प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या सीजनसाठी कोणत्या खेळाडूंवर कोट्यवधींची बोली, कोण ठरला महागडा खेळाडू

PKL Auction 2024

PKL Auction 2024: प्रो कबड्डी लीग २०२४ च्या ११ व्या हंगामातील लिलावाच्या पहिल्या दिवशी एकुन आठ खेळाडूंवर कोटींची बोली लागली. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी मुंबईत होत असलेल्या या लिलावात सचिन तन्वर सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू ठरला. तमिळ थलाईवाजने स्टार रेडर सचिन तन्वरसाठी २ कोटी १५ लाखांची बोली लावली. सचिनची मूळ किंमत तीस लाख रुपये होती. सचिन तन्वर हा ‘करो या मरो’ या रेडचा स्पेशलिस्ट खेळाडू आहे. अनुभवी रेडर परदीप नरवाल दुसऱ्यांदा बेंगळुरू बुल्समध्ये सामील होणार असून, फ्रेंचायझीने त्याला ७० लाख रुपयांना खरेदी केले आहे. प्रो कबड्डी लीग २०२४ साठी खेळाडूंच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी सचिन तन्वर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला तर प्रो कबड्डीच्या इतिहासातील दूसरा महागडा खेळाडू ठरला.

इराणच्या मोहम्मदरेझा शादलोई चीयानेहलाही हरियाणा स्टीलकडून २.०७ कोटी रुपयांची मोठी बोली लावत त्याला करारबद्ध केले. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या पवन सेहरावतला तेलुगू टायटन्सने १.७२ कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले. भरत १.३० कोटी रुपयांची बोली लागली. मलिंदर सिंगला १.१५ कोटी, अजिंक्य पवारला १.११ कोटी आणि यू मुंबाने १.१५ कोटींची बोली लावत सुनील कुमारला संघात घेतले. PKL Season ११ च्या लिलावात ५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये एक संघ कमीत कमी २ तर जास्तीत जास्त ४ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतात.

PKL Auction 2024
PKL Auction 2024

गुजरात जायंट्सनेही गुमान सिंगला १.९७ कोटी रुपयांना करारबद्ध केले. परंतु पुढील हंगामसाठी त्याचा संघ समतोल राखण्यासाठी त्यांना लिलावाच्या दुसऱ्या दिवशी मोठा खर्च करावा लागणार आहे. लिलावानंतर सचिन तन्वरने आनंद व्यक्त केला आणि तमिळ थलायवास कडून एवढी मोठी बोली मिळवल्याने आश्चर्य व्यक्त केले. सचिन तन्वर म्हणाला की मला वाटले होते की माता १.७० – १.८० कोटीची बोली लागेल. लिलावापूर्वी मी नर्व्ह्स होतो. आणि ही रात्र माझ्यासाठी नेहमीच संस्मरणीय असेल. लिलावात आधी लाखात बोली लागायची. आता कोटींच्या बोली लागतात ही खेळ आणि तरुणांसाठी मोठी गोष्ट आहे. कबड्डीने ही मोठी पातळी गाठली आहे.

लिलावातील विकल्या गेलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी आणि त्यांची लिलाव किंमत आहे

PKL सीझन ११ (PKL Auction 2024) च्या लिलावाच्या शेवटी, प्रत्येक संघाने निवडलेल्या खेळाडूंची आणि त्यांनी आकर्षित केलेल्या बोलीची संपूर्ण यादी येथे आहे.

PKL Auction 2024: सचिन ठरला सर्वात महागडा खेळाडू

खेळाडू संघ लिलाव किंमत
सचिन तन्वर तमिळ थलाईवाज रु. २.१५ कोटी
मोहम्मदरेझा शादलोई चीयानेहहरियाणा स्टीलर्स रु. २.०७ कोटी
गुमान सिंह गुजरात जायंट्स रु. १.९७ कोटी
पवन सेहरावततेलुगू टायटन्सरु. १.७२ कोटी
भरतयुपी योद्धा रु. १.३० कोटी
मलिंदर सिंगलाबंगाल वॉरियर्स रु. १.१५ कोटी
अजिंक्य पवारबेंगळुरू बुल्स रु. १.११ कोटी
सुनील कुमारयू मुंबारु. १.0१५ कोटी
मनजीत यू मुंबारु. ८0 लाख
परदीप नरवाल बेंगळुरू बुल्सरु. ७० लाख
कृष्ण धूल तेलुगू टायटन्सरु. ७० लाख
शुभम शिंदे पाटणा पायरेटस रु. ७० लाख
सुरजीतसिंग जयपूर पिंक पँथर्स रु. ६० लाख
फाझेल अत्राचली बंगाल वॉरियर्स रु. ५० लाख
साहुल कुमार युपी योद्धा रु. ३० लाख
सिद्धार्थ देसाई दबंग दिल्ली रु. २६ लाख
आशीषदबंग दिल्ली रु. २३.५ लाख
मोहित पुणेरी पलटन रु. २० लाख
सोम्बीर गुजरात जायंट्स रु. २० लाख
मलिक तेलुगू टायटन्सरु. २० लाख
PKL Auction 2024

हरियानाचा सचिन तन्वर या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्यांच्यावर तमिळ थलाईवाजणे २.१५ कोटींची बोली लावली आणि आपल्या संघात स्थान दिलं. गेल्या हंगामात त्याने पटणा पायरेटस संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सचिन बेस प्राइज ३० लाख रुपये होते. सचिन ला आपल्या संघात घेण्यासाठी तेलुगू टायटन्स संघाने पहिलीच बोली ७० लाखांची लावली. त्यानंतर युपी आणि गुजरात यांच्यात सचिनला आपल्या सबघात घेण्यासाठी स्पर्धा संगली शेवटी बाजी मारली टी तमिळ थलाईवाजने. या संघाने २.१५ कोटी रक्कम मोजत सचिनला आपल्या ताफ्यात घेतलं.

PKL Auction 2024: सुनील कुमारने नवा विक्रम प्रस्थापित केला

यू मुंबाने १.०१५ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या सुनील कुमारने लीगमधील सर्वात महागडा भारतीय बचावपटू म्हणून इतिहास रचला. मोहम्मदरेझा शादलोई चीयानेह आणि गुमान सिंह यांसारख्या खेळाडूसह १ कोटी रुपयांच्या क्लबमध्ये त्याचा समावेश हा लिलावाच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक होता.

PKL Auction 2024

PKL Auction 2024: आंतरराष्ट्रीय स्टार चमकले

हरियाणा स्टीलर्सने इराणचा अष्टपैलू मोहम्मदरेझा शादलोई चीयानेहला रु. २.०७ कोटी मध्ये मिळवून दिले, ज्यामुळे टु सलग डॉन लीलावत रु. २ कोटींचा टप्पा ओलंडणारा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला. यामुळे लीगमधील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या वाढत्या मूल्यावर जोर देण्यात आला.

PKL Auction 2024: उल्लेखनीय खरेदी

बेंगळुरू बुल्सने PKL चे सर्वकालीन आघाडीचे रेडर परदीप नरवालला ७० लाख रुपयांमध्ये जोडले. दरम्यान, जयपूर पिंक पँथर्स दिग्गज बचावपटू सुरजीत सिंगला ६० लाख रुपयांना विकत घेतले आणि आगामी हंगामासाठी त्याचा बचाव मजबूत केला. बंगाल वॉरियर्सने PKL इतिहासातील सर्वात यशस्वी बचावपटू फाझेल अत्राचलीला केवळ ५० लाख रुपयांमध्ये मिळवून दिले, ज्यामुळे तीरात्रीची सर्वात किफायतशिर खरेदी ठरली.

PKL Auction 2024: अंतिम बोली जुळणी (FBM) कार्ड प्लेमध्ये

प्रमुख खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी तीन संघांनी त्याच्या फायनल बीड मॅच (FBM) कार्डचा वापर केला. बंगाल वॉरियर्सने मलिंदर सिंगला १.१५ कोटी रुपयांना, तेलुगू टायटन्सपवन सेहरावत १.७२५ कोटी रुपयांना आणि गुजरात जायंट्सने सोंबिरला २० लाख रुपयांना कायम ठेवले. रेडर सचिन तन्वरला २०२४ च्या PKL लिलावात सर्वात महागडा खेळाडू म्हणून निवडण्यात आले कारण त्याला सीझन ११ च्या लिलावात पहिल्या दिवशी तमिळ थलाईवाजने २.१५ कोटी कमावले. एकूणच भारतीय चढाईपटूसाठी हा चांगला दिवस होता. कारण गुमान सिंगनेही मोठी रक्कम तब्बल रु १.९७ कोटी खिशात टाकली आणि गुजरात जायंट्सला एक चांगला प्लेयर मिळाला.

इराणच्या मोहम्मदरेझा शादलोईवर लागली दुसरी सर्वात मोठी बोली

प्रो कबड्डी २०२४ स्पर्धेच्या लिलावाची सुरूवात मोहम्मदरेझा शादलोईच्या बोलीने झाली. ए कॅटेगरीत आलेल्या मोहम्मदरेझा शादलोईची बेस प्राइज ३० लाख रुपये होती. या अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात स्थान देण्यासाठी जवळपास सर्वच संघांनी जोर लावला. शेवटी हरियाणा स्टीलर्सने २.०७ कोटी मोजत त्याला आपल्या संघात स्थान दिले.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!