Paralympics Games 2024:पॅरालिंम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज, 84 खेळाडू अन् 95 अधिकारी

Paralympics Games 2024

Paralympics Games 2024: पॅरिस पॅरालिंम्पिकसाठी भारताचे पथक सज्ज झाले आहे. भारतीय पॅरा खेळाडूंच्या मदतीला यंदा 95 विविध अधिकारी तैनात असणार आहे. भारतीय पॅरालिंम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांच्यासह भारतीय खेळाडू रविवारी पॅरालिंम्पिकसाठी पॅरिसला रवाना झाले. पॅरालिंम्पिकमध्ये भारताकडून 84 खेळाडू पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असून त्यांच्या दीमतीला 95 अधिकारी असणार असणार आहेत. पॅरालिंम्पिक स्पर्धा 28 ऑगस्ट पासून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरू होणार असून ती 8 सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत. यावेळी भारताकडून एकूण 84 पॅरा ॲथलिट पॅरालिंम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

हे सर्व खेळाडू 12 विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या पॅरालिंम्पिक स्पर्धेत भारताकडून 54 खेळाडूंचा संघ गेला होता, ज्यामध्ये एकूण 19 पदके जिंकण्यात यश मिळाले होते. यामध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदके होती. गेल्या पॅरालिंम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाच पॅरा खेळाडूंपैकी चार खेळाडू यावेळी सहभागी होत आहे. पॅरिस पॅरालिंम्पिकसाठी भारताचे पथक एकूण 179 जणांचे असणार आहे. 95 पैकी 77 व्यक्ति सांघिक अधिकारी असणार आहेत. वैद्यकीय टीममध्ये नऊ व्यक्तींचा समावेश आहे, तसेच नऊ व्यक्ति इतर अधिकारी म्हणून कार्यरत असणार आहेत.

यंदा भारतीय खेळाडूंकडून मोठी अपेक्षा आहे. याआधी झालेल्या टोकियो पॅरालिंम्पिकमध्ये भारताने 5 सुवर्णपदकांश् एकूण 19 पदके जिंकली होती. आता याहून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा भारतीय खेळाडूंकडून आहे. पॅरिस पॅरालिंम्पिकमध्ये भारतीय खेळाडू वेगवेगळ्या 12 खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. यातील सर्वाधिक 38 खेळाडू ॲथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान, कोणकोणत्या खेळात भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत.

Paralympics Games 2024
Paralympics Games 2024

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पॅरालिंम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. वेगवेगळ्या देशाचे खेळाडू या स्पर्धेतून अशक्यप्राय वाटणारी गोष्ट मेहनत अन् जिद्दी बाळगल्यासक शक्य करून दाखवता येते. याची प्रेरणा या मंचावरुण खेळाडू जगाला देतील.

Paralympics Games 2024: भारतीय खेळाडू आणि त्यांचे क्रिडा प्रकार

क्रिडा प्रकार भारतीय खेळाडू
तिरंदाजी हरवींद्र सिंग, राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी, पूजा, सरिता, शीतल देव
ॲथलेटिक्सदीप्ती जीवांजी (400 मी. रनिंग), सुमित अंतील, संदीप, अजित सिंग, सुंदर सिंग गुरबाज, रिंकू, नवदीप, दिपेश कुमार (सर्व भालाफेक), योगेश कथूनीया (थाळीफेक), धरमबिर, प्रणव सुर्मा व अमित कुमार (क्लब थ्रो), निशाद कुमार व राम पाल (उंच उडी), मारियप्पन थांगावेल, शरद कुमार, व शैलेश कुमार (उंच उडी), सचिन खिलारी, मोहम्मद यासेर व रोहित कुमार (गोळाफेक), प्रीथि पाल (100 व 200 मी.), भाग्यश्री जाधव, मन, प्रवीण कुमार, रवी रांगोली, अरविंद (सर्व गोळाफेक), प्रवीण कुमार (उंच उडी), दिलीप गावीत (400 मी.), सोमन राणा (गोळाफेक) होकटो सेमा (गोळाफेक), साक्षी कसन, करमज्योति (थाळीफेक), रक्षिता राजू (1500 मी.) अमीषा रावत (गोळाफेक), भवानीबेन चौधरी( भालाफेक), सिमरण (100 मी. व 200 मी.) कांचन लखाणी (थाळीफेक)
बॅडमिंटन मनोज सरकार, नीतेश कुमार, कृष्णा नागर, शिवराजन सोलैमालाई, सुहास याथीराज, सूकांत कदम, तरुण, मानसी जोशी, मनदीप कौर, पलक कोहली, मनीषा रामदास, थुलासीमाधी मुरुगेसन, नित्या शिवन.
नौकानयन प्राची यादव, यश कुमार, पूजा ओझा.
सायकलिंग अर्शद शेक व ज्योति गदेरिया ब्लाईक ज्युदो, कपिल परमार व कोकिला पॉवरलिफ्टिंग, परमजीत कुमार, अशोक, सकिना खातू, कस्तूरी राजमणी, रोइंग अंतीला, नारायण कोंगानापल्ले
नेमबाजी अमीर भट, अवनी लेखरा, मोहन अगरवाल, निहाल सिंग, मनीष नरवाल, रुद्राक्ष खांडेलवाल, सिद्धार्थ बाबू, श्रीहर्षा रामकृष्णा, स्वरूप उन्हाळकर, रुबिना फ्रान्सिस, जलतरण: सुयश जाधव
टेबल टेनिस सोनलबेन पटेल, भावीनाबेन पटेल.
तायक्वॉदो अरुणा
Paralympics Games 2024

Paralympics Games 2024: महाराष्ट्राच्या या खेळाडूंवर नजर

1) सूकांत कदम

पॅरा बॅडमिंटनपटू सूकांत कदम सध्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थावर आहे. दहा वर्षाचा असताना क्रिकेटच्या मैदानात झालेल्या एका दुखपतीनं सूकांतचं आयुष्य बदलून टाकलं. गुडघ्याला झालेल्या दुखापती नं सूकांतचं आयुष्य बदलून टाकलं. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमूळे त्याला अपंगत्व आलं आणि दहा वर्ष तो खेळापासून दूर राहिला. सूकांतनं मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजात असताना तो पॅरा बॅडमिंटनकडे वळला. 2015 पासून तो पुण्यात निखिल कानेटकर बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षक म्हणूनही काम करतो आहे. सूकांतनं आजवर पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चार आणि एशियन पॅरा गेम्समध्ये तीन पदक मिळवली आहे. तो यंदा पहिल्यांदाच पॅरालिंम्पिक मध्ये खेळतो आहे.

Paralympics Games 2024

2) सुयश जाधव

मूळचा सोलापूरच्या करमाळ्याचा सुयश पॅरा स्विमिंगमध्ये 50 मीटर बटरफ्लाय S7 प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करेल. लहान असताना विजेचा धक्का बसल्यानं सुयशला दोन्ही हातांचे तळवे आणि मनगट गमवावी लागली होती. 2018 साली जकार्तामध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये सुयशनं एक सुवर्ण आणि डॉन कांस्यपदकांची कमी केली होती.

Paralympics Games 2024

3) दिलीप गावीत

धावपटू दिलीप गावीतनं एशियन पॅरा गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवलं होतं. पॅरिसमध्ये दिलीप 400 मीटर शर्यतीत धावणार आहे. मूळचा नाशिकच्या सुरगण्यातला असलेल्या दिलीप गावीतला उजवा हात गमवावा लागला होता.

Paralympics Games 2024

4) ज्योति गडेरिया

ज्योति गडेरिया भंडाऱ्यातल्या डोंगरगावची आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेली ज्योति आधी कबड्डी खेळायची. 2016 साली एका अपघातानंतर तिला दावा पाय गमवावा लागला. त्यानंतर ती पॅरा सायकलिंगकडे वळली. पॅरिस पॅरालिंम्पिकमध्ये ज्योति सायकलिंगमध्ये महिलांच्या C2 गटात खेळते.

5) स्वरूप उन्हाळकर

कोल्हापूरचा स्वरूप उन्हाळकर नेमबाज आहे आणि तो पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफर स्टँडिंग SH1 प्रकारात खेळतो. लहान असताना पोळीयोमुले स्वरूपच्या दोन्ही पायातली ताकद गेली. तो पुन्हा स्वतंत्रपणे आयुष्य कधी जगू शकेल की नाही त्याच्या कुटुंबीयांनाही खात्री नव्हती. पण स्वरूपनं नेमबाजी जागतिक पातळीवर झेप घेतली. टोकियो पॅरालिंम्पिकमध्ये फायनल गाठली होती. पण अवघ्या 0.3 गुणांनी त्याचं पदक हुकलं होतं. आता पॅरिसमध्ये स्वरूपला पडकांसाठी प्रमुख दावेदारी मानलं जातंय.

Paralympics Games 2024: उद्घाटन सोहळ्यात हे दोन खेळाडू करतील भारतीय ताफ्याचे नेतृत्व

पॅरालिंम्पिक स्पर्धेचच्या (Paralympics Games 2024) उद्घाटन सोहळ्यात परंपरेनुसार, खेळाडू आपापल्या देशाचा राष्ट्रध्वज घेऊन मिरवताना दिसतील. भारताकडून टोकियो पॅरालिंम्पिक स्पर्धेतील भारताचा गोल्डन सुमित अंतीलसह महाराष्ट्रातील नांदेडची लेक आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हिला भारताच्या ध्वजवाहकाचा मान देण्यात आला आहे. पॅरिसमधील पॅरालिंम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात हे दोन खेळाडू भारतीय पथकाचे नेतृत्व करताना दिसतील.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!