नेमकं काय घडलं परभणीत? आंबेडकरी आंदोलक का आक्रमक झाले, हिंसा का पसरली?

Parbhani Violence

Parbhani Violence: परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची परत ठेवण्यात आली होती. संविधानाची ही प्रत एका माथेफिरुने मंगळवारी फाडत त्यांची विटंबना केली होती. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला पकडले आणि मरण केली होती. मात्र कालच्या या घटनेचे पडसाद हळूहळू उमटू लागले आहेत. मंगळवारीच अनुयायांनी या घटनेचा निषेधार्थ रास्ता रोको केला होता. मात्र, हाकेला हिंसक वळून लागलं असून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली, काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी याक्षण घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Parbhani Violence

दरम्यान परभणी बंदच्या (Parbhani Violence) हिंसक वळणावर परभणीचे जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमावबंदीचे आदेश काढले आहे. परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनी करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजेपासून ते पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. तसेच सर्व टेलिफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, ध्वनीक्षेपके आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे ही आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी संवाद साधत शांततेचही आवाहन केलं आहे.

या घटनेनंतर शहरात तसेच जिल्ह्यातील पाथरी आणि जिंतुर या ठिकाणी देखील तणावाचे वातावरण पहायला मिळाले. अनेक ठिकाणी निर्देशन झाली तसेच काही ठिकाणी टायर जाळून निषेधही नोंदवण्यात आला. काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलक करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घटनास्थळी पाहणी केली. तसेच, पुन्हा संविधानाची प्रतिकृती लावण्यात येईल असे सांगितले आहे. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी गावडे यांनी केले आहे.

Parbhani Violence

Parbhani Violence: नेमकं काय – काय घडलं?

  • मंगळवारी 5 ते 5.30 च्या सुमारास एका माथेफिरु ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान शिल्पाची काच फोडून तोडफोड करत विटंबना केली. यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ या माथेफिरू व्यक्तीला पकडले आणि चांगलाच चोप दिला. यानंतर तत्काळ पोलिस तिथ दाखल झाले पोलिसांनी या माथेफिरू ला ताब्यात घेतले.
  • घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमले. एकत्र आल्यानंतर पुतळ्यासमोरच रस्ता रोको करण्यात आला काही गाड्यांवर दगडफेक केली. जमावाचे एक टोळके रेल्वे स्थानकात गेले आहे. नंदीग्राम एक्सप्रेस या आंदोलकानी रोकली. अर्धा तास रेल्वे रोको केल्यानंतर पोलिसांनी समजावून आंदोलकांना रेल्वे स्थानकबाहेर काढले.
  • रात्री उशिरा पर्यंत शहरातील खानापुर फाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिंतुर रोड पाथरी रोड गंगाखेड रोड वर लोकांनी ठिय्या आंदोलन केले होते. रात्रीच सर्व आंबेडकर जनतेकडून परभणी बंदचे आवाहन करण्यात आले. आज सकाळपासून शहरात बाण पाळण्यात आला शहरातील तसेच जिल्हाभरातील बजारपेठ कडकडीत बाण ठेवण्यात आली होती शाळा महाविद्यालये ही बंद होती.
  • आंबेडकरी अनयायांयी आजही खानापुर फाटा, विद्यापीठ गेट, वसंतराव नाईक यांचा पुतळा तसेच डॉ बाबासाहेब यांचा पुतळा परिसर ठिय्या आंदोलन केले. वेगवेगळ्या ठिकाणी टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. दुपारी बारा साडेबारा ते एक दरम्यान सर्व आंदोलन शांततेत सुरू असताना अचानक तरुणांचा एक जमाव आला. हातात काठ्या घेवून दगड घेवून या जमावाने पहिल्यांदा बंद दुकानावर हल्ला चढवला.
  • पोलिसांनी परिस्थिती हाताळत शंत केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आंदोलक यांच्याशी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्वांना बोलून शांततेचे आवाहन केले. सर्वांनी मान्य केले आणि हे सर्व जण बाहेर पडले.
  • बैठक संपताच महिलांचा एक घोळका जिल्हाधिकारी कार्यालयात शिरला. जिल्हाधिकारी दालनात असताना महिलांनी सर्व कार्यालयात तोडफोड केली. अर्धा तस हे सर्व सुरू होते नंतर पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले.
  • आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस व जिल्हा प्रशासनाचे स्पष्ट केले असून त्यामुळे कोणीही आक्रमक भूमिका घेऊ नये, असे आवाहन भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते विजय वाकोडे यांनी केले आहे. शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
Parbhani Violence

Parbhani Violence: संचारबंदी लागण्याची शक्यता

तर दुसरीकडे नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमर परभणीत दाखल होताच पोलिस एक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. अशातच परभणीत संचारबंदी लागण्याची ही शक्यता आहे. परभणी पोलिसांनी तसा जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिल्याचीही माहिती आहे. दरम्यान काही वेळेत संचारबंदीचे आदेश लागू होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सोबत आता SRPF च्या तुकडीला ही घटनास्थळी तयार करण्यात आले आहे.

Parbhani Violence: प्रकाश आंबेडकर – अन्यथा परिणामास तयार रहा!

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल की, परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाज कंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हंटले आहे. अँड. आंबेडकर यांनी म्हंटले आहे की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोहचले.

त्यांनी केलेल्या निषेध आणि निर्दशनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकांला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा , असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे. परभणी शहरात एका समाज कंटकांने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!