Palkhi Shohla 2024
Palkhi Shohla 2024: नमस्कार, मित्रांनो तुम्हाला माहीत आहे. की आषाढी वारी ही आषाढी एकादशीनिमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज 29 जून 2024 रोजी आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रथण करणार आहे. तर देहूतुन श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान देखील 28 जून रोजी आषाढी वारीसाठी देहुतील इनामदार साहेब वाडा येथून होणार आहे.
आषाढ महिना लगायच्या आधीच सर्व संतांच्या पालख्यांच्या प्रस्थानाची लगबग सुरू होते. वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. जाणून घ्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे वेळापत्रक.
पंढरपूर ची यात्रा, संतांचा पालखी सोहळा आणि पायी जाणारे वारकरी हे परंपरा लाभलेले महाराष्ट्रातील एक आकर्षणच आहे. आषाढी वारी च्या निमित्ताने वारकरी मंडळी हळूहळू विठू नामाचा गजर मजल दार करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. पायी वारी करण्याचा अनुभव अद्भुत असतो.
या वर्षी सोहळ्याचा मुक्काम पुणे येथे 30 जून व 1 जुलै व सासवड येथे 2 व 3 जुलै येथे दोन दिवस तसेच लोणंदला अडीच दिवस मुक्काम असल्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचे माऊलीचे पालखी सोहळा प्रमुख व देवस्थानचे
Palkhi Shohla 2024: पालखी सोहळा म्हणजे काय?
पालखी ही 1000 वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे. ज्याचे पालन करणारे वारकरी, लोक वारी नावाच्या प्रथेचे पालन करतात. दिंड्यामध्ये सर्व वारकरी मिळून एकत्र येऊन, हरी नामांचा जप करून, गाणे, टाळ-मृदंगाच्या नादावर नृत्य करत आणि ज्ञानबा-तुकारामाचा जयघोष करून लॉक हा उत्सव साजरा करत आळंदी-देहू वरून पंढरपूर ला चालत जातात.
पंढरपूरला वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा जातात आणि पंढरपूरला वारितून जाण्यासाठी चार तीर्थ यात्रा असतात. त्या म्हणजे वारकरी वर्षातील चैत्र वारी / यात्रा, कार्तिकी वारी / यात्रा, आषाढी वारी / यात्रा, माधी यात्रा या पैकी कोणत्याही एका वारितून पंढरपूरला जातात, पण आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
Palkhi Shohla 2024: कसा असेल यंदाचा माऊलीच्या पालखीचा मार्ग?
- 29 जून आळंदीहून प्रस्थान आणि गांधी वाडा इथे मुक्कामी असणार आहे.
- 30 जून आळंदीहून पुण्याच्या दिशेने पालखी मार्गस्थ होईल.
- 15 जुलैला पालखी वाखरीला पोहचणार आहे.
- 16 जुलैला वाखरी ते पंढरपूर असा प्रवास होईल.
- 17 जुलै रोजी मुख्य आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेचा सोहळा आहे.
या वर्षी सोहळ्याचा मुक्काम पुणे येथे 30 जून व 1 जुलै व सासवड येथे 2 व 3 जुलै येथे दोन दिवस तसेच लोणंदला अडीच दिवस मुक्काम असल्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचे माऊलीचे पालखी सोहळा प्रमुख व देवस्थानचे
Palkhi Shohla 2024: कसा असणार परतीचा प्रवास?
- 20 जुलै पर्यंत माऊलींची पालखी पंढरपूर नगरीत विसावेल.
- 21 जुलै श्रीचे चंद्रभागा स्थान आणि गोपाल काला व श्री विठ्ठल रुक्मणी भेट.
- पादुकाजवळ विसावा व सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार.
Palkhi Shohla 2024: आषाढी वारीला इतकं महत्व का?
असं सांगण्यात येते की, या आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते तसेच दिवसापासून चातुर्मासचा पवित्र कल सुरू होतो. या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात. आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते.
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखी अशा दोन पालख्यांचे आयोजन का?
मिळालेल्या माहितीनुसार, इ. स. 1685 मध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नावीन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडून आणण्याचे ठरविले. संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले, तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हा पासून इ. स्. 1830 परीनात ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे संत तुकाराम कुटुंबात वाद होत होते.
या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदी हून संत ज्ञानेश्वर पालखी आणि देहूहून संत तुकाराम पालखी अशा वेगवेगळ्या पळखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.
Palkhi Shohla 2024: वारी म्हणजे काय?
वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढी आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. सं ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूर जाण्यासाठी वारी सुरू केली अस सांगण्यात येत. वारी करण्याची परंपरा साधारणत 800 वर्षाहून अधिक काळा पासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.
रिंगण सोहळा
पहिले उभे रिंगण 8 जुलै चांडोबाचा लिंब येथे होईल. पहिले गोल रिंगण 12 जुलै पुरंद वडेला, दुसरे गोल रिंगण 13 जुलै खडूस फाटा येथे होईल तर तिसरे गोल रिंगण 14 जुलै ठाकूर बुवाची समाधी येथे होईल. दुसरे उभे रिंगण 15 जुलै बाजीरावाची विहीर येथे, चौथे गोल रिंगण 15 जुलै बाजीरावाची वहिर येथे तिसरे उभे रिंगण 16 जुलै वाखरी येथे पर पडेल. इथेच पादुका आरतीही होईल.
काय आहे वारीचा इतिहास?
आषाढी वारी अर्थात पंढरीच्या वारीची परंपरा फार प्राचीन आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संत ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्याचे वडील नित्यनेमाने वारीला जात असत. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सहभागी करून घेतले. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जणमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्र व्यापी झाला हेच व्यापक स्वरूप जप्त पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.
यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 29 जूनला शनिवारी संध्याकाळी 4 वाजता आळंदी येथील संजीवनी समाधी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान तेवणार आहे. पहिलं मुक्काम हा माऊलीचे आजोळ असलेल्या गांधी वाड्यात होणार आहे. 30 जून रविवार रोजी पालखी आळंदीहून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!