Pawan Kalyan
Pawan Kalyan: पवन कल्याण खऱ्या अर्थाने वादळासारखे आंध्र प्रदेशातील राजकारणात आले. या वादळाचा फटका वायएसआर कॉँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना बसला.
“ये पवन नहीं आंधी है..” नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत केलेलं हे वक्तव्य चर्चेत होते. या वक्तव्या पेक्षाही ही ज्या व्यक्तीसाठी हे वक्तव्य केल ती खास होती. तेलुगू सिनेसृष्टितिल मेगास्टार आणि आता आंध्र प्रदेशच्या राजकारणातील मोठ नाव पवन कल्याणसाठी नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केल आहे.

पवन कल्याण(Pawan Kalyan) खऱ्या अर्थाने वादळासारखेच आंध्रप्रदेशच्या राजकारणात आले आणि वायएसआर कॉँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची सत्ता उलथवली. चंद्राबाबू नायडू यांची टीडीपि, पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष आणि भाजपने एकत्रित निवडणूक येथे लढवली.
आंध्रप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत टीडीपिने 175 पैकी 135 जागा जिंकल्या. जनसेना पक्षाने 21 जागा जिंकल्या. तर सत्तेत असलेल्या वायएसआर कॉँग्रेसला केवळ 11 जागा जिंकता आल्या. तर टीडीपीने लोकसभेच्या 16 जागा जिंकल्या तर जनसेना पक्षाचे 2 जागा जिंकल्या.
जनसेना पक्षाचा 100 स्ट्राइक रेट
चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपिने जास्त जागा जिंकल्या असल्या तरी पवन कल्याण यांच्या जनसेंना पक्षाचा हा विजय खास होता. कारण त्याचा स्ट्राइक रेट 100 टक्के होता. म्हणजेच पवन कल्याण यांच्या पक्षाने जेवढ्या जागा लढल्या तेवढ्या जागा जिंकल्या. त्यामुळे आंध्र प्रदेशच नाही तर देशाच्या राजकारणातही पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाची दखल घेतली गेली.
पवन कल्याण यांचा राजकीय प्रवास
कल्याण यांनी 2008 मध्ये त्यांचे भाऊ चिरंजीवी याच्या प्रजा राज्यम पक्षाची युवा शाखा युवाराज्यमचे अध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. मात्र 2009 मध्ये एका रोड शो दरम्यान उष्माघाताचा त्रास झाल्याने ते आजारी पडले. त्यानंतर त्यांनी राजकारणातून ब्रेक घेतला.
राजकारणातील दीर्घ ब्रेकनंतर पवन कल्याण यांनी 14 मार्च 2014 रोजी आपल्या जनसेना पक्षाची स्थापना केली. 2014 मध्ये, ‘काँग्रेस हटवा, देश वाचवा’ या घोषणेसह आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आणि भाजप युतीसाठी त्यांनी प्रचार केला. त्यानंतर 2019 मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्यांनी डाव्या पक्षांसोबत युती केली आणि दोन जागांवर निवडणूक लढवली. यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी पवन कल्याण यांचं राजकारणात काही होणार नाही, अशी चर्चा सुरु झाली.
मात्र त्यानंतर पवन कल्याणने आपला गियर बदलून न थांबता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेत असलेल्या वायएसआर काँग्रेसला टार्गेट केलं. सरकारविरोधात अनेक आंदोलने केली. लोकांच्या प्रश्नासाठी ‘जनवाणी’ कार्यक्रम सुरु केला. चंद्राबाबू नायडू यांनीही वेळोवेळी पवन कल्याण यांची साथ दिली.
ती रात्र आणि वारं फिरलं
एन चंद्राबाबू नायडू यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात सप्टेंबर 2023 मध्ये अटक झाल्यानंतर आंध्र प्रदेशात पवन कल्याण जबरदस्त अॅक्टिव्ह झाले. चंद्राबाबू यांच्या अटकेविरोधात पवन कल्याण रस्त्यावर उतरले. मोठा गाड्यांचा ताफा घेऊन ते रात्रीच विजयवाडा येथे चंद्राबाबू नायडू यांना भेटण्यासाठी निघाले. मात्र वाटेतच त्यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी अडवले. यावेळी पवन कल्याण यांनी रस्त्यावर झोपून याचा निषेध देखील केला. त्या रात्रीनंतर पवन कल्याण सत्ताधारी वायएसआर काँग्रेसवर तुटून पडले.
वायएसआर काँग्रेसविरुद्धच्या लढतीत पवन कल्याण यांनी भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला. टीडीपी, जनसेना पक्ष आणि भाजपने एकत्र येण्याचं आवाहन पवन कल्याण यांनी केलं. पवन कल्याण यांच्याशी युती करण्यासाठी भाजपने फारशी उत्सुकता त्यावेळी दाखवली नव्हती. तरीही पवन कल्याण आपलं काम करत राहिले. अखेर मार्चमध्ये अधिकृत युतीनंतर पवन कल्याण यांनी पायाला भिंगरी लावून अख्खं राज्य पिंजून काढलं. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून आला.
पवन कल्याण (Pawan Kalyan) यांची पांढळा पायजमा कुर्त्याची स्टाईल, भाषणशैली, सभेला संबोधित करण्याची पद्धत, गर्दीत उत्साह भरण्याची ताकद त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. पवन कल्याण यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होणार नाही, असं विरोधक बोलत राहिले, मात्र पवन कल्याण यांनी विरोधकांना खोटं ठरवलं आणि जे करायचं ते करुन दाखवलं. पवन कल्याण यांच्या राजकीय कारकीर्दीची ही सुरुवातच म्हणावी लागेल. आंध्र प्रदेश आणि देशाच्या राजकारणात पवन कल्याण यांची जादू पुढे कशी चालणार हे येणारा काळच ठरवेल.
पवन कल्याण यांची संपत्ती
पवन कल्याण(Pawan Kalyan) यांची पत्नी आणि 4 मुलांकडे 163 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2019 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची एकूण संपत्ती 56 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. म्हणजेच पवन कल्याण यांच्या मालमत्तेत पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. पवन कल्याण यांच्याकडे आलिशान घर आणि आलिशान कार देखील आहेत.
आंध्रप्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागा आहेत. या निवडणुकीमध्ये एनडीएला २५ जागांपैकी तब्बल २१ जागा मिळाल्या आहेत. यापैकी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम या पक्षाला १६ तर भाजपाला ३ तर पवन कल्याणच्या जनसेना पक्षाला २ जागा मिळाल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वायएसआर काँग्रेसने तब्बल २२ जागा जिंकल्या होत्या. २०२४ च्या निवडणुकीत मात्र त्यांना फक्त ४ जागा जागांवर विजय मिळवता आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलायचं झालं तर, १७५ जागांपैकी तेलगू देशम या पक्षाने १३५ जागा, जनसेना पक्षाने २१ जागा तर भाजपने ८ जागांवर विजय प्राप्त केला आहे. या निकालामुळे आंध्रप्रदेश राज्यातही एनडीएचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्रीपदी चंद्राबाबू नायडू यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची ही चर्चा आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीला २३, जनसेना पक्षाला १ तर भाजपाला खातेही उघडता आले नव्हते, त्यामुळे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा आंध्रप्रदेशमध्ये एनडीए आघाडीला प्रचंड यश मिळालं आहे. याच श्रेय पवन कल्याणला दिलं जातं आहे. प्रचारात केलेली वातावरण निर्मिती आणि संघर्ष यामुळं हे यश मिळालं असल्याचं पवन म्हणाला आहे.
पवन कल्याणच्या पक्षाने आघाडीच्या जागावाटपात मिळालेल्या सर्वच्या सर्व जागांवर १०० टक्के स्ट्राईक रेटने विजय प्राप्त केला आहे. ज्यामध्ये २ लोकसभा आणि २१ विधानसभा जागांचा समावेश आहे. पवन कल्याण (Pawan Kalyan) पिथापूरम या विधानसभा मतदासंघातून स्वतः ७० हजार मताधिक्य घेऊन विजयी झाला आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!