री दीड वाजता पन्नास जणांना या पबमध्ये प्रवेश देण्यात आला. जिथे हा सर्व प्रकार घडला तिथली परिस्थिति ही अशी संशयास्पद आहे. पुणे L3 बार प्रकरणी आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पुण्यामध्ये दिवसेंदिवस पब संस्कृती फोफावत चललिय. ज्यामध्ये अल्पवयीन मुलामुलिंबरोबर, पुरुष, महिला आणि विदेशी लोकांचा देखील समावेश आहे. पोर्शे कार अपघातानंतर पुणे प्रशासनाने पुण्यातील 68 बारवर कारवाई केली होती. या प्रकरणात बार मालक यांना समज देण्यात आली होती. त्यानंतरही या सर्व नियमांना धाब्यावर बसून शनिवारी रात्री पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्जचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओनं पुन्हा एकदा पब मालक चालक आणि ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आला.
Pune Drugs Case: पुण्यातील तरुणाईला पडलेला ड्रग्जचा विळखा समोर
हा व्हिडिओ समोर आणणाऱ्या पत्रकारांनी सांगितले की ड्रग्ज सेवनाचे हे प्रकार या भागात नेहमीच घडत असल्याचा दावा केलाय. FC रोडवरील या ड्रग्ज प्रकरणानं लागलीच राजकीय वळण घेतलं असून विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलाय. तर सत्ताधाऱ्यांनी पुण्याची बदनामी सहन करणार नसून यामध्ये कोणालाही सोडणार नसल्याचं म्हटलंय. ललित पाटील प्रकरणामुळे पुण्यातील तरुणाईला पडलेला ड्रग्जचा विळखा समोर आला होता. तर कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघातानंतर पब आणि बरचे दुष्परिणाम समोर आले होते.
दोन्हीवेळी कारवाई केल्याच दिसून आलं. मात्र FC रोडवरील या प्रकरणामुळे या कारवाई कीती तकलादू होत्या हे सिद्ध झालंय. ड्रग्जचा विळखा सोडवणं, पब संस्कृतीतून तरुणाईला वाचवणं हे पोलिसांच काम तर आहेत पण त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी या मुलांच्या पालकांनी आणि शिक्षकांची आहे. त्यामुळं हा फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नन् मानता सामाजिक प्रश्न आहे. असं मानून पावलं उचलली गेली तरच आपण या समस्येच्या मुळापर्यंत पोहचू शकणार आहे.
Pune Drugs Case:कशी बदलली संस्कृती?
गेल्या दहा वर्षात पुण्यातील विकासात विकासाच्या कामाबरोबरच पुण्यातील जीवनशैली मध्ये मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतोय. पुण्याची ओळख ही सांस्कृतिक राजधानी बरोबरच आता आयटी हब म्हणून देखील करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळेच साहजिकच पुण्याची बदलती जीवन शैली मध्ये बदल दिसायला लागलेले आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिस रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या अनेक वर्षाच्या पुण्यात राहणाऱ्या श्रीमंत लोकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, या आकडेवारीनुसार तीनपैकी एक कोट्यधीश आहे. त्याच वेळी, गुन्हेगारी नोंदी असलेल्या लोकांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे.
2009 मध्ये केवळ 16 टक्के पुण्यातील लॉक करोडपती होते. 2014 चा सर्व्हेनुसार पुण्यातील 27 टक्के करोडपती आहेत कोट्यधीश उमेदवारांची संख्या गेल्या 15 वर्षात जवळपास दुप्पट झाली असून, आता तर ही संख्या 31 टक्के झाली आहे. ही सगळी आकडेवारी पाहता, 5 कोटी रुपये आणि त्याहून अधिक संपत्ती असलेले लॉक 2019 मधील 11 टक्के होती तर 2024 च्या सर्वेक्षणानुसार ती 12.4 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे साहजिकच इझी मनी आणि वेगवेगळे छंद जोपासण्यासाठी मुलांकडे मुबलक पैसा उपलब्ध आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणाला कुठेतरी पालकही जबाबदार असल्याच मानलं जात आहे.
Pune Drugs Case: पुण्यातील ‘एल थ्री’ चं प्रकरण काय?
Pune Drugs Case पुण्यातील FC रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, Pune Drugs News ते ड्रग्ज व अमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये चक्क हॉटेलमधील वॉश रूममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्ज असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील ललित पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामध्ये शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधील दोन पोलिसांच निलंबन करण्यात आला आहे.
परंतु काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी पब वर कारवाई करत पब बंद करण्याचे जे आदेश काढले होते आणि जे नियम काढले होते ते सर्व धाब्यावर बसून पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला.
पुणे ड्रग्जच्या विळख्यात?
पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली फर्ग्युसन रोडवरच्या L3 (liquor, leisure, lounge) या पबमधील तरुण मुलं स्वच्छता गृहात ड्रग्जचं Pune Drugs Case सेवन करताना आणि लेट नाईट पार्टी करताना दिसून आले. तो व्हिडिओ समज माध्यमांवर झळकला. आता आणखी एक व्हिडिओ समाज मध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुणे-नगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमध्ये असलेल्या पबमधील असल्याचा दावा करण्यात येत असून तो काही दिवसांपूर्वीचा आहे. व्हिडिओ मध्ये तरुणी वॉशरूम मध्ये ड्रग्जचे सेवन करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यांचा व्हिडिओ काढणारी महिला त्यांना ड्रग्ज कसे घ्यायचे, याचा फॉर्म्युला सांगितला आहे. एकंदरीत पुण्यातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे असे म्हणता येईल.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!