पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने पटकावलं पहिले पदक, नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास

Paris Olympics 2024

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं असून मनू भाकरनं नेमबाजीत 221.7 पॉईंट्स मिळवत ब्रॉंझ पद मिळवलं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली नेमबाज आहे. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, टेक फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं, असं मनू भाकरने कांस्य पदक जिंकल्यानंतर सांगितले.

मनू भाकर ही ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. याशिवाय पहिल्या क्रमांकावर कोरियाची नेमबाज ओ ये जिन 243.2 पॉईंट्स आणि द्वितीय क्रमांकावर कोरियाच्या किम येजी 241.3 पॉइंटस मिळवल आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनूने भारताला पहिलं पदक मिळवून दिल आहे. 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक दरम्यान पिस्टलमध्ये बिघाड झाल्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. यादरम्यान ती भावुक झाली होती. मात्र या दु:खातून बाहेर पडत तिने आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं आहे.

Paris Olympics 2024
Paris Olympics 2024

गेल्या वर्षीच मनूनं 25 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत वर्ल्डकप स्पर्धांमध्ये सात सुवर्ण आणि डॉन रौप्य अशी नऊ पदक कमावली आहेत. 1018 साली यूथ ऑलिम्पिक गेम्समध्ये मनूनं 10 मीटर एअर रायफर प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक आणि मिश्र सांघिक रौप्यपदक जिंकल होतं. पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पदरी निराशा पडली होती. टे अपयश मागे सारत मनूनं आता कांस्य पदकाची कमाई केली आहे. 10 मीटर रायफर नेमबाजीत भारताच्या रमिता जिंदालणं फायनल गाठली आहे. 29 तारखेला ती पदकासाठीच्या लढतीत खेळेल. नेमबाजीच्या या प्रकारात भारताच्या इलानेविले वेलारीवानला मात्र दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

आज संध्याकाळी तिरंदाज उपांत्यपूर्व फेरी होणार आहे, त्यात भारताची महिला टीम सहभागी होईल. तर रोइंग, बॅडमिंटन, बॉक्सिंग, स्विमिंग, टेनिस आणि टेबल टेनिस या क्रिडाप्रकारात भारतीय खेळाडू सहभागी होतील. ऑलिम्पिकमध्ये यंदा 32 क्रिडाप्रकारात 329 सुवर्ण पदकांसाठी हजारो ॲथेलिट्स शर्यतीत आहेत. भारतानं या क्रिडा स्पर्धेसाठी 110 जनांचं पथक पाठवलं असून 16 क्रिडाप्रकारात भारतीय खेळाडू सहभागी होतील.

Paris Olympics 2024

मनू भाकरनं अशी गाठली फायनल (27 जुलै)

22 वर्षीय मनूनं 27 जुलैला झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांची कमी करत तिसरं स्थान मिळवलं. मनूनं पात्रता फेरीच्या पहिल्या दोन सिरिजमध्ये प्रत्येकी 97 गुणांची कमी केली. तिसऱ्या सिरिजमध्ये 98 गुण मिळवत मनूनं तिसरं स्थान गाठलं. पाचव्या सिरिजमध्ये तिनं एका खराब शॉटवर फक्त 8 गुण मिळवले, पण तेवढा एक शॉट वगळत मनूनं उत्तम कामगिरी करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. भारताची आणखी एक पिस्टल नेमबाज हिदम सांगवान पात्रता फेरीत पंधरावी आली. तिनं 573 गुणांची कमाई केली.

भारताच्या पुरुष हॉकी टीमनं पहिल्या लढतीत न्यूझीलंडला 3-2 असं हरवलं आणि ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफर मिश्र सांघिक प्रकारात भारताचं आव्हान पात्रता फेरीतचं संपुष्टात आले. अर्जुन बबुटा आणि रमिता जिंदाल यांनी 628.7 गुणांसह सहावं स्थान मिळवलं. संदीप सिंग आणि एलावेनील वेलारिवान यांनी बारावं स्थान मिळवलं.

Paris Olympics 2024: मनू भाकरचा फायनलमध्ये स्कोर

पहिली 5 शॉट सिरिज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4

दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9

उर्वरित शॉट्स: 10.5,10.4, 9.8, 9.8, 10.2, 10.1, 10.2, 10/1, 10.0, 10.1, 10.3

Paris Olympics 2024

रमिता जिंदालचा एअर रायफरमध्ये 10 मीटरच्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश

10 मीटर एअर रायफर महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या रमिता जिंदालचे इतिहास रचला आहे. रमितान जिंदालने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. रमिता जिंदाल 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहचणारी तिसरी स्पर्धेत ठरली आहे. 20 वर्षीय रमिता जिंदालने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 631.5 गुण मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. रमिता जिंदालने सहाही फेरीत 100 पेक्षा जास्त गुण मिळवले.

अंतिम फेरीचा कसा रंगला थरार?

पहिल्या राऊंड पासून 10.6 पॉईंट्स मिळवत मनूने जोरदार सुरुवात केली होती. परंतु कोरियाच्या ओह ये जीन आणि किम येजी यांना टक्कर देणं मनूला जमलं नाही. दुसऱ्या फेरीपर्यंत मनू ने स्वत:ला पहिल्या तीन स्थानांन ठेवत पदकाची अशा राखली होती. तिसऱ्या फेरीपासून एलिमीनेशन राऊंड सुरू झाला आणि मनूचं लक्ष्य विचलित झालं. चौथ्या फेरीमध्ये मनूने 9.8, 9.8 असे गुण मिळवल्यामुळे ती तिसऱ्या स्थानावर घसरली. पाचव्या फेरीतही मनूचा पहिला शॉट हुकला, 9.9 गुणांमुळे ती तिसऱ्याच स्थानी राहिली. उर्वरित तीन फेऱ्यामध्ये पहिल्या दोन स्थानावर असलेल्या कोरियन खेळाडूंची पिछेहाट झाली. ज्यामुळे एका क्षणापुरती मनू दुसऱ्या स्थानी आली होती.

परंतु हा आनंद क्षणिक ठरला जीन आणि येजी यांनी आपल्या गुणांमधलं अंतर कायम राखत पहिलं दुसरं स्थान कायम राखलं कोरियाची ओह ये जीन 243.2 गुणांसह पहिल्या किम येजी 241.3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आली.

Paris Olympics 2024: मनू भाकर कोण आहे?

22 वर्षाची मून भाकर ही मुळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअर मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर ही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. मनू नेमबाजीत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात आश्वासक खेळाडूपैकी एक आहे. लहान वयापासून मनूला खेळात आवड आहे.

Paris Olympics 2024: शानदार उद्घाटन सोहळा

तब्बल 100 वर्षानी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा ऑलिम्पिकचं आयोजन केलं जातंय. तसंच तिसऱ्यांदा पॅरिसनं ऑलिम्पिकचं आयोजन केलं आहे. ऑलिम्पिकची सुरुवात जारी ग्रीसमध्ये झाली असली. तरी आधुनिक ऑलिम्पिक पॅरिसमध्येच आकाराला आलं. साहजिकच या पॅरिसचं ऑलिम्पिकशी खास नातं आहे. उद्घाटन सोहळ्यातही त्याची झलक पहायला मिळाली.

2024 चा उद्घाटन सोहळा न् भूतो न् भविष्यती असाच होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 205 देशांच्या संघाची परेड यावेळी स्टेडियम मध्ये नाही तर सीन नदीत बोटीवरून निघाली. परेडच्या पूर्ण मार्गावर ठीकठिकाणी कलाविष्कार पहायला मिळाले. कार्यक्रमाच्या अखेरीस टॉर्च रिलेमध्ये फ्रान्सचा सुपरस्टार फुटबॉलर झिनेदिन झिदान सहभागी झाला. तर टेनिसस्टार राफेर नदाल, सेरेना वीलयम्स, अमेली मोरेस्मों तसंच ॲथटिस्ट कार्ल लुईस आणि जीम्नॅस्ट नादिया कोमानेची यांच्यासह फ्रान्सचे अनेक दिग्गज खेळाडू रिलेच्या अखेरच्या टप्प्यात सहभागी झाले होते.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!