PM Narendra Modi
PM Narendra Modi: गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यासह देशात महिला अत्याचारा वरील गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. काही ठिकाणी गुन्हा करणाऱ्याला शिक्षा झाली आहे. तर महिलांच्या सुरक्षितेसाठी नवीन कायदे, दोषींना योग्य ती शिक्षा जन्मठेप किंवा फाशी देण्यात यावी. महिलांवर अत्याचार अक्षम्य आहे. महाराष्ट्रातील बदलापूरात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र केले. आता महिला अत्याचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाचे भाष्य केले आहे. महिलांवर होणारे अत्याचार अक्षम्य अपराध आहे. तो करणारा कोणीही असला तरी सुटता कामा नये. असे त्यांनी म्हंटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi 3.0) हे लखपती दीदी या कार्यक्रमासाठी जळगावात आले होते. त्यावेळेस त्यांनी लखपती दीदी या योजनेबद्दल आणि बाकी येणाऱ्या योजनाबद्दल बोलले. पण या कार्यक्रमात ते महाराष्ट्रात होत असलेल्या महिला अत्याचारावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. भाषणाच्या शेवटी मात्र त्यांनी महिला अत्याचारवर भाष्य केले. महिलांवर अत्याचार हे अक्षम्य पाप आहे. जो कोणी ही कृती करेल त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. शिवाय त्याला वाचवणाऱ्यालाही शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट मत केले. सरकार येईल जाईल पण त्या काळात महिलांची रक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपले परखड मत मांडले. त्यांनी देशातल्या प्रत्येक सरकारला त्यांनी आवाहन केले आहे की, लागेल ती मदत केंद्र सरकार करेल असे सांगितले. शिवाय महिलांवर होणारे अत्याचार हे पाप आहे. असे झाले नाही पाहिजे, यात कोणी दोषी असेल तर तो कोणत्याही स्थितीत वाचला नाही पाहिजे. पण त्या दोषीला वाचवणारा तितकाच दोषी असतो. मग ते रुग्णालय असो शाळा असो पोलिस असो ज्या स्तरावर चूक झाली असेल त्या सर्वांचा हिशोभ झाला पाहिजे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज जळगावात पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्यांवर भाषण केले आहे. ते म्हणाले की, आज तिन्ही सैन्य दलात महिला अधिकारी आहेत. फायटर, पायलट महिला बनत आहेत. नरिशक्ती नवा कायदा बनवला. राजकारणात महिलांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले. सुरक्षेसाठी महत्व दिले.
प्रत्येकाला स्पष्ट मेसेज गेला पाहिजे. चुकीला माफी नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. कोणाचेही सरकार असेल तरी महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपल्या सर्वाची आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी कायदेही कडक करत आहोत असे मोदी यावेळी म्हणाले. पूर्वी पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही घेतली जात नव्हती. घेतली तर कोर्टातही वेल लावला जात होता. त्यातल्या अडचणी मोदी सरकारने दूर केल्या आहेत असे ते म्हणाले. महिला आणि मुलींना न्याय देणारे कायदे तयार करत आहोत. जर कोणाला पोलिस स्टेशनमध्ये न् जाता तक्रार दाखल करायची आहे तर ई एफआयआर करू शकतात. त्यात कोणीही छेडछाड करणार नाही. असेही मोदी यावेळी म्हणाले. काही घटनांमध्ये आरोपी हे अल्पवयीन असतात त्यांना फाशी आणि जन्मठेप सारखी शिक्षा व्हावी यासाठी कायदा करणार असल्याचे मोदी म्हणाले.
PM Narendra Modi: आत्याचार रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी-पंतप्रधान नरेंद्र मोदी
लग्नाचे वचन दिले जातात. त्यानंतर फसवणूक केली जाते. अशा पद्धतीने खोट सांगून फसवणूक करणाऱ्यांनाही कठोर शिक्षेची तरतूद केली जाईल असे ते म्हणाले. महिलां वरील अत्याचार रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व राज्य सरकार बरोबर केंद्र सरकार सहकार्य करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. हे पाप आपल्या सर्वांना मिटवायचे आहे. महिलांसाठी मोदी सरकार मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचे यावेळी मोदी म्हणाले. त्यांना सक्षम करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील महायुती सरकारही काम करत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी नव नवीन योजना आणल्या आहेत, असेही यावेळी मोदी म्हणाले.
PM Narendra Modi: महायुती म्हणजे भवितव्याची गॅरंटी
भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले. महायुती म्हणजे तुमच्या भवितव्याची गॅरंटी असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विकसित भारताचा चमकता तारा आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. जगात महाराष्ट्राचे नाव आहे. जगभरातील गुंतवणूकदार हे महाराष्ट्राचे गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेट. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती सरकारची गरज आहे. त्यामुळे मला विश्वास आहे राज्यात स्थिरता आणि समृद्धी साठी तुम्ही सर्वे महायुतीला साथ द्याल असे मोदी यावेळी म्हणाले.
महिलांच्या समस्यांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार सोबत
महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका. त्याला कुठल्याही प्रकारे मदत करणारे वाचता काम नये, पोलिस आणि कुठल्याही स्तरावर कारवाई झाली पाहिजे. सरकार येतील अन् जातील, पण नारी शक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांच्या रक्षणासाठी कायदे कठोर केले जात आहे. एफआयआर होत नाही, वेळ लागतो अशा अडचणी येत होत्या. मात्र आता अनेक अडचणी आम्ही न्याय संहितामधून दूर केल्या आहेत. ई- एफआयआर सुरू केल्या आहे. याने गडबड होणार नाही, त्याबाबत कायदा केला आहे. महिलांच्या समस्यांसाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या सोबत आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
PM Narendra Modi: लखपती दीदी योजनेचा उद्देश काय?
केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेट. गेल्या काही वर्षापासून महिला सशक्ती करणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!