Pooja Khedkar
Pooja Khedkar: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तवणूक आणि अवाजवी मागण्यांमुळे चर्चा असलेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विविध सुरस कथा सातत्याने समोर येत आहेत. त्यांच्या मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झाला असून त्याखाली पूजा खेडकर यांना प्रचंड ट्रोल केल जातंय. आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बदली झालेल्या ठिकाणी त्या रुजू होणार असल्याच त्यांनी आज सांगितल. ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरची मनमानी आणि मिजासगिरीच्या आरोपानंतर पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली. 32 वर्षीय पूजा खेडकर महाराष्ट्र केडरची शरीरीक अपंगत्व श्रेणी आणि इतर मागासवर्गीय (OBC) कोट्यातिल लाभांचा गैरवापर केला आहे.
दरम्यान, काल (10 जुलै) पंतप्रधान कार्यालयाने (पीमओ) पुणे जिल्हाधिकाऱ्याकडून या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. मसुरिस्थित लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LSBNAA) जे नागरी सेवा उमेदवारांना प्रशिक्षण देते, खेडेकर यांच्या विविध आरोपांवरून राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. अकादमीचा अंतिम अहवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवला जाईल. वादग्रस्त परिवीक्षाधीन IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाशिम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नुकतीच बदली करण्यात आली आहे.
पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी पुण्यात स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली होती. याशिवाय त्यांनी ऑडि कारवर लाल रंगाचा दिवा लावल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. पुण्यात त्यांनी स्वतंत्र केबिनची मागणी केली होती, मात्र वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना स्वतंत्र केबिन मिळण्याची शक्यता कमीच आहे.
LSBNAA चे उपसंचालक शैलेश नवल यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मान्यतेनंतर राज्याच्या सांनी प्रशासनाला अहवाल पाठवण्यास सांगितले आहे.
मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर Pooja Khedkar त्यांच्या परवानगीशिवाय सौनिकच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. सौनिक यांनी एका हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार टि वेल न् मागता आज आली. त्यानंतर मी तिला जाण्यास सांगितले आणि सामान्य प्रशासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना भेटायला सांगितले करण माझे कामाचे वेळापत्रक व्यग्र आहे. दरम्यान पूजाची बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पूजा आज वाशिममध्ये कर्तव्यावर रुजू झाली आहे. एखाद्या उमेदवारास संबंधित रॅकनुसार होम केडर चे वाटप केले जाते नसतानाही त्यांना महाराष्ट होम कॅडर मिळून थेट होम डिस्ट्रिक्टमध्ये कक्ष प्रकारे प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक दिली गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून त्याबाबत चे स्पष्टीकरण संबंधित यंत्रणांनी देणे आवश्यक झाले आहे.
OBC आणि PWBD कार्ड खेळले
कार्मिक आणि प्रशिक्षित विभागाने जारी केलेल्या सेवा वाटप यादीनुसार, पूजणे OBC आणि PWBD (बेंचमार्क अपंग व्यक्ति) श्रेणी अंतर्गत अखिल भारतीय रॅक. 821 सह IAS श्रेणी घेतली आहे. विशेष म्हणजे, पूजणे ओबीसी प्रवर्गांतर्गत अर्ज केला होता. ज्यात क्रिमी लेयर प्रमानपत्रासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ₹ 8 लाख आहे.
नियुक्तिवर प्रश्नचिन्ह का?
- नॉन क्रिमीलेयर साठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे. मात्र, खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता 40 कोटींहून अधिक असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे खेडकर यांच्या नॉन क्रिमीलेयरसाठीक च्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह आहे.
- पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) झाली आहे. नॉन क्रिमीलेयर आणि बहूविकलांगता (मल्टीपल डीसॅबिलिटी) या दोन प्रकारातून त्यांची निवड झाल्याचे शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे.
- प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याचा गृहजिल्हा नोकरीच्या सर्वात शेवटी मिळतो, असे असूनही खेडकर याना सुरवातीलाच पुणे जिल्हा कसा मिळाला, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
- खेडकर यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणात यूपीएससी विरोधात याचिका दाखल केली होती, त्यावर यूपीएससी ने सांगूनही त्या सहा वेळ वैद्यकीय तपासणी साठी गैरहजर राहिल्या तरीही त्यांना प्रशासकीय सेवेत कसे घेतले, हा प्रश्न आहे.
अनेकदा मिळालेले यासह डोक्यात जाते. आपण अधिकाराच्या नाही, तर जबाबदारीच्या खुर्चीवर बसत आहोत आणि ही खुर्ची जनतेच्या सेवेसाठी आहे. याचे भान कोणत्याही अधिकाऱ्याने ठेवणे गरजेचे आहे. या प्रकरणाची तर केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडून सखोल चौकशी झाली पाहिजे अविनाश धर्माधिकारी माजी सनदी अधिकारी यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने मागितला अहवाल
पूजा खेडकर Pooja Khedkar यांच्यासंदर्भात समोर आलेल्या गोष्टी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील त्याचं गैरवर्तन या पाश्वभूमीवर त्याची मोठी चर्चा पहायला मिळत आहे. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं असून बुधवारी थेट पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला आहे. हिंदुस्थान टाइम्सनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यावर दिल्लीतून ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Pooja Khedkar: तिच्या वडिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकावले
पूजाचे वडील दिलीप खेडकर महाराष्ट सरकारचे निवृत्त वरिष्ट अधिकारी आहेत. त्यांनी वार्षिक उत्पन्न ₹ 43 लाख घोषित केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा (LS) निवडणुकीसाठी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात अंदाजे ₹ 40 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केलं आहे. दिलीप खेडेकर यांनी अहमदनगर मधून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती.
पूजाच्या एका मॉक इंटरव्ह्यूमध्ये ज्याचा व्हिडिओ एका खाजगी कोचिंग क्लास अकादमीने सोशल मिडियावर जारी केला होता. त्यामध्ये पूजाला उत्पन्नाबद्दल विचारले असता, तिने दावा केला की तिचे पालक वेगळे झाले आहेत. आणि टि त्याच्या संपर्कात नाही. मात्र पुण्यात ड्यूटी रुजू झाल्यानंतर पूजाच्या वडिलांनी तिला सोबत घेऊन एका वरिष्ट अधिकाऱ्याला धमकावले होते. UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, पूजाला नवी दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने पहिल्यांदा 22 एप्रिल 2022 रोजी तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यासाठी आणि तिने सादर केलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. एम्सने तिला सहा वेळा कॉल करूनही टि आली नाही. कोविड-19 किंवा एमआरआय असमर्थता यांसारखी विविध कारणं गेलीच नाही.
पूजाची छायाचित्रे व्हायरल झाल्यामुळे सडकून टीका
खासगी ऑडिवर व्हीआयपी क्रमांकासह तसेच लाल दिवा असल्याने पुजारी छायाचित्रे व्हायरल झाल्यामुळे सडकून टीका होत आहे. सिस्टीमचा गैरवापर केल्याचा आरोप सोशल मिडियातून होत आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!