भारताला मिळाले तिसरे पदक; मराठमोळ्या स्वप्नील ने सातासमुद्रापार यशाचा झेंडा रोवला

Paris Olympics 2024 Swapnil Kusale

Paris Olympics 2024 Swapnil Kusale: कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे या नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 50 मीटर रायफर थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळवणार स्वप्नील कुसळे पहिला खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या स्वप्नीलने यापूर्वी 2022 साली एशियन गेम्समध्ये स्वप्नीलनं मिळवलं होतं. या स्पर्धेनंतर बोलताना स्वप्नीलनं त्याच्या प्रशिक्षकांचे विशेष आभार मानले आहेत. कोणत्याही प्रकारच्या दडपणाचा विचार न् करता संयम ठेवत ही कामगिरी फत्ते केल्याचं स्वप्नील म्हणाला.

पण पदक मिळवण्या आधी त्याला करावा लागलेला संघर्ष, त्याची तपश्चर्या, त्याची मेहनत याकडे कानाडोळा करून चालणार नाही. महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातून आलेल्या या तरुणाने आपल्या कामगिरीने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. हे यश मिळवणाऱ्या स्वप्नीलची अनटोल्ड स्टोरी पण आपण जाणून घेऊया.

Paris Olympics 2024 Swapnil Kusale
Paris Olympics 2024 Swapnil Kusale

भारताचं पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024 Swapnil Kusale) मधील हे तिसरं कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून टु 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.

Paris Olympics 2024 Swapnil Kusale: प्रशिक्षक दीपाली या आईसारख्याच

कांस्यपदक जिंकल्यानंतर (Paris Olympics 2024 Swapnil Kusale) प्रतिक्रिया देताना स्वप्नील कुसाळेनं कामगिरी बाबत आनंद व्यक्त केला आहे. फायनलमध्ये शूट करताना दबाव हा असतोच पण मी श्वासावर नियंत्रण ठेवलं आणि संयम ठेवत शूट करत राहिलो, असं स्वप्नील म्हणाला. मागच्या कामगिरीचा फार विचार न करता शांत राहीन शूट करण्यावर लक्ष दिल्याचं त्यानं सांगितलं. सुरुवातीला मागे पडल्याचं दडपण होतं का असंही स्वप्नीलला विचारलं, त्यावर मी मागे आहे किंवा काय याबाबत फारसा विचार केला नाही. स्कोअर बोर्डवर फार लक्ष दिलंच नव्हतं असं तो म्हणाला.

मी जे ऐकल होतो त्याकड दुर्लक्ष करत होतो. फक्त जे मागून मला चीअर्स करत होते. त्यांचे आवाज एकुन चांगलं वाटत होतं. मला त्यांना आनंद द्यायचा होता. टेक मनात सुरू होतं, असंही स्वप्नील म्हणाला. स्वप्नीलला यापूर्वी स्पर्धांमध्ये अपयश हातील आलं होतं. पण भूतकाळात जे काही केलं त्यातून शिकून, चुका दुरुस्त करून या ठिकाणी कामगिरी केल्याचं त्यानं सांगितलं. महाराष्ट्राला आधीच्या नेमबाजांना पदक मिळालं नसलं तरी ते सगळे मोठे खेळाडू आहेत. मला पदक मिळालं असलं तरी त्यानं त्यांचा मोठेपणा कमी होत नाही, असंही स्वप्नील म्हणाला.

स्वप्नीलनं कोच दीपाली देशपांडे यांच्याबद्दल अगदी भरभरून बोलला. यापूर्वी मी पात्र झालो नव्हतो. त्यानंतर प्रशिक्षण दीपाली देशपांडे यांची मोठी मदत झाली. मला मानसिकदुष्ट्या मजबूत होण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. त्या माझ्या दुसऱ्या आईसारख्या आहेत. त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. असं स्वप्नीलनं म्हंटलं.

Paris Olympics 2024 Swapnil Kusale: स्वप्नीलचा खडतर प्रवास

स्वप्नील कुसाळे याचा जन्म कोल्हापूरच्या कांबळवाडीचा आहे. 6 ऑगस्ट 1995 साली त्याचा जन्म झाला. सर्व सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील हे शिक्षक आहेत. भाऊ ही शिक्षक आहे. तर आई कांबळवाडीच्या सरपंच आहेत. स्वप्नीलने 2008 मध्ये अभिनव बिंद्राला खेळताना पहिले. त्यानंतर त्याने निश्चय केला जी आपणही नेमबाज बनायचे. त्याने आपली इच्छा वडिलांना सांगितली. नेमबाजीतही त्याने 50 मीटर रायफर थ्री पोझिशन हा प्रकार निवडला. हा खेळ तसा खर्चीक होता. पण मुलासाठी वडिलांनी पाऊस उचललं 2009 नाशिकच्या क्रिडा प्रबोधिनीत दाखल झाला. तेव्हा पासून त्याच्या नेमबाजीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तिथेच स्वप्नील घडला.

Paris Olympics 2024 Swapnil Kusale: बुलेट खरेदीसाठी बँकेकडून कर्ज काढलं

नेमबाजीबाबत त्याने कधीही कंटाळा केल्याचं मला आठवंत नाही. तो याच्या सरावासाठी सतत तयार असतो. याशिवाय तो एकदम शांत आणि शिस्तबद्ध मुलगा आहे, असं त्याचे वडील सुरेश कुसाळे यांनी मिडिया शी बोलताना सांगितले. सुरेश यांचं कुटुंब मुळंच राधानगरीतल्या कांबळवाडी गावंच ते पेशानं शिक्षक आहेत तर स्वप्नीलची आई अनीता या कांबळवाडी गावच्या सरपंच सशर्त. मुळची खेळतली आवड पाहून त्यांनी स्वप्नीलला नाशिकच्या क्रिडा प्रबोधिनीत दाखल केलं होतं. तिथे स्वप्नीलनं नेमबाजीची निवड केली. 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वप्नील नेमबाजीचा सराव करतो आहे.

पण नेमबाजीचा खेळ खर्चीक असतो. रायफर, जॅकेट यांवर खर्च करावा लागतो. एका एका बुलेटसाठीही बरेच पैसे लागतात. एक कल असा होता की सरावासाठी बुलेट्स खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसायचे. पण वडिलांनी कर्ज काढलं आणि मुलाला खेळासाठी प्रोत्साहन दिलं. “सराव थांबू नये, यासाठी माझ्या वडिलांनी बँकेकडून कर्ज घेतलं आणि बुलेट्स खरेदीसाठी पैसे दिले. तेव्हा एक बुलेतची किंमत 120 रुपये असायची. त्यामुळे मी नेमबाजीचा सराव करताना प्रत्येक बुलेट काळजीपूर्वक वापरायचो. करण अधिकचा खर्च परवडणारा नव्हता. मी जेव्हा या खेळासाठी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे पुरेसे समानही नव्हतं, असं स्वप्नीलने माध्यमांना सांगितले होतं. आपल्या यशात आईवडिलांसोबत त्याच्या प्रशिक्षण दीपाली देशपांडे यांचं मोठं योगदान आहे, असं स्वप्नीलने सांगितलं.

दीपाली मॅडममुळे आयुष्यात आणि खेळात योग्य शिस्त लागली. त्यांनी आम्हाला या गोष्टी त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं. नेमबाजी शिवाज माणूस म्हणून कसं वागायला पाहिजे याची शिकवणही त्यांनी दिली, असंही स्वप्नीलने सांगितले.

Paris Olympics 2024 Swapnil Kusale: सरावात असताना सर्वकाही विसरतो

स्वप्नील जसजसा पडकाच्या जवळ जात होता. तसे यांचे आनंदाश्रू वाहू लागले होते. त्यांच्या विजयासाठी आम्ही विठ्ठलाचा धावा करत होतो, असं त्यांच्या आईनं माध्यमांशी बोलताना सांगितले. “लहानपणापासून स्वप्नील अगदी लहान गावातून शिकला. नाशिकला गेल्यानंतर त्यानं रायफर शूटिंगमध्ये यश मिळवलं आणि नंतर मागे वळून पहिलंच नाही.”

स्वप्नीलच्या आई या गावच्या सरपंच आहेत. पण सरावाला तो एंवढ महत्व देतो की, सरपंच झाल्यानंतर तो भेटायलाही आला नव्हता. दोन महिन्यानी तो भेटायला आला, असं स्वप्नीलच्या आईनं सांगितलं. सरावात तो संगळं काही विसरून जातो. त्याला स्न् उत्सवाचंही भान राहत नाही. आम्ही सांगतो तेव्हा त्याला सणांबद्दल किंवा इतर गोष्टींबाबत समजतं, असंही त्यांनी सांगितलं.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!